पीएम किसानचा 23 वा हप्ता जाहीर!

पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 23 व्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

20 जूनला खात्यात ₹2,000 जमा

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 20 जून रोजी ₹2,000 ची रक्कम DBT द्वारे जमा केली जाणार आहे.

दरवर्षी मिळतात ₹6,000

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते.

रक्कम थेट खात्यात

23 व्या हप्त्याची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

कागदपत्रे तपासा

आधार क्रमांक, बँक खाते आणि नोंदणीची माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या.

eKYC पूर्ण असणे आवश्यक

eKYC पूर्ण नसल्यास हप्त्याची रक्कम अडकू शकते. त्यामुळे माहिती एकदा तपासून घ्या.

Farmer ID का महत्त्वाची?

Farmer ID आणि लाभार्थी माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. चुकीची माहिती अडचणीचे कारण ठरू शकते.

लाभार्थी यादीत नाव आहे का?

PM Kisan पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादी आणि हप्त्याचे स्टेटस ऑनलाइन तपासता येते.

आजच करा ही 3 कामे

eKYC पूर्ण करा, Farmer ID तपासा,  लाभार्थी यादीत नाव असल्याची खात्री करा.