Jivhala Karj Yojana 2024:कैद्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 50 हजार रुपये कर्ज!!

Jivhala Karj Yojana In Marathi 2024

Jivhala Karj Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जिव्हाळा कर्ज योजनेच्या माध्यमातून शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी त्याचबरोबर त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत 50 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.

मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार आपल्या देशातील आणि राज्यातील नगरिकांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी त्याचबरोबर आपल्या राज्यातील नागरिकांचा आर्थिक यानी सामाजिक विकास होण्याच्या उद्देशाने सतत नवनवीन योजना राबवत असते. त्यातीलच एक योजना आज आपण जणूनण घेणार आहोत, ती म्हणजेच Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) होय.

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यातील अनेक कैदी छोट्या मोठ्या कारणावरून त्याचबरोबर कौटुंबिक वादातून किंवा इतर कुठल्या वादातून शिक्षा भोगत आहेत. कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेले हे कैदी आपल्या कुटुंबाचे कर्ते पुरुष असतात. हे कैदी आपल्या कुटुंबामधील कमावती व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचप्रमाणे उदरनिर्वाह चालवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

कुटुंबातील एक कमावती व्यक्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असल्यामुळे कुटुंबातील मुले, मुली, आई-वडील यांचे जीवन जगणे कठीण होते. त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लागणारा खर्च, आजारपणातील औषध उपचाराचा खर्च, तसेच इतर अन्य गोष्टींसाठी लागणारा खर्च अशा अनेक आर्थिक अडचणी कैद्यांच्या कुटुंबीयांना येतात. या सर्व खर्चासाठी कैद्याचे कुटुंबीय आपल्याकडील वस्तु गहाण ठेऊन जास्त व्याजदराने कर्ज घेतात. परिणामी ते कर्ज वेळेवर फेडू न शकल्याने त्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

या सर्व समस्यांचा व्यवस्थित काळजीपूर्वक विचार करून कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यात Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) सुरू करण्याचा अतीशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांना कमी व्याज दराने 50 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहाय्य करणे हे आहे.

मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील कैदी जे छोट्या मोठ्या कारणावरून त्याचबरोबर कौटुंबिक वादातून किंवा इतर कुठल्या वादातून शिक्षा भोगत आहेत, अशा कैद्यांच्या कुटुंबीयांना अतीशय कमी व्याज दराने म्हणजेच 7 टक्के व्याजदराने शासनामार्फत 50 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. जेणेकरून कैद्यांच्या कुटुंबीयांना इतर कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही. कैद्यांच्या कुटुंबीयांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? या योजनेच्या माध्यमातून काय काय फायदे होणार आहेत? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक असणार आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्णं माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

Jivhala Karj Yojana 2024

जिव्हाळा कर्ज योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावJivhala Karj Yojana 2024
(जिव्हाळा कर्ज योजना 2024)
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागसामाजिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य
योजनेची सुरुवात कधी झाली1 मे 2022
योजनेचे लाभार्थीकारागृहांमध्ये दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची कुटुंबे
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ7 टक्के व्याजदराने 50 हजार रुपये कर्ज
योजनेचे उद्देशदीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Jivhala Karj Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “जिव्हाळा कर्ज योजना 2024” चे उद्देश काय काय आहेत?

  • Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) चे मुख्य उद्देश म्हणजे दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत कमी व्याज दराने 50 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे
  • त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहाय्य करणे.
  • दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांना इतर कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची गरज भासू नये.
  • तसेच दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे.
  • कैद्यांच्या कुटुंबीयांना आपल्या दैनंदिन गरजा त्याचबरोबर आपल्या उदरनिर्वाह चलविण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये.
  • कैद्यांची मानसिकता बदलणे.
  • कैद्यांना योग्य दिशा दाखवणे जेणेकरून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे भविष्य उज्वल व्हावे.
  • दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.

