Apang Bus Savalat Yojana 2024:अपंग व्यक्तींना मिळणार मोफत बस प्रवास!!

Apang Bus Savalat Yojana In Marathi 2024

Apang Bus Savalat Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील अपंग व दिव्यांग नागरिक एसटी बसने अगदी मोफत किंवा सवलतीच्या दरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकणार आहेत.

चला तर मग जाणून घेऊया “अपंग बस सवलत योजना 2024” ची सविस्तर माहिती जसे की, ही योजना नक्की काय आहे? ही योजना कोणी सुरू केली? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश व वैशिष्ट्ये? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे? त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत.

मित्रांनो, आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून आपल्या राज्यातील नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा, तसेच राज्यातील नागरिकांचा सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने राज्य सरकार विविध योजना राबवत असते. अशातच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील अपंग तसेच दिव्यांग नागरिकांच्या हितासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) होय.

Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) राज्यातील अपंग व दिव्यांग नागरिकांना एसटी बस प्रवासात सवलत देते. या योजनेच्या माध्यमातून अनेक अपंग व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सवलतीच्या आधारे प्रवास करता येतो. मित्रांनो, ही योजना आपल्या राज्यातील अपंग व दिव्यांग नागरिकांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.

Apang Bus Savalat Yojana 2024

अपंग बस सवलत योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावApang Bus Savalat Yojana 2024
(अपंग बस सवलत योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देशआपल्या महाराष्ट्र राज्यातील अपंग व दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीराज्यातील अपंग व दिव्यांग व्यक्ती
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभएक वर्षाचा मोफत बस प्रवास
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Apang Bus Savalat Yojana 2024 नक्की काय आहे?

आपल्या राज्यातील अपंग व दिव्यांग नागरिकांच्या हितासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेली Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठी एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC एसटी बसचे अगदी मोफत पास दिले जातात.

Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) अंतर्गत 100 टक्के अपंग असलेल्या नागरिकांना एसटी बस मध्ये विनामूल्य प्रवास करता येणार आहे. तसेच जे नागरिक 40 टक्के ते 99 टक्के पर्यंत अपंग आहेत अशा व्यक्तींना एसटी बस मध्ये प्रवासाच्या भाड्यावर 50 टक्के सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर या व्यतिरिक्त राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा नागरिकांना देखील 50 टक्के सवलत मिळणार आहे.

Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) या योजनेअंतर्गत राज्यातील अपंग व दिव्यांग व्यक्ती तसेच जेष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागा बसमध्ये उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा व्यक्तींना बस स्टँडवरून बसपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हीलचेअर आणि इतर सुविधा देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून नक्कीच आपल्या राज्यातील अपंग व दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागणार आहे. त्यांच्यासाठी ही योजना अतीशय महत्वाची योजना ठरणार आहे.

Apang Bus Savalat Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग बस सवलत योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • आपल्या महाराष्ट्र राज्यातील अपंग व दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारणे, हे अपंग बस सवलत योजना 2024 चे मुख्य उद्देश आहे.
  • तसेच अपंग व दिव्यांग व्यक्तींना एसटी बसमध्ये सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे.
  • अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे सोपे बनविणे.
  • अशा व्यक्तींना आपल्या समाजात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठी समाजात समान संधी निर्माण करून देणे.
  • त्याचबरोबर राज्यातील अपंग व दिव्यांग नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • तसेच अपंग व दिव्यांग व्यक्तींना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Apang Bus Savalat Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग बस सवलत योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • राज्यातील अपंग व दिव्यांग नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेली Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) ही एक महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील अपंग व दिव्यांग नागरिकांना भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून 100 टक्के अपंग असलेल्या व्यक्तींना अगदी मोफत एसटी बसमध्ये प्रवास करता येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील अपंग व्यक्तींचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे, तसेच अपंग व्यक्ती सशक्त व आत्मनिर्भर बनणार आहेत. एकूणच या योजनेच्या माध्यमातून अपंग व्यक्तींचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागणार आहे.
  • या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे सदर योजनेचा अर्ज करताना अर्जदारास कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
  • आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ हा आपल्या राज्यातील अपंग असलेले पुरुष व महिला या दोघांनाही घेता येणार आहे.

Apang Bus Savalat Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग बस सवलत योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) साठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील अपंग व दिव्यांग व्यक्ती अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
Apang Bus Savalat Yojana 2024

Apang Bus Savalat Yojana 2024:लाभ

चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग बस सवलत योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

  • अपंग बस सवलत योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC च्या माध्यमातून अपंग व दिव्यांग व्यक्तींना एसटी बसचे मोफत वार्षिक पास दिले जातात.
  • या योजनेचा लाभ हा आपल्या राज्यातील सर्व वयोगटातील अपंग व्यक्तींना दिला जाणार आहे.
  • Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) मुळे नक्कीच राज्यातील अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारणार आहे.
  • राज्यातील 100 टक्के अपंग असलेल्या व्यक्तींना अगदी मोफत एसटी बसने प्रवास करता येणार आहे.
  • तसेच 40 टक्के ते 99 टक्के अपंग असलेल्या व्यक्तींना एसटी बसच्या प्रवासाच्या खर्चामध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.
  • या योजनेमुळे अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

Apang Bus Savalat Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग बस सवलत योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?

  • Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही, तसेच त्यांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ दिला जाणार नाही.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ हा केवळ अपंग व दिव्यांग व्यक्तींनाच दिला जाणार आहे.
  • सदर योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार व्यक्ती हा अपंग व दिव्यांग असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर 01 मे 2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात आपत्यांची कुटुंबे अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त असल्यास या योजनेच्या लाभ घेता येणार नाही.
  • आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असल्याचा दाखला प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Apang Bus Savalat Yojana 2024

Apang Bus Savalat Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग बस सवलत योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अपंग व्यक्तीचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  • लाईट बिल
  • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC अपंग स्मार्ट कार्ड असल्यास झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Apang Bus Savalat Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मित्रांनो, जाणून घेऊया “अपंग बस सवलत योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) चा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीस सर्वप्रथम आपल्या जवळील महानगरपालिका कार्यालयात जावे लागणार आहे.
  • त्यानंतर कार्यालयातून सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे.
  • अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व अचूकपद्धतीने भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • आता तुम्हाला तुम्ही भरलेला अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे, संपूर्ण माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती योग्य असल्यास तुम्ही तुमचा अर्ज संबंधित कार्यालयात जमा करू शकताय.
  • अशा प्रकारे मित्रांनो, Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “अपंग बस सवलत योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024पंचायत समिती योजना 2024
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना 2024
गटई स्टॉल योजना 2024स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024
प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 2024
महामेष योजना 2024मध केंद्र योजना 2024
आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024मुख्यमंत्री राजश्री योजना 2024
Apang Bus Savalat Yojana 2024:FAQ’s
Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने केली आहे.

Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

आपल्या महाराष्ट्र राज्यातील अपंग व दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) च्या माध्यमातून कोण लाभ घेऊ शकणार आहे?

अपंग बस सवलत योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील अओंग व दिव्यांग व्यक्तींना लाभ दिला जाणार आहे.

Apang Bus Savalat Yojana 2024 (अपंग बस सवलत योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.