PM Kusum Solar Pump Yojana 2024:सोलार पंप खरेदीसाठी सरकार देणार 90 टक्के अनुदान!!

Table of Contents

PM Kusum Solar Pump Yojana In Marathi 2024

PM Kusum Solar Pump Yojana 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखात PM Kusum Solar Pump Yojana 2024 (प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024 च्या अंतर्गत शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये सोलार पंप बसविण्यासाठी म्हणजेच खरेदी करण्यासाठी शासनामार्फत 90 टक्के अनुदान मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेच्या लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहे? या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना काय काय फायदे होणार आहेत? अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या भारत देशात बहुतांश नागरिक हे प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात. शेती करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये प्रामुख्याने वीजेची समस्या शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात येत असते. शेतीसाठी आवश्यक असणारी वीज ही रात्री अपरात्री म्हणजेच अनियमितपणे असते, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. या सर्व शेतकरी बांधवांच्या समस्यांचा विचार करून केंद्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी PM Kusum Solar Pump Yojana 2024 (प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024) सुरू करण्याचा अतीशय योग्य निर्णय घेतला आहे.

PM Kusum Solar Pump Yojana 2024 (प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना कोणत्याही वीजेच्या अडचणी येणार नाही, त्यांना या योजनेच्या माध्यमातून 24 तास वीजपुरवठा होणार आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024 च्या अंतर्गत केंद्र सरकारने 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतात सोलारपंप बसविण्यासाठी केंद्र सरकारमार्फत 90 टक्के अनुदान मिळणार आहे, आणि उर्वरित 10 टक्के शेतकऱ्यांना खर्च करावा लागणार आहे.

मित्रांनो, महत्वाचं म्हणजे केंद्र सरकार आता पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे एकूण 17 लाखाहून अधिक पंपांचे नूतनीकरण करणार आहे आणि त्यांचे रूपांतर सौर पंपांमध्ये करणार आहे, याचाच अर्थ असा की जे शेतकरी आत्तापर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे पंप वापरत होते, ते आता सौर ऊर्जेच्या सहाय्याने चालणारे पंप आपल्या शेतामध्ये वापरू शकतील. या मुळे शेतकऱ्यांचा पेट्रोल आणि डिझेलवर होणारा खर्च कमी होईल आणि त्यांची आर्थिक बचत होऊन, त्यांचा आर्थिक विकास या योजनेच्या माध्यमातून होणार आहे.

PM Kusum Solar Pump Yojana 2024

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावPM Kusum Solar Pump Yojana 2024
(प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीराज्य सरकार आणि केंद्र सरकार
राज्यमहाराष्ट्र
विभागमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)
योजनेचे उद्देशदेशातील शेतकऱ्यांच्या शेतात सोलारपंप बसविणे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभशेतकऱ्यांना सोलारपंप खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान मिळणार
योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

PM Kusum Solar Pump Yojana 2024: योजना नक्की काय आहे

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024” नक्की काय आहे?

मित्रांनो, आपले राज्य आणि केंद्र सरकार आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना शेती करताना कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा. त्यातीलच एक योजना म्हणजे PM Kusum Solar Pump Yojana 2024 (प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024) होय. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यापूर्वी ज्या वीजेच्या अडचणी येत होत्या त्या येणार नाही, त्यांना आता आपल्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावे लागणार नाही, कारण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या 90 टक्के अनुदानाच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतामध्ये सोलारपंप बसवू शकतो, तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या पंपांची आवश्यकता भासणार नाही, त्यांचा या योजनेच्या माध्यमातून वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज जोडणी पोहोचली नाही, त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024 च्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी क्षमता असलेले सौर कृषी पंप म्हणजेच सोलार पंप बसवता येणार आहेत. मित्रांनो, महत्वाचं म्हणजे आपल्या राज्यातील ग्रामीण भागात अजूनही वीज पुरवठा झाला नाही, अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सोलार पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

PM Kusum Solar Pump Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील शेती व्यवसायाला चालना मिळणार आहे.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पानी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
  • तसेच या योजेनच्या माध्यमातून शेतकरी दिवसा आपल्या पिकाला पाणी देऊ शकणार आहे.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना डिझेल आणि पेट्रोलवर चालणारे पंप वापरण्याची गरज नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक बचत या योजनेच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे.
  • प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024 च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही.
  • महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024 अंतर्गत येत्या 5 वर्षात 5 लाख सोलारपंप वाटप करण्याचे सरकारचे लक्ष आहे.
  • या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही, तुम्ही आता घरबसल्या अर्ज करू शकणार आहात.

PM Kusum Solar Pump Yojana 2024:योजनेचे फायदे

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?

  • PM Kusum Solar Pump Yojana 2024 (प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात सोलारपंप बसवायचे आहेत, अशा शेतकऱ्यांना शासनामर्फत 90 टक्के दिले जाणार आहे.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे पंप वापरण्याची गरज राहिली नाही, त्यामुळे इंधनावर होणाऱ्या खर्चाची बचत होईल.
  • तसेच इंधनाची देखील बचत या योजनेच्या माध्यमातून होणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोलार पंपामुळे शेतकरी आपल्या शेतातील पिकाला योग्य वेळी पाणी देऊ शकतो, त्यामुळे त्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही, तसेच त्यांच्या उत्पन्नात देखील या योजनेमुळे वाढ होणार आहे.
  • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
  • PM Kusum Solar Pump Yojana 2024 (प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024) चा लाभ देशातील सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकरी आपल्या शेतात सिंचन करू शकतात.
  • देशातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज पुरवठा नाही, असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
PM Kusum Solar Pump Yojana 2024

PM Kusum Solar Pump Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • देशातील ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोरवेल, शेततळे, बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील त्याचबरोबर ज्यांच्याजवळ पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे, असे शेतकरी.
  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही वीज पुरवठा झालेला नाही, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी अटल कृषी पंप योजना तसेच कृषी पंप योजनेचा लाभ घेतला नाही, असे शेतकरी.

PM Kusum Solar Pump Yojana 2024:अनुदान

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024” च्या माध्यमातून किती अनुदान मिळणार आहे?

मोटरखुल्या प्रवर्गातील शेतकरी बांधवांसाठी
(90 टक्के)
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांसाठी
(95 टक्के)
3 HP19,3809,690
5 HP26,9751,348
7.5 HP39,44018,720

PM Kusum Solar Pump Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • जातीचा दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • मोबाईल नंबर
  • जमिनीशी संबंधित कागदपत्रे
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • नोंदणीची प्रत इत्यादी

PM Kusum Solar Pump Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

  • PM Kusum Solar Pump Yojana 2024 (प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024) चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • तुमच्यासमोर होमपेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला ‘ऑनलाइन नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. (नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर, ई )
  • संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्या, त्यामध्ये भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करा.
  • आता ‘सबमिट’ या बटणावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर अर्जाची पावती येईल, त्याची प्रिंट काढा आणि सेव्ह करून ठेवा.
  • अशा प्रकारे मित्रांनो, प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024 ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

➡️इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाप्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

PM Kusum Solar Pump Yojana 2024:FAQ’s
PM Kusum Solar Pump Yojana 2024 (प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024) कोणी सुरू केली?

सदर योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सुरू केली आहे.

PM Kusum Solar Pump Yojana 2024 (प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024) चे उद्देश काय आहे?

देशातील शेतकऱ्यांच्या शेतात सोलारपंप बसविणे हे या योजनेच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

PM Kusum Solar Pump Yojana 2024 (प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून किती अनुदान मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलारपंप खरेदी करण्यासाठी 90 टक्के ते 95 टक्के अनुदान मिळणार आहे.

PM Kusum Solar Pump Yojana 2024 (प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.