जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू २०२४ |

ZP Washim Recruitment 2024

ZP Washim Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, १५ वा वित्त आयोग अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वाशीम अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स” ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत. सदर पदांकरिता जिल्हा परिषद वाशिम ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवत आहे.आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वाशीमच्या भरती मंडळाने फेब्रुवारी २०२४ मध्ये या पदांसाठी एकूण १८ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार जिल्हा परिषद, वाशीम च्या https://www.zpwashim.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात. सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ फेब्रुवारी २०२४ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.

१५ वा वित्त आयोग अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र ही रिक्त पदे कंत्राटी भरवायची आहेत, त्या नुसार सदर पदांकरीता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहिरात बघून दिनांक ३१/०१/२०२४ ते ०९ /०२ /२०२४ रोजी पर्यंत दिलेल्या लिंक वर दिलेल्या कालावधीत विहित नमुन्यामध्ये आवश्यक शुल्का सह अर्ज अपलोड करावा. दिनांक ०९ /०२ /२०२४ रोजी सायंकाळी ०५:०० नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

जिल्हा परिषद, वाशीम अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

ZP Washim Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जिल्हा परिषद, वाशीम भरती २०२४

पदाचे नाव :-

  • वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स

एकूण रिक्त पदे :-

  • १८ पदे

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

  • Washim – वाशीम

वयोमर्यादा :-

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार :- २१ वर्षे ते ३८ वर्षे
  • मागास प्रवर्गातील उमेदवार :- २१ वर्षे ते ४३ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

  • Interview -मुलाखत

अर्ज शुल्क :-

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार :- रु. २००/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवार :- रु. १००/-

वेतनश्रेणी/मानधन :-

  • दरमहा रु. २०,०००/- ते रु. ६०,०००/- पर्यंत

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

  • ३१ जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • ०९ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://www.zpwashim.in/

ZP Washim Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameZP Washim (Zilla Parishad Washim)
जिल्हा परिषद, वाशीम
Name Posts (पदाचे नाव)वैद्यकीय अधिकारी – Medical Officer
स्टाफ नर्स – Staff Nurse
Number of Posts (एकूण पदे)18 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.zpwashim.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Online -ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Washim – वाशीम
Age Limit (वयोमर्यादा)Open Category Candidates – 38 years
Backward Category Candidates – 43 years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Documents Verified & Interview
कागदपत्र पडताळणी & मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 20,000/- to Rs. 60,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)Open Category Candidates – Rs. 200/-
Backward Category Candidates – Rs. 100/-
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
31 जानेवारी 2024




09 फेब्रुवारी 2024

ZP Washim Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
वैद्यकीय अधिकारी – Medical Officer11 पदे
स्टाफ नर्स – Staff Nurse07 पदे

ZP Washim Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
वैद्यकीय अधिकारी – Medical OfficerMBBS / BAMS
स्टाफ नर्स – Staff NurseGNM / B.Sc. Nursing

ZP Washim Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
वैद्यकीय अधिकारी – Medical OfficerMBBS :- Rs. 60,000/-
BAMS :- Rs. 40,000/-
स्टाफ नर्स – Staff NurseRs. 20,000/-

ZP Washim Bharti 2024:अटी व शर्ती पुढीलप्रमाणे

  1. उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती २९ जून २०२४ पर्यंत असेल. सदर कंत्राटी पदांकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल. तसेच पुढील पुनर्नियुक्ती (११ महीने २९ दिवस या कालावधी करिता) आपल्या कामगिरी मुल्यांकनावर व तसेच राज्यस्तरावरून सदर पदाकरिताचा पुढील वर्षाच्या मान्यतेवर आधारित असेल.
  2. जाहिरातीत नमूद वय अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत ग्राह्य धरले जाईल तसेच शैक्षणिक अर्हता, अनुभव व नोंदणी प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत ग्राह्य धरले जाईल.
  3. सविस्तर जाहिरात ,पात्र /अपात्र उमेदवारांची यादी निवड/प्रतीक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती/सूचना जिल्हा परिषद वाशीम जिल्ह्याच्या https://www.zpwashim.in/ या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल,याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार करता येणार नाही.
  4. राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या ठिकाणी भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन व १५ वा वित्त आयोग हे कालमर्यादेत राबविण्याचे आयोग आहे ही बाब लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीतील निवड केलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना त्या प्रवर्गाचे उमेदवार होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येईल.
  5. पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.
  6. केंद्र / राज्य शासनाने संबंधित पदे ना मंजूर केल्यास उमेदवाराचे सेवा कोणतेही पूर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल व याबाबत कुठलीही तक्रार ऐकुण घेण्यात येणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना निवड यादीतील गुणानुक्रमांकाच्या आधारे प्रधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल.
  7. सदर भरती प्रक्रियेमध्ये कोणताही आक्षेप असल्यास यांचे निवारण करण्याचा अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशीम यांना राहतील.
  8. अर्जदाराला कंत्राटी कालावधीमध्ये सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
  9. अर्ज अपलोड करणे किंवा मुलाखती करीता उपस्थित उमेदवारांना भत्ता व इतर भत्ता देय राहणार नाही.
  10. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सदर पदांकरीता अर्ज करावयाचा असल्यास त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालय प्रमुखाची पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहील व तसे परवानगी पत्र सदर अर्जा सोबत अपलोड करणे बंधनकारक राहील, तसेच परवानगी पत्र नसल्यास व राष्ट्रीय अभियान अंतर्गत कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्जदाराचा अर्ज अपात्र करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे

  • अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेल्या गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा श्रेणी नमूद न करता गुणांची टक्केवारी नुमद करणे आवश्यक आहे.
  • रिक्त पदासाठी आरक्षित संवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्यास इतर उमेदवारास गुणानुक्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात मुळ संवर्गाचा उमेदवार उपलब्ध होईपर्यंत किंवा ११ महिन्यापेक्षा जे कमी असेल त्या कालावधीकरिता नियमांनुसार नियुक्ती दिली जाईल. तथापी कमाल ३८ वयोमर्यादा सर्वसाधारण पदानुसार लागू राहील
  • भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या PDF लिंक वर क्लिक करून जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

How To Apply For ZP Washim Application 2024

  • आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वाशीम भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • ऑफलाइन पद्धतीने /पोस्टाने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • ZP Washim (Zilla Parishad Washim) जिल्हा परिषद, वाशीम भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • जिल्हा परिषद, वाशीम भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..