Kharip Pik Vima Yojana 2024:खरीप पीक विमा योजना 2024

Kharip Pik Vima Yojana In Marathi 2024

Kharip Pik Vima Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या लेखात Kharip Pik Vima Yojana 2024 (खरीप पीक विमा योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. चला तर मग पाहूया ही योजना नक्की काय आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या योजनेच्या अर्ज कसा करायचा? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

केंद्र सरकार आपल्या देशातील शेतकरी बांधवांसाठी म्हणजेच त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे Kharip Pik Vima Yojana 2024 (खरीप पीक विमा योजना 2024) होय.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातील बहुतांश नागरिक हे शेती हा व्यवसाय करतात. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. त्याचबरोबर अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच गारपीट, दुष्काळ या मुळे शेतीतील पिकांचे नुकसान होते, परिणामी शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अचानक येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळते. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये. त्याचबरोबर त्यांना अडचणीच्या वेळी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये. ही योजना कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत राबवण्यात येत आहे. Kharip Pik Vima Yojana 2024 (खरीप पीक विमा योजना 2024) अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या 2 टक्के व रब्बी पिकांच्या 1.5 टक्के रक्कम विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाखों शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या तीन वर्षांमध्ये 13 हजार कोटी रुपयांचे प्रीमियम शेतकऱ्यांनी जमा केले होते, त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना 60 हजार कोटी रुपये पर्यंतचा पीक विमा मिळाला होता. मित्रांनो, ही योजना 27 राज्यांमध्ये त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशांत सुरू आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असले तर लाभार्थी व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

Kharip Pik Vima Yojana 2024

खरीप पीक विमा योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावप्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना
योजना कोणी सुरू केलीही योजना केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे
राज्यमहाराष्ट्र
योजनेचे मुख्य उद्देशआपल्या देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची नुकसान भरपाई देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीदेशातील सर्व शेतकरी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभशेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पीक विमा
अर्क करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️
शासन निर्णय [GR]➡️येथे क्लिक करा⬅️

Kharip Pik Vima Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाची नुकसान भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना सुरू केली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • देशातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून आणणे.
  • त्याचबरोबर शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य करणे.
  • शेतकरी बांधवांना चिंतामुक्त करणे.

Kharip Pik Vima Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • Kharip Pik Vima Yojana 2024 (खरीप पीक विमा योजना 2024) ही योजना केंद्र सरकारने आपल्या देशातील शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली एक अतीशय महत्वाची योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणजेच दुष्काळ, गारपीट यामुळे होणाऱ्या शेतीच्या पिकाचे नुकसान भरपाई दिली जाते.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत खरीप पिकांच्या 2 टक्के व रब्बी पिकांच्या 1.5 टक्के रक्कम विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे.
  • ही योजना ठरवून दिलेल्या प्रमाणे अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठीच लागू आहे.
  • Kharip Pik Vima Yojana 2024 योजना ही कर्जदार शेतकरी तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक योजना आहे.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 या वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.

Kharip Pik Vima Yojana 2024: योजनेचे लाभार्थी

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • Kharip Pik Vima Yojana 2024 (खरीप पीक विमा योजना 2024) साठी आपल्या देशातील सर्व शेतकरी बांधव अर्ज करू शकतात.

Kharip Pik Vima Yojana 2024: लाभ

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

  • सदर योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पीक विमा देण्यात येणार आहे.

Kharip Pik Vima Yojana 2024:विमा कधी मिळणार

  • हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी तसेच लावणी न झाल्यास होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी शासनामार्फत अर्थी सहाय्य केले जाते.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच दुष्काळ, गारपीट, पूर येणे, चक्रीवादळ, शेतात पावसाचे पाणी साचून शेत मालाचे नुकसान ई. यामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी या योजनेअंतर्गत मदत केली जाते.
  • त्याचबरोबर पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेअंतर्गत सहाय्य केले जाते.

Kharip Pik Vima Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • जमिनीचा 7/12 उतारा
  • 8 या उतारा
  • पीक विमा माहिती अर्ज
  • पीकपेरा घोषणापत्र
  • पीक विमा प्रीमियम शुल्क
  • बँक खात्याचा तपशील

➡️पीकपेरा घोषणापत्र येथे पहा ⬅️

Kharip Pik Vima Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना” चा अर्ज कसा करायचा आहे?

Kharip Pik Vima Yojana 2024
  • प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे नवीन अकाऊंट उघडण्यासाठी ‘Registration‘ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे.
  • रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगइन करायचे आहे.
  • लॉगइन केल्यानंतर आता तुमच्या समोर प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना 2024 चा अर्ज दिसेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक आणि अचूक भरायची आहे.
  • त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • आता तुम्हाला पुन्हा एकदा भरलेला अर्ज तपासून घ्यायचा आहे, संपूर्ण माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • तुम्ही भरलेली माहिती अचूक असल्यास शेवटी ‘सबमीट‘ या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना 2024 ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा असल्यास तुम्ही तुमच्या विभागातील कृषी सह संचालक, नजीकच्या बँका, CSC सेंटर तसेच तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकताय.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाप्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024बीज भांडवल योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४डिझेल पंप सबसिडी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
जिव्हाळा कर्ज योजना 2024ताडपत्री अनुदान योजना 2024
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024नवीन स्वर्णिमा योजना 2024
बांधकाम कामगार योजना 2024हर घर नल योजना 2024
Kharip Pik Vima Yojana 2024:FAQ’s
Kharip Pik Vima Yojana 2024 (खरीप पीक विमा योजना 2024) कोणी सुरू केली?

सदर योजना केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे.

Kharip Pik Vima Yojana 2024 (खरीप पीक विमा योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

आपल्या देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची नुकसान भरपाई देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Kharip Pik Vima Yojana 2024 (खरीप पीक विमा योजना 2024) साठी कोण कोण पात्र आहे?

सदर योजनेसाठी भारत देशातील सर्व शेतकरी बांधव पात्र आहेत.

Kharip Pik Vima Yojana 2024 (खरीप पीक विमा योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

या योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.