छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण कसे झाले ?

मातोश्री जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे शिक्षण झाले

शिवाजी राजांचा मातोश्रीबरोबर महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांतून प्रवास होत असे. 

मातोश्री जिजामाता यांनी शिवरायांना निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांविषयी गोष्टी सांगितल्या. 

कवींद्र परमानंद यांनी शिवभारतात असे म्हंटले आहे की, शिवाजी राजे सहा वर्षांचे झाल्यावर त्यांना पंतोजीच्या मांडीवर बसवून अक्षर ओळख करून दिली गेली.

शिवरायांनी अतीशय बुद्धिमत्तेने आणि जलद गतीने अध्ययन केले. शिवरायांचे वडील शहाजी राजे भोसले हे विद्वान होते आणि विद्वानांचा आश्रयदाता म्हणून ओळखले जात असे.

शिवाजी राजांना शहाजीराजांनी त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी बंगरुळला नेले होते. दोन वर्ष ते वडिलांच्या सानिध्यात होते, ज्यात त्यांना सर्वप्रकारचे प्रशिक्षण मिळाले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इ. स. १६४२ च्या अखेरीस शिवाजीराजांना मातोश्री जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांच्यासह पुण्याच्या जहागिरीत पाठविण्यात आले.