Vidarbha School Reopening 2026: मोठा बदल!शाळा आता 1 जुलै पासून सुरू होणार

Vidarbha School Reopening 2026: नमस्कार मंडळी, विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मित्रांनो, या आधी सरकारने 15 जून 2026 पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तो बदलून शाळा 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहेत.

Vidarbha School Reopening 2026 update showing school students and changed reopening date from 15 June to 1 July

Vidarbha School Reopening 2026 मोठा बदल

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की विदर्भात उन्हाळा खूप जास्त असतो त्याचबरोबर विदर्भातील तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे लहान मुलांना इतक्या कडक उन्हात शाळेत जाणे कठीण आणि त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच अनेक पालकांनी आणि शिक्षकांनी शाळा उशिरा सुरू कराव्यात अशी मागणी केली होती.

याच कारणामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले आणि नागपूर खंडपीठात यावर सुनावणी झाली. तिथे सांगण्यात आले की विदर्भात उन्हाळा जास्त असल्यामुळे लहान शाळकरी मुलांना इतक्या कडक उन्हात शाळेत जाणे कठीण आहे, त्यामुळे शाळा थोड्या उशिरा सुरू करणे योग्य आहे.

न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर आणि शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयामुळे शाळा सुरू होण्याची तारीख बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता विर्भातील सर्व शाळांना 30 जून 2026 पर्यंत उन्हाळ्याची सुट्