महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी! सरकार महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी नवे विधेयक आणण्याच्या तयारीत आहे.
राज्यातील कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग 81 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतीतील अनेक कामे महिला करत असल्या तरी त्यांच्या नावावर जमीन नसल्याने त्यांना अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करण्याच्या तयारीत आहे.
या विधेयकाचा मुख्य उद्देश शेतीत काम करणाऱ्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळवून देणे हा आहे.
पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय आणि इतर कृषीपूरक क्षेत्रातील महिलांचाही विचार केला जाऊ शकतो.
भूमिहीन महिला, भाडेकरू महिला शेतकरी, शेतमजूर आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांचाही समावेश होण्याची शक्यता आहे.
महिला शेतकऱ्यांना योग्य ओळख आणि स्थान मिळावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. त्यामुळे या विधेयकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता सर्वांचे लक्ष अधिवेशनाकडे! अधिक माहितीसाठी पूर्ण लेख वाचा