Latur District Court Bharti 2024:लातूर जिल्हा न्यायालय अंतर्गत “सफाई कामगार” पदांची भरती जाहीर|

Latur District Court Recruitment 2024

Latur District Court Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, लातूर जिल्हा न्यायालय अंतर्गत “सफाई कामगार” पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित झाली आहे. आपण या लेखात या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी ही भरतीची जाहिरात उत्तम नोकरीची संधी ठरणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.

मित्रांनो, तुम्ही जर लातूर जिल्हा न्यायालय अंतर्गत होणाऱ्या “सफाई कामगार” पदांच्या भरतीसाठी पात्र असाल तर लातूर जिल्हा न्यायालयाच्या https://latur.dcourts.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊनअधिक माहिती जाणून घेऊ शकताय. लातूर जिल्हा न्यायालय, लातूर यांच्या भरतीमंडळाने सदर पदांसाठी एकूण 13 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्याचप्रमाणे उमेदवारांनी त्यांचे ऑफलाइन अर्ज संबंधित (खाली दिलेल्या) पत्त्यावर वेळेत सादर करायचा आहे. तसे नसल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

लातूर जिल्हा न्यायालय अंतर्गत “सफाई कामगार” पदांच्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांचे ऑफलाइन अर्ज दिलेल्या संबंधित तारखेपूर्वी सादर करावेत. त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, कृपया याची नोंद घ्यावी. मित्रांनो, तुम्ही सदर भरतीच्या अधिक माहिती साठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

चला तर मग मित्रांनो, या भरतीबाबत सविस्तर माहिती जसे की, एकूण रिक्त पदे, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, अर्ज कसा करायचा आहे, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ई. सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Latur District Court Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लातूर जिल्हा न्यायालय भरती २०२४

पदाचे नाव :- “सफाई कामगार”

एकूण रिक्त जागा :- १३ जागा

अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
निवड सूचीसाठी सफाई कामगार पदांची संख्या१०
प्रतीक्षा सूचीसाठी सफाई कामगार पदांची संख्या०३

नोकरीचे ठिकाण :- लातूर

Latur District Court Bharti 2024: वयोमर्यादा

१८ वर्षे ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सूट)

 • जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 • योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य /केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.

● अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन (Offline)

Latur District Court Bharti 2024: शैक्षणिक अर्हता :-

खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

 1. सुदृढ शरीरयष्टी आणि सफाई कामगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे.
 2. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
 3. उमेदवाराला दिनांक २८/०३/२००५ नंतर जन्मास आलेल्या मुलांची संख्या एकूण दोन पेक्षा जास्त नसावी.
 4. अर्जदाराला कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक किंवा दोषी ठरविले नसावे आणि त्याने /तिने/तिच्याविरुद्ध फौजदारी खटला /तक्रार प्रलंबित असल्याचे किंवा फौजदारी खटला /तक्रार याचा निर्णय झालेला आहे असे, उघड केले पाहिजे.

● निवड प्रक्रिया :- मुलाखत

अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :- जिल्हा सत्र न्यायालय, लातूर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- ३० एप्रिल २०२४

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १४ मे २०२४

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

● वेतन/मानधन :- दरमहा रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/- पर्यंत

Latur District Court Bharti 2024: कामाचे स्वरूप

 1. निवड झालेल्या उमेदवारांची, जेथे नियुक्ती केली जाईल, तेथील न्यायालय, इमारतीची, इमारतीच्या परिसराची, निवासस्थानाची व कार्यालयांच्या प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे.
 2. न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे.
 3. वरील १ व २ मध्ये नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त न्यायिक आधींकरी आणि न्यायालयाचे प्रभारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करणे.

Latur District Court Bharti 2024: उमेदवारांना सूचना

 • अर्ज करण्याची पद्धत :- जाहिरात, अर्ज व प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय, लातूरचे संकेतस्थळ https://latur.dcourts.gov.in/ या वर उपलब्ध आहेत. त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांच्या स्वःप्रमाणित प्रती अर्जासोबत सादर करावीत. कोणत्याही परिस्थितीत हस्तप्रेक्षणाद्वारे म्हणजेच By Hand अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच बंद पाकीटावर सफाई कामगार पदासाठी अर्ज असे नमूद नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • शासकीय कर्मचाऱ्याने अर्ज कसा करावा :- जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत, त्यांनी त्या -त्या विभाग / कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेऊनच अर्ज सादर करावा.
 • उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना /कर्मचाऱ्यांना भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, त्यास अपात्र ठरविण्यात येईल. याबाबतची निवड समितीचा निर्णय अंतीम राहील.
 • उमेदवाराने त्याचे /तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर स्वाक्षरी करावी.
 • दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत.
 • अर्जासोबत नमूना-अ मधील प्रतिज्ञापत्र जोडावे, तसेच नुमणा घोषणाही जोडावी.
 • विहित नमुन्यातील नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अल्पसूची :- सफाई कामगाराच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिति योग्य ते निकष लावून अर्हता /योग्यतेच्या आधारे सफाई कामगार पदासाठी अल्पसूचीतयार करेल व अशी अल्पसूची जिल्हा न्यायालय लातूर येथील सूचना फलक व त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करेल.
 • अशी अल्पसूची तयार करण्याचे किंवा आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार निवड समितीने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत.
 • चापल्य व साफसफाई परीक्षा :- सफाई कामगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची २० गुणांची चापल्य व साफसफाई कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल.
 • चापल्य व साफसफाई परीक्षेत जे उमेदवार पात्र असतील त्यांची २० गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल.
 • उमेदवारांची निवड ही सफाई कामगार पदाच्या चापल्य व साफसफाई परीक्षेत आणि तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल.
 • उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरीता परीक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
 • सेवाप्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती /सूचना /बदल जिल्हा न्यायालय, लातूर यांच्या सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परंतु कोणासही वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही.

अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

Latur District Court Bharti 2024: अर्ज कसा करावा

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया लातूर जिल्हा न्यायालय भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे; खालील माहिती काळजीपूर्वक पहा. ⤵️⤵️⤵️

 • लातूर जिल्हा न्यायालय भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
 • इतर कोणत्याही प्रकारे (ऑफलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी ऑफलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित (खाली दिलेली) पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज सादर करावा.
 • त्याचप्रमाणे उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज वेळेत सादर करणे आवश्यक आहे.
 • आपल्या अर्जात संपूर्ण माहिती योग्यरित्या आणि परिपूर्ण भरलेले आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • अर्जात कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा खटी माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • सदर भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२४ आहे.
 • मित्रांनो, तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, त्याचप्रमाणे तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Offline Application Form (ऑफलाइन अर्ज फॉर्म)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

लातूर जिल्हा न्यायालय भरती २०२४ अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️
Latur District Court Bharti 2024: FAQs

लातूर जिल्हा न्यायालय अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये कोणती पदे रिक्त आहेत?

सफाई कामगार ची पदे रिक्त आहेत.

या भरतीमध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत?

एकूण १३ रिक्त जागा आहेत.

उमेदवारांना किती पगार मिळणार ?

दरमहा रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/- पर्यंत पगार मिळणार आहे.

सदर भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे?

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

१४ मे २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.