Jivhala Karj Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “जिव्हाळा कर्ज योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व कारागृहांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • सर्वप्रकारच्या जाती धर्मातील कैद्यांची कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतील, कोणत्याही जात-धर्माची मर्यादा लागू नाही.
  • जिव्हाळा कर्ज योजना 2024 ही देशातील पहिली योजना आहे की ज्यामुळे कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य म्हणून कर्ज दिले जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून दीर्घकालीन कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य म्हणून 50 हजार रुपये कर्ज दिले जाते.
  • जिव्हाळा कर्ज योजना 2024 ची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आले आहे, जेणेकरून योजनेचा अर्ज करतेवेळी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून मिळणारी कर्जाची रक्कम ही थेट अर्जदारच्या बँक खात्यात डीबीटी च्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.
  • या योजेनच्या माध्यमातून कर्ज परतफेड रकमेवरील 12 टक्के निधी हा कैद्यांच्या कल्याण निधीसाठी देण्यात येतो.

Jivhala Karj Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “जिव्हाळा कर्ज योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहे?

  • महाराष्ट्र राज्यातील कारागृहांमध्ये दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Jivhala Karj Yojana 2024:लाभ

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “जिव्हाळा कर्ज योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

  • Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) अंतर्गत लाभार्थी असलेल्या कुटुंबाला शासनामार्फत 50 हजार रुपये कर्ज दिले जाते.
  • जिव्हाळा कर्ज योजना 2024 अंतर्गत अतीशय कमी व्याजदराने कर्ज दिले जाते.
  • शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या या रकमेवर 7 टक्के व्याजदर आकाराला जातो.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कोणताही कालावधी निश्चित केला गेला नाही.
Jivhala Karj Yojana 2024

Jivhala Karj Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “जिव्हाळा कर्ज योजना 2024” साठी काय काय पात्रता लागणार आहे? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती लागू आहेत?

  • जिव्हाळा कर्ज योजना 2024 चा अर्ज करण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील कारागृहांमध्ये दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाचा या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या व्यतिरिक्त इतर दुसऱ्या राज्यातील कैद्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • त्याचबरोबर कैद्यांचे कारागृहातील उत्पन्न तसेच त्यांच्या शिक्षेचा कालावधी ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असले तर कैद्यांच्या कुटुंबाला कैद्यांची संमती असणे आवश्यक आहे.
  • जर कैद्यांची संमती नसेल तर अशा कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची नसणार आहे, ती पूर्णपणे संबंधित कुटुंबाची जबाबदारी असेल.

Jivhala Karj Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “जिव्हाळा कर्ज योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • प्रतिज्ञापत्र
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • बँक खात्याचा तपशील

Jivhala Karj Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “जिव्हाळा कर्ज योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) चा अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम कुटुंबातील सदस्य शिक्षा भोगत असलेल्या कारागृहात जावे लागेल.
  • कारागृहामध्ये गेल्यानंतर तेथून संबंधित योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
  • संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.
  • संपूर्ण अर्ज परिपूर्ण भरून झाल्यानंतर कारागृहातील अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे मित्रांनो, Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाजिव्हाळा कर्ज योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४मोफत शिलाई मशीन योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४बीज भांडवल योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024आंतरजातीय विवाह योजना 2024
पीक कर्ज योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
चंदन कन्या योजना 2024इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024अपंग बस सवलत योजना 2024
सुभद्रा योजना 2024
Jivhala Karj Yojana 2024:FAQ’s
Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) ची सुरुवात कधी करण्यात आली?

Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) ची सुरुवात 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनाच्या मुहूर्तावर करण्यात आली.

Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील कारागृहांमध्ये दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील कारागृहांमध्ये दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना 7 टक्के व्याजदराने 50 हजार रुपये कर्ज मिळणार आहे.

Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) चे उद्देश काय आहे?

Jivhala Karj Yojana 2024 (जिव्हाळा कर्ज योजना 2024) चे मुख्य उद्देश म्हणजे दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत कमी व्याज दराने 50 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहाय्य करणे.

जिव्हाळा कर्ज योजना 2024 चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.