धुळे जिल्हा परिषदेत विविध रिक्त पदांची भरती २०२४ |त्वरित अर्ज करा !!!

Zilla Parishad Dhule Recruitment 2024

ZP Dhule Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, आता १२ वी पास उमेदवारांना रोजगार मिळणार आहे. मित्रांनो तुम्ही जर १२ वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी असणार आहे. जिल्हा परिषद धुळे मध्ये नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “डेटा एंट्री ऑपरेटर” पदाच्या जागा भरावयाच्या आहेत. जिल्हा परिषद धुळे भरती मंडळाने मार्च २०२४ च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण ०४ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवार जिल्हा परिषद धुळे यांच्या https://zpdhule.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन आपले अर्ज ऑफलाइन (offline) पद्धतीने सादर करू शकतात.

जिल्हा परिषद धुळे भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले ऑफलाइन अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी संबंधित (खाली दिलेल्या) पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर अर्ज सरसकट नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, जिल्हा परिषद धुळे मध्ये नोकरीची ही संधी गमावू नका व खाली दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन त्वरित अर्ज करा. जिल्हा परिषद धुळे मध्ये आपले योगदान मोलाचे ठरणार आहे.

जिल्हा परिषद धुळे अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

ZP Dhule Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदे अंतर्गत रिक्त असणारी डेटा एंट्री ऑपरेटरची पदे तात्पुरत्या स्वरूपात पुढील 11 महिन्याचे कालावधी करिता कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर भरवण्यात येणार आहेत. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज सोबत दिलेल्या विहित नमुन्यात शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे येथे दि. 20/03/2024 सकाळी 10:30 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत समक्ष अथवा पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून स्विकारले जातील.

ZP Dhule Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameZilla Parishad Dhule (ZP Dhule)
जिल्हा परिषद धुळे
Name Posts (पदाचे नाव) डेटा एंट्री ऑपरेटर – Data Entry Operator
Number of Posts (एकूण पदे)04 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://zpdhule.maharashtra.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline – ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Dhule – धुळे
Age Limit (वयोमर्यादा)18 वर्षे ते 35 वर्षे
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview – मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 20,650/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)No Fees
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)The Department Of Education (Primary), Zilla Parishad, Dhule
शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
09 मार्च 2024




20 मार्च 2024

ZP Dhule Bharti 2024: Vacancy Details

एकूण रिक्त पदे खालीलप्रमाणे:-

  • डेटा एंट्री ऑपरेटर :- 04 जागा

ZP Dhule Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

शैक्षणिक पात्रता :-

  • किमान 12 वी पास (पदवीधर उमेदवारास प्राधान्य)
  • मराठी टंकलेखन 30 (शब्द प्रती मिनिट)
  • इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि.
  • MSCIT (एम.एस.सी.आय.टी किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ZP Dhule Bharti 2024:Salary Details

डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी किती पगार मिळणार, जाणून घेऊया;

  • मासिक एकत्रित परिश्रमिक मानधन :- रु 20,650/-

ZP Dhule Bharti 2024:Selection Process

सदर भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, जाणून घ्या.

  1. डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास इ. 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि इयत्ता 12 वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची सरासरी काढण्यात यावी. यसेच एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला 10 गुण बोनस देण्यात यावेत.
  2. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परीक्षेकरीता एका पदासाठी गुणानुक्रमे 12 उमेदवार या प्रमाणे बोलावण्यात यावे. सदर उमेदवारांची मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग प्रति मिनिट 40 शब्द आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी. यासाठी सर्व मिळून 100 गुण देण्यात यावे. प्रस्तुत प्रात्यक्षिक किमान गुण प्राप्त होणारे उमेदवार ” डेटा एंट्री ऑपरेटर्स च्या पदावरील निवडीसाठी पात्र राहतील.
  3. वरील दोन्ही मुद्यांच्या गुणांची बेरीज करून गुणानुक्रमे मजूर पदांसारखी निवडयादी प्रसिद्ध केली जाईल. आणि त्यानुसार सदर उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात येईल व तेवढ्याच पुढील उमेदवारांची प्रतिक्षायादी प्रसिद्ध केली जाईल.
  4. सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड टेस्ट आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.

ZP Dhule Bharti 2024:महत्वाच्या सूचना

उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी खालील दिलेल्या सुचनांचे पालन करावे

  • उमेदवारांनी विहित नमुन्यात अलिकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा.
  • सदर अर्जाच्या पाकीटावर “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज” असे नमूद करावे .
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यवसायिक पात्रता, वय, अनुभव, इत्यादींच्या साक्षांकित पप्रती जोडाव्यात.
  • अर्जासोबत स्वतःचे संपूर्ण नाव व पत्ता असलेला “4×6” आकार असलेला रिकामा, रुपये 5/- चे पोष्टाचे तिकीट लावलेला लिफाफा पाठविण्यात यावा.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2024 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नियुक्तीपूर्वी उमेदवाराकडून शासनाकडील विहित नमुन्यात करारनामा करून घेण्यात येईल आणि त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे लागेल.
  • कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या डेटा एंट्री ऑपरेटर या पदासंबंधी सेवाशर्ती, शैक्षणिक अर्हता, एकत्रित ठोक मानधन व नियुक्तीची कार्यपद्धती या संदर्भात आवश्यक ते बदल तसेच निर्णय घेण्याचे अधिकार शासनास राहतील.
  • कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवा कारारपत्र नमूद केलेल्या कालावधीनंतर आपोआप संपुष्टात येईल.
  • डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्त केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यांस नियमित सेवेचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत. तसेच 11 महिन्याच्या कंत्राटी सेवेच्या आधारावर त्यास शासकीय सेवेमध्ये नियुक्तीसाठी कोणताही हक्क असणार नाही.
  • संबंधित कारंचाऱ्यांविरुद्ध शासकीय कामकाजाबाबत तक्रार आल्यास व त्यानुसार दोषी आढळल्यास विहित काळवधीपूर्वीच कंत्राटी सेवा समाप्त करण्यात येईल.
  • सदर कंत्राटी पद भरती जाहिरात www.dhule.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ZP Dhule Bharti 2024:How To Apply

धुळे जिल्हा परिषद भरती 2024 साठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज करायचा आहे.

  • Zilla Parishad Dhule (ZP Dhule) जिल्हा परिषद धुळे भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे कारण अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे येथे दि. 20/03/2024 सकाळी 10:30 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत समक्ष अथवा पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून स्विकारले जातील.सदर अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • जिल्हा परिषद धुळे (ZP Dhule) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • जिल्हा परिषद धुळे भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
📖Application Form (अर्जाचा नमुना)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य महत्वाच्या जाहिराती पाहू शकता, पुढीलप्रमाणे…..