प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्या;आणि मिळवा 3 लाख रु. कर्ज!!PM Vishwakarma Yojana 2024|

Table of Contents

PM Vishwakarma Yojana 2024 In Marathi

PM Vishwakarma Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला या लेखात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ विषयी संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकार आपल्या देशातील तसेच राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा म्हणून सतत नवनवीन योजना सुरू करत असते. आपल्या राज्यातील तरुणांसाठी कर्ज योजना जेणे करून त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, राज्यातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या विमा योजना, आरोग्य सुविधा, राज्यातील तरुणांसाठी स्कॉलरशिप योजना, महत्वाचं म्हणजेच राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी निवृत्ती वेतन योजना, अपंग आणि विधवा महिलांसाठी पेन्शन योजना त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना अशा विविध प्रकारच्या योजना सरकार राबवत असते, त्यातीलच एक म्हणजे “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४” होय.

मित्रांनो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांच्या भाषणात PM Vishwakarma Yojana 2024 ची घोषणा केली. प्रधानमंत्री विश्वकर्मा केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेतील उमेदवारांना केंद्र सरकारकडून १४० पेक्षा अधिक विश्वकर्मा समुदायातील जातींना कमीत कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ अंतर्गत सरकारकडून विविध सुविधांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे.

आपण या लेखात नक्की काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? या योजनेसाठी इच्छूक नागरिकांनी अर्ज कसा करायचा आहे? या योजेनचे फायदे काय काय आहेत? योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहे? योजेनचे मुख्य उद्देश काय आहे? ही योजना कोनाद्वारे कार्यरत आहे? या योजनेचा अर्ज केल्यानंतर नागरिकांना किती अनुदान मिळणार आहे? ई सर्व माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. कृपया खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील दिलेल्या माहितीनुसार, विश्वकर्मा समुदायातील सर्व जातींच्या लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. तसेच ज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि ते ह्या योजनेसाठी पात्र आहेत तर त्यांना सरकारकडून फक्त ५% व्याजदरावर रु.३,००,०००/- पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. मित्रांनो ही रक्कम लाभार्थ्यांना आपल्या बँक खात्यामध्ये दोन टप्प्यात दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रु. १,००,०००/- आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रु. २,००,०००/- असे कर्ज दिले जाईल. आपल्या भारत देशातील कारागीर शिल्पकार आणि इतर पात्र नगरिकांसाठी ही योजना खूपच महत्वाची अशी योजना आहे. कृपया खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

PM Vishwakarma Yojana 2024

PM Vishwakarma Yojana 2024: प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत?

चला तर मग मित्रांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ साठी पहिल्या टप्प्यात खाली दिलेल्या एकूण १८ पारंपरिक उद्योगांचा समावेश केला जाईल. यासाठी कोण कोण पात्र असणार आहे ते जाणून घेऊया ;

अ. क्र.पात्र असणारे नागरिकअ. क्र.पात्र असणारे नागरिक
१)सुतार१०)चर्मकार (पादत्राणे कारागीर)
२)होडी बांधणी कारागीर११)मेस्त्री
३)चिलखत बनवणारे१२)टोपल्या, चटया, झाडू बनवणारे
४)लोहार१३)बाहुल्या आणि पारंपरिक खेळणी बनवणारे
५)हातोडी आणि इतर अवजार बनवणारे१४)न्हावी (केश कर्तनकार)
६)कुलूप बनवणारे१५)फुलांचा हार बनवणारे कारागीर
७)सोनार१६)परीट (धोबी)
८)कुंभार१७)शिंपी
९)शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम करणारे), पाथरवट (दगड फोडणारे)१८)मासेमारचे जाळे विणणारे

PM Vishwakarma Yojana 2024: Eligibility [प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी पात्रता]

मित्रांनो, या योजनेसाठी नागरिकांकडे कोणती कोणती पात्रता आवश्यक आहे, याची माहिती खाली दिलेली आहे, ती काळजीपूर्वक वाचा ⤵️⤵️⤵️

  • प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ चा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा कुशल कारागीर तसेच शिल्पकार असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या उमेदवाराकडे आपले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • मित्रांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ चा लाभ घेण्यासाठी विश्वकर्मा समाजातील १४० पेक्षा जास्त जातीचे लोकच पात्र असतील.

PM Vishwakarma Yojana 2024: महत्वाची माहिती

  • मित्रांनो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ अंतर्गत सर्व कारागिर शिल्पकारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल .
  • तसेच यामध्ये कुशल तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासह विद्यावेतन दिले जाईल.
  • सवलतीचे व्याजदर आणि तब्बल दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
  • त्याचप्रमाणे प्रशिक्षितांना PM Vishwakarma Certificate आणि ओळखपत्र देण्यात येणार आहे.
  • कुंभार, चांभार, लोहार, धोबी, गवळी, माळी समाजाला याचा खूप फायदा होईल.

PM Vishwakarma Yojana 2024: योजनेचे फायदे

चला तर मग मित्रांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ चे फायदे काय काय आहे ते जाणून घेऊया;

  • प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ चा उद्देश कारागीर आणि कारागिरांद्वारे केलेल्या उत्पादनांची आणि सेवांची गुणवत्ता आणि सुलभता वाढवणे आहे.
  • कौशल्य विकास प्रशिक्षण, टूलकिट्स, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे वर्धित बाजारपेठ प्रवेश आणि व्यापार मेळयांमध्ये सहभाग देऊन स्थानिक आणि जागतिक मूल्य शृंखलामध्ये त्याचे एकत्रीकरण सुलभ करण्याचा प्रयत्न करते.
  • प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये कारागिरांना मूल्य साखळीत समाकलीत करणे.
  • त्यांना मोठे व्यवसाय,सरकारी प्रकल्प आणि निर्यात बाजारपेठेशी जोडणे, या सर्व गोष्टींवर भार देण्यात आला आहे.
  • ही त्यांना उच्च उत्पन्न निर्माण करण्यास आणि अर्थव्यवस्थेत अधिक भरीव योगदान देण्यास सक्षम करते. हा कार्यक्रम पाच वर्षात सुरू होणार आहे.
  • सुरुवातीच्या वर्षात 5 लाख कुटुंबे आणि पाच वर्षांच्या कालावधीत 3 दशलक्ष कुटुंबांना याचा फायदा होणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून पारंपारिक कलाकार आणि शिल्पकलेच्या व्यक्तींना त्यांच्या उत्पादनांची स्थानिक उपयोगाच्या वाढीसाठी संपूर्ण समर्थन केले जाते.
  • प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ अंतर्गत त्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण, विकास आणि बाजार समर्थन मिळवायला तसेच प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक दिवशी प्रशिक्षण मोफत दिले जाते, आणि त्यासोबतच रोज 500 रुपये भत्ता दिला जातो.

PM Vishwakarma Yojana 2024: Important Documents [महत्वाची कागदपत्रे]

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणती कोणती कागदपत्रे असावीत, खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • ओळखपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • मूळ पत्ता असणारे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक खाते पासबुक
  • पॅन कार्ड
  • चालू मोबईल नंबर यांनी ई-मेल आयडी

PM Vishwakarma Yojana 2024: How To Apply [अर्ज कसा करायचा]

मित्रांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ साठी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️

  1. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PM Vishwakarma Yojana यांच्या https://pmvishwakarma.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे.
  2. त्यांनंतर मुख्यपृष्ठावरील लॉग इन बटणावर क्लिक करून CSC पोर्टलवर लॉग इन करा.
  3. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल.
  4. त्या अर्जात सर्वप्रथम मोबईल नंबर आणि आधार क्रमांक भरावा लागेल.
  5. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या सुचनांनुसार सर्व अर्ज व्यवस्थित आणि योग्यरित्या भरायचा आहे.
  6. त्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  7. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचे विश्वकर्मा प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या.
  8. विश्वकर्मा प्रमानपत्रामध्ये तुम्हाला एक डिजिटल आयडी मिळेल ज्याचा वापर करून तुम्ही लॉग इन करू शकताय.
  9. आणि त्यानंतर लॉग इन बटणावर क्लिक करून त्यात तुमचा नोंदणीकृत मोबईल नंबर टाका आणि पुन्हा लॉग इन करा.
  10. अर्जात सर्व माहिती अचूक तसेच योग्य पद्धतीने भरून तुमचा अर्ज पूर्ण करा.
  11. मित्रांनो, अर्जात चुकीची अथवा खोटी माहिती भरू नका.
  12. अशाप्रकारे मित्रांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ ची तुमची अर्ज प्रकिया पूर्ण होईल.

PM Vishwakarma Yojana 2024

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

मित्रांनो, आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, कर्ज मिळवण्यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. धन्यवाद !!

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024

मोफत शौचालय योजना 2024

प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024

निपुण भारत योजना 2024

महतारी वंदना योजना 2024

एचडीएफसी बँक शिष्यवृत्ती योजना 2024

कृषी उन्नती योजना 2024

राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024

विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024

महाडीबीटी शेतकरी योजना 2024

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 2024

प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024

महामेष योजना 2024

महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024

गोदाम अनुदान योजना 2024

युवा प्रशिक्षण योजना 2024

एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना 2024

मनोधैर्य योजना 2024

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024

फ्री सायकल योजना महाराष्ट्र 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

PM Vishwakarma Yojana 2024: प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने संबंधित काही प्रश्न खालीलप्रमाणे
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे?

मित्रांनो, तुम्ही वर दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचू शकताय. आम्ही वर दिलेल्या माहितीमध्ये अर्ज कसा करायचा आहे ती सर्व माहिती दिलेली आहे.

सदर योजनेमध्ये कर्ज किती % व्याजदराने मिळणार आहे.

या योजनेमध्ये ५% दराने कर्ज मिळणार आहे.

या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे ?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ चा लाभ घेण्यासाठी विश्वकर्मा समाजातील १४० पेक्षा जास्त जातीचे लोकच पात्र असतील.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ साठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, मूळ पत्ता असणारे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते पासबुक, पॅन कार्ड
चालू मोबईल नंबर यांनी ई-मेल आयडी
(वर दिलेली माहिती पाहू शकताय.)