उद्योगपती रतन टाटा यांचे निधन वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा  श्वास

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला व मृत्यू ९ ऑक्टोबर २०२४ रोजी झाला आहे. 

जगप्रसिद्ध उद्योगपती हे नाव फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात अत्यंत आदराने घेतले जाते. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.

१९६१ साली त्यांनी कौटुंबिक व्यवसायात पाऊल ठेवण्याचा  निर्णय घेतला होता. टाटा स्टीलचे दैनंदिन कामकाज पाहण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.

१९४८ साली आईवडील विभक्त झाल्यानंतर रतन टाटा यांचे संगोपन त्यांची आजी नवाजबाई  टाटा यांनी किले होते. 

त्यांनी टाटा समूहाचा व्यवसाय इतर देशांमध्ये विस्तारला आहे. 

२००८ मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात  टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली.  

टाटा कंपनीच्यामाध्यमातून त्यांनी लाखों कुटुंबाना आपलसं केलं  होत.

१९९८ मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची इंडिका कार टाटा मोटर्सने बनवली.