शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,बारामती येथे विविध रिक्त पदांची भरती २०२४|

GMC Baramati Recruitment 2024

GMC Baramati Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,शासकीय महाविद्यालय, बारामती वैद्यकीय अध्यापन व रुग्णसेवा याकरीता चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे संस्थास्तरावरुण करार तत्वावर ३६४ दिवसांकरीता निव्वळ व तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याकरीता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीचे नोकरीचे ठिकाण बारामती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी महाविद्यालयाच्या http://www.gmcbaramati.org/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून मागविण्यात येत असलेले संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई, यांच्या www.med.edu.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते २३/०२ २०२४ सायंकाळी ०५ वाजेपर्यंत (शासकीय सुट्टी वगळून)अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्विकारले जातील. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता, अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य राहील. करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीबाबतची माहिती संचालनालयाच्या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.

मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

GMC Baramati Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती भरती २०२४

पदाचे नाव :-

 • प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

एकूण रिक्त पदे :-

 • १५ पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

 • Baramati -बारामती

वयोमर्यादा :-

 • उमेदवाराचे वय नियुक्ती वेळेस दिनांक ३१/०१/२०२३ रोजी कमाल ६९ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

 • Interview – मुलाखत

वेतनश्रेणी/मानधन :-

 • दरमहा रु. १,८५,०००/- ते रु. २,००,०००/- पर्यंत

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • २५ जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • २३ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- http://www.gmcbaramati.org/

GMC Baramati Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameGovernment Medical College, Baramati
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती
Name Posts (पदाचे नाव)प्राध्यापक – Professor
सहयोगी प्राध्यापक – Associate Professor
Number of Posts (एकूण पदे)15 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)http://www.gmcbaramati.org/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Online -ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Baramati -बारामती
Age Limit (वयोमर्यादा)Candidate’s age should not exceed maximum 69 years as on 31/01/2023 at the time of appointment
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview – मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs.1,85,000/- to Rs. 2,00,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)अर्ज शुल्क नाही
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
25 जानेवारी 2024
23 फेब्रुवारी 2024

GMC Baramati Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
प्राध्यापक – Professor06 पदे
सहयोगी प्राध्यापक – Associate Professor09 पदे

GMC Baramati Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
प्राध्यापक – ProfessorM.D./DNB/M.S.
सहयोगी प्राध्यापक – Associate ProfessorM.D./DNB/M.S.

GMC Baramati Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
प्राध्यापक – ProfessorRs. 2,00,000/-
सहयोगी प्राध्यापक – Associate ProfessorRs.1,85,000/-

GMC Baramati Bharti 2024:Important Note -महत्वाची टीप

 1. Government Medical College, Baramati (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती) भरती करीता उमेदवार हा भारताचा नागरिक असावा तसेच महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
 2. उमेदवाराचे वय नियुक्ती वेळेस दिनांक ३१/०१/२०२३ रोजी कमाल ६९ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 3. प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी त्या -त्या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांबरोबरच कोणत्याही वयोगटाचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विहित केलेली आवश्यक अर्हता धारण करणारे खाजगी वा अन्य क्षेत्रातील उमेदवार (बिगर सेवानिवृत्त) पात्र असतील.
 4. एकूण ८५ गुणांच्या आधारे तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार उमेदवारांना प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी व मुलाखतीस पात्र ठरविण्यात येईल.
 5. प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी व मुलाखती अंती १०० गुणांपैकी किमान ४१ % किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच करार तत्वारील नियुक्तीकरीता विचार केला जाईल. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 6. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

GMC Baramati Bharti 2024:नियम व अटी खालीलप्रमाणे

 1. करार पद्धतीने नियुक्तीचा कालावधी हा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा ३६४ दिवसांचा कालावधी यापैकी जे अगोदर घडेल इतका राहील.
 2. उमेदवाराचे कामकाज समाधानकारक नसल्यास, गंभीर स्वरूपाची अनियमितता व गैरवर्तणूक या कारणासाठी त्याची नियुक्ती कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय संपुष्टात येईल.
 3. करार पद्धतीने नियुक्त उमेदवाराने प्रस्थापित मानकांनुसार अध्यापन, रुग्णसेवा व अधिष्ठाता यांनी नेमून दिलेली विवक्षित कामे पार पाडणे आवश्यक राहील.
 4. वरीलप्रमाणे विहित कामकाज पार पाडल्यानंतर महाविद्यालयीन व रुग्णालयीन कर्तव्य व जबाबदाऱ्यांवर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन उमेदवारास खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्याची मुभा राहील.
 5. करार पद्धतीने नियुक्त उमेदवारांना नियमित नियुक्तीसाठी कोणताही हक्क राहणार नाही, तसेच सदर कालावधीसाठी कोणत्याही सेवा प्रयोजनासाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
 6. करार पद्धतीने नियुक्त उमेदवारास त्याच्या सेवा कालावधीत केवळ नैमितीक रजा अनुज्ञेय असतील.
 7. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे /माहिती आधारसामुग्री बाबत गोपनियता पाळणे आवश्यक राहील.
 8. उमेदवारास नियुक्ती देण्यात आल्यानंतर एक शैक्षधिक सत्र संपेपर्यंत त्यास कोणत्याही परिस्थितीत सेवा सोडता येणार नाही. तशा आश्याचे शपथपत्र उमेदवारास नियुक्तीपूर्वी सादर करणे बंधनकारक असेल.
 9. असे शपथ पत्र सादर करणाऱ्या उमेदवारालाच करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येईल. शैक्षणिक सत्र चालू असलेल्या कालावधीत विद्यार्थीहीत विचारात घेता उमेदवाराचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.
 10. बिगर सेवानिवृत्त गटातून करार पद्धतीने नियुक्त होणाऱ्या अध्यापकाची नंतरच्या काळात नियमित नियुक्ती झाल्यास त्याला पूर्वीच्या सेवेचे कोणतेही लाभ अनुज्ञेय असणार नाहीत.
 11. अर्जदाराने संबंधित पदासाठी शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
 12. नमूद रिक्त पदांच्या संख्येत बदल करणेबाबत सर्व अधिकार अधिष्ठाता राहतील.
 13. अर्जदाराने त्यांच्या निवडीसाठी समितीवर प्रत्यक्ष /अप्रत्यक्षरित्या कोणताही प्रकारचा दबाव आणल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
 14. अर्जदाराचे नाव महाराष्ट्र निवडीसाठी समितीवर प्रत्यक्ष /अप्रत्यक्षरित्या कोणताही प्रकारचा दबाव आणल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
 15. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
 16. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी मुलाखतीला येताना ऑनलाइन सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे मुळ कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक राहील,याची नोंद घ्यावी.
 17. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

How To Apply For Government Medical College Baramati Jobs 2024

 • Government Medical College, Baramati (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती) भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने /पोस्टाने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती २०२४ भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती २०२४ भरती ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..