Maratha students OBC benefits GR 2026: मोठा निर्णय! संपूर्ण माहिती, पात्रता आणि फायदे

Maratha Students OBC Benefits GR 2026 Maharashtra Government Educational Concessions

Maratha students OBC benefits GR 2026: नमस्कार मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 5 जून 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे. त्यामध्ये मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी (OBC) विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती त्याचबरोबर शिष्यवृत्ती आणि विविध सुविधा लागू करण्यात आल्या आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील लाखो मराठा विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, आपण या लेखात नवीन शासन निर्णय (GR) ची संपूर्ण माहिती, फायदे, पात्रता आणि आवश्यक असणारी कागदपत्रे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

Maratha students OBC benefits GR 2026 मुख्य उद्दिष्ट

राज्यातील मराठा समाजातील कोणताही गुणवंत विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या योजेनचा मुख्य उद्देश आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच शैक्षणिक सवलती तसेच विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय चालू शैक्षणिक वर्ष 2026-27 पासूनच संपूर्ण महाराष्ट्रात लागू केला जात आहे.

Maratha Students OBC Educational Benefits GR 2026 Scholarships and Fee Reimbursement

कोणत्या प्रमुख सवलती मिळणार ?

मित्रांनो, नवीन शासन निर्णयानुसार खालील एकूण 8 प्रमुख सवलती आता मराठा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

  1. उत्तर माध्यमिक शिष्यवृत्ती
    • इयत्ता 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी म्हणजेच 11 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जाईल.
  2. सारथीमार्फत वाहन चालक प्रशिक्षण:
    • ओबीसी उमेदवारांप्रमाणेच मराठा तरुण-तरुणींना मोटर वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना सारथी पोर्टलद्वारे राबवली जाईल.
  3. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती:
    • इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शालेय शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल.
  4. ITI (आयटीआय) व व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती:
    • सरकारी तसेच खाजगी आयटीआय संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळेल.
  5. महाविद्यालयीन शिक्षणासाठी विविध शुल्क प्रतिपूर्ती:
    • अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांप्रमाणेच विविध 16 बाबींसाठी प्रतिपूर्ती मिळेल.
  6. परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ:
    • महाराष्ट्रातील रहिवासी असलेले आणि इतर राज्यांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत मिळेल.
  7. OBC विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती:
    • पात्र अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सुविधा मिळतील.
  8. रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांनाही लाभ:
    • केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमधील रिक्त जागांवर संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सर्व सवलती लागू असतील.

Maratha students OBC benefits GR 2026 साठी पात्रता निकष

शासन निर्णयानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय ओबीसी (OBC) विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा लाभ दिला जाणार आहे.

या सवलतींसाठी पात्र असलेले विद्यार्थी संबंधित शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती किंवा शैक्षणिक योजनांच्या नियमांनुसार लाभ घेऊ शकतील. तसेच महाराष्ट्रातील रहिवासी असलेले आणि परराज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थीही या योजनांसाठी पात्र ठरू शकतात.

Maratha students OBC benefits GR 2026 आवश्यक कागदपत्रे

सदर शासन निर्णयात आवश्यक कागदपत्रांची स्वतंत्र यादी देण्यात आलेली नाही.

मात्र संबंधित शिष्यवृत्ती किंवा शुल्क प्रतिपूर्ती योजनेनुसार विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित विभाग आणि MahaDBT पोर्टलवर जाहीर करण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज कसा आणि कुठे करावा?

Maratha students OBC benefits GR 2026 मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी शासनाने MahaDBT पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मित्रांनो, अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना MahaDBT पोर्टलवरून संबंधित शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती किंवा शैक्षणिक सवलत योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. त्याचबरोबर अर्ज प्रक्रियेबाबतची अधिकृत माहिती संबंधित विभाग आणि MahaDBT पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल.

Maratha students OBC benefits GR 2026 FAQ

मराठा विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती देणारा GR कधी जारी झाला?

महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय 5 जून 2026 रोजी जारी केला आहे.

Maratha students OBC benefits GR 2026 या सवलती कधीपासून लागू होणार आहेत?

शासन निर्णयानुसार या तरतुदी चालू शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून लागू होतील.

मराठा विद्यार्थ्यांना कोणते लाभ मिळणार आहेत?

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती, आयटीआय शुल्क प्रतिपूर्ती, व्यावसायिक शिक्षणासाठी विविध सवलती, सारथीप्रमाणे प्रशिक्षण तसेच OBC विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या इतर शैक्षणिक सवलतींचा लाभ मिळणार आहे.

CAP नंतर संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल का?

होय. CAP प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती लागू राहतील.

परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल का?

होय. महाराष्ट्रातील रहिवासी असलेले आणि परराज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थीही पात्र असतील.

भविष्यात OBC साठी सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक योजना मराठा विद्यार्थ्यांना लागू होतील का?

होय. शासन निर्णयानुसार OBC प्रवर्गासाठी भविष्यात लागू होणाऱ्या सवलती आणि सोयी-सुविधा मराठा समाजालाही लागू होतील.

अधिकृत शासन निर्णय (GR) पहा

निष्कर्ष

Maratha students OBC benefits GR 2026 मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी हा शासन निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती आणि इतर शैक्षणिक सवलतींचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा आता मराठा विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहेत. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळून शिक्षणाचा खर्च कमी होण्यास मदत होईल. मित्रांनो, अर्ज प्रक्रिया आणि संबंधित माहितीसाठी तुम्ही MahaDBT पोर्टलवर भेट देऊ शकता.

अशाच शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती आणि सरकारी निर्णयांचे ताजे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट देत रहा.

धन्यवाद!