
NCMC Card ST Travel 2026: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला एसटी बसने सवलतीच्या दरात प्रवास करत असाल, तर महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळाने प्रवासातील पारदर्शकता वाढवण्यासाठी त्याचबरोबर डिजिटल तिकीट प्रणालीला चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे.
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या नव्या नियमाची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जर 1 ऑगस्ट 2026 नंतर तुमच्याकडे हे अधिकृत NCMC कार्ड नसेल, तर तुम्हाला एसटी बसमधील प्रवासाची 50% किंवा 100% ची सवलत मिळणार नाही आणि तुम्हाला पूर्ण भाडे द्यावे लागेल.
NCMC Card ST Travel 2026 NCMC कार्ड म्हणजे काय?
National Common Mobility Card (NCMC) हे एक स्मार्ट कार्ड आहे. ज्याच्या मदतीने प्रवासी डिजिटल पद्धतीने तिकीट काढू शकतात. हे कार्ड एटीएम किंवा डेबिट कार्डसारखे दिसते आणि त्यात पैसे रिचार्ज करून ठेवता येतात.
महाराष्ट्रातील ST बसमध्ये हे कार्ड वाहकांकडे असलेल्या ETIM मशीनवर टॅप करून तिकीट काढता येते. त्यामुळे रोख पैसे देण्याची गरज कमी होते आणि प्रवास अधिक सोपा आणि जलद होतो.
महत्त्वाचं म्हणजे NCMC हे कार्ड केंद्र सरकारच्या “One Nation, One Card” या उपक्रमाचा भाग असून सार्वजनिक वाहतुकीत डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
NCMC कार्ड बंधनकारक करण्यामागचे उद्देश?
NCMC Card ST Travel 2026 महाराष्ट्र सरकारने आणि एसटी महामंडळाने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी हे National Common Mobility Card (NCMC) कार्ड बंधनकारक करण्यामागे 5 मुख्य उद्देश आहेत:
- बनावट आणि बोगस ओळखपत्रांना आळा घालणे.
- पारदर्शकता आणि अचूक हिशोब
- सुट्या पैशांची कटकट मिटवणे
- तिकीट प्रक्रियेत वेग आणणे
- ‘वन नेशन, वन कार्ड’ मोहिमेला चालना देणे
असे काही NCMC कार्ड बंधनकारक करण्यामागचे उद्देश आहेत.
1 ऑगस्ट 2026 पासून कोणासाठी NCMC कार्ड आवश्यक असेल?
NCMC Card ST Travel 2026 1 ऑगस्ट 2026 पासून पहिल्या टप्प्यात खालील प्रवाशांना हे कार्ड सोबत ठेवणे अनिवार्य आहे, त्यानंतर पुढे टप्प्याटप्प्याने इतर सवलत प्रवर्गांनाही हा नियम लागू केला जाणार आहे.
- महिला प्रवासी: ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत मिळणारी 50% तिकीट सवलत घेण्यासाठी
- ज्येष्ठ नागरिक (वय 65 ते 75 वर्षे): 50% तिकीट दरात प्रवास सवलतीसाठी
- अमृत ज्येष्ठ नागरिक (वय 75 वर्षांपेक्षा जास्त): 100% मोफत प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी
NCMC Card ST Travel 2026 कार्डसाठी नोंदणी कशी करावी?
मित्रांनो, एसटी महामंडळाच्या महितीनुसार, आत्तापर्यंत राज्यातील 51 लाखांहून अधिक नागरिकांनी या कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 25 लाख कार्ड सक्रिय देखील झाले आहेत.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
- विशिष्ट प्रवर्गाचे प्रमाणपत्र (उदा- दिव्यांग असल्यास UDID कार्ड)
NCMC Card ST Travel 2026 नोंदणीची पद्धत:
- तुम्हाला जवळील एसटी आगार आणि प्रमुख बस स्थानकांवर जाऊन या कार्डची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल.
- तसेच एसटी महामंडळाने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भाग आणि शहरी भागात 4,000 हून अधिक अधिकृत स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सुरू केली आहेत.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत फी पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाई तसेच परवाना रद्द करण्याचा इशारा देखील परिवहन विभागाने दिला आहे.
⇒ हे देखील वाचा: अपंग व्यक्तींना मिळणार मोफत बस प्रवास!!
NCMC Card ST Travel 2026 प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
राज्यातील लाखो महिला आणि ज्येष्ठ नागरिक एसटी बसचा नियमित प्रवास करतात. त्यामुळे NCMC कार्डबाबतची माहिती प्रत्येक पात्र प्रवाशांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रवाशांनी आधीपासूनच NCMC कार्ड काढून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून 1 ऑगस्ट 2026 नंतर एसटी प्रवासात तुम्हाला कोणतीही तांत्रिक अडचण त्याचबरोबर सवलत बंद होण्याची भीती राहणार नाही.
⇒ हे देखील वाचा: NCMC कार्ड, नोंदणी प्रक्रिया आणि ST प्रवासातील सवलतींबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
निष्कर्ष
1 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्रातील एसटी प्रवासात एक मोठा डिजिटल बदल पाहायला मिळणार आहे. या नवीन NCMC कार्ड प्रणालीमुळे प्रवास अधिक आधुनिक आणि सोयीस्कर असला तर प्रवाशांनी वेळेत तयारी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हा बदल भविष्यातील ‘Cashless Transport System’ कडे टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
धन्यवाद!
