PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi 2024
PM Jeevan Jyoti Bima Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात PM Jeevan Jyoti Bima Yojana 2024 (प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या “प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना” च्या अंतर्गत आत्तापर्यंत देशभरातील 21.67 कोटी नागरिकांनी नाव नोंदणी केली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपयांच्या जीवन विमा कवरेजच्या माध्यमातून 21 कोटी पेक्षा जास्त कुटुंबांना मदत मिळाली आहे.
मित्रांनो, वित्त मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, “प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यावधी लोकांना फायदा मिळाला आहे, त्यामुळे देशभरातील नागरिकांचे जीवनमान सुधारले आहे. त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता आणि सुरक्षा देखील आली आहे”. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY) तसेच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) आणि प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना (PMJDY) ने सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षतेच्या दिशेने मोठी उपलब्धता मिळवली आहे.
मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आजच्या या धावपळीच्या काळात पैसा कमावणे हे किती गरजेच आहे. तसेच इतक्या कष्टाने कमवलेला पैसा आपल्या भविष्यासाठी गुंतवणे हे देखील तितकेच महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारावे, आपण कमवलेल्या पैशाने त्यांच्या आयुष्यात हातभार लागावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. या सर्व गोष्टींसाठीच जीवन विमा आजच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे.
PM Jeevan Jyoti Bima Yojana 2024 प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना म्हणजे काय?
मित्रांनो, देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. तसेच केंद्र सरकारने लोकांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी देखील विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजेच “PM Jeevan Jyoti Bima Yojana 2024 (प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024) होय. ही योजना एक सरकारी विमा योजना आहे.
PM Jeevan Jyoti Bima Yojana 2024 प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2015 मध्ये केली होती. केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये विमा संरक्षण दिले जाते. म्हणजेच ही विमा पॉलिसी असलेल्या व्यक्तीला जर एखादा आजार झाला किंवा त्याचा अपघात झाला किंवा इतर कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचा विमा मिळतो. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून देशातील कोणतीही व्यक्ती लाभ घेऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला फक्त 436 रुपये वर्षाला असा एक हप्ता जमा करायचा आहे, आणि या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेची विशेषता
या योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत देशभरातील 21.67 कोटी नागरिकांची नाव नोंदणी झाली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपये जीवन विमा कवरेज च्या माध्यमातून 21 कोटी पेक्षा जास्त कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेअंतर्गत 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 8 लाख 60 हजार 575 दावे प्राप्त झाले आहेत. ज्याची किंमत 17211.50 रुपये होती.
देशातील नागरिकांना अनिश्चितेच्या वेळी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
PM Jeevan Jyoti Bima Yojana 2024 फायदा
प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना (PMJDY) च्या माध्यमातून 53.13 कोटी खाते उघडण्यात आले आहेत. यामधील 55.6 टक्के खातेधारक महिला आहेत आणि 66.6 टक्के खाते ग्रामीण आणि शहरी भागातील आहेत. या योजनेने आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या वर्गांना बँकिंग सेवेत जोडण्याची महत्वाची भूमिका निभावलेली आहे.
जनधन खातेमधील एकूण जमा रक्कम 2,21,236 कोटी रुपये आहेत. त्याचबरोबर 15 ऑगस्ट 2024 पर्यंत खात्यामध्ये 3.6 टक्के आणि जमा रक्कम 15 टक्के नोंद करण्यात आली आहे.
मित्रांनो, या योजनेने आपल्या देशामध्ये आर्थिक सुरक्षितता मजबूत केली आहे. देशातील गरीब आणि वंचित वर्गातील नागरिकांचा आर्थिक विकास करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
PM Jeevan Jyoti Bima Yojana 2024 प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेसाठी नोंदणी कशी करावी?
PM Jeevan Jyoti Bima Yojana 2024 मित्रांनो, ज्या व्यक्तीचे बँक खाते आहे, त्यांनी आपले नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदवावे ही नोंदणी बँकेद्वारेच केली जाते. आणि तुमच्या खात्यातून प्रत्येक वर्षाला 436 रुपये कापण्याची परवानगी बँकेला तुम्हाला द्यावी लागते.
तुमच्या खात्यातून दरवर्षाला 25 मे ते 30 जून या दरम्यान हे 436 रुपये कपात केले जातात.
त्याचबरोबर नोंदणी फॉर्मवर तुमची संमती मिळाल्यानंतर हे पैसे दरवर्षी तुमच्या बँक खात्यातून कापले जातात. त्यानंतर तुमची ही विमा योजना सुरू राहते. आणि तुम्हाला जर ते सोडवायचे असेल तर ते तुम्ही कधीही सोडवू शकता.
📢 प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना अर्ज
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024“ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!