नवरात्रीचे 9 दिवस 9 रंग

पहिला दिवस ३ ऑक्टोबर २०२४ वार- गुरुवार रंग- पिवळा जगभरातील अनेक संस्कृतीमद्धे हा आनंद, भव्यता, सुसंवाद आणि ज्ञानाचा रंग मानला जातो.

दूसरा दिवस ४  ऑक्टोबर २०२४ वार- शुक्रवार रंग- हिरवा नवरात्रीचा रंग हिरवा हा निसर्ग मातेचा रंग आहे हे वाढ आणि प्रजनन क्षमतेची भावना जागृत  करते.

तिसरा दिवस ५ ऑक्टोबर २०२४ वार - शनिवार रंग -राखाडी  शांतता आणि स्थैर्याचे प्रतीक आहे.

चौथा दिवस ६ ऑक्टोबर २०२४ वार - रविवार रंग-नारंगी  केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते.

पाचवा दिवस ७ ऑक्टोबर २०२४ वार- सोमवार रंग- पांढरा  हा रंग पवित्रता, शांतता आणि निर्दाषपणाचे प्रतीक आहे.

सहावा दिवस ८ ऑक्टोबर २०२४ वार- मंगळवार रंग- लाल साहस, शक्ति आणि उग्रतेचे प्रतीक आहे.

सातवा दिवस ९ ऑक्टोबर २०२४ वार- बुधवार रंग-निळा शांतता आणि दैवी सुसंवाद दर्शवते.

आठवा दिवस १० ऑक्टोबर वार- गुरुवार रंग- गुलाबी प्रेम करुणा आणि  स्नेहाचे प्रतीक आहे.

नववा दिवस ११ ऑक्टोबर २०२४ वार- शुक्रवार रंग-जांभळा   महत्त्वाकांक्षा,शक्ति आणि अध्यात्माचे प्रतीक आहे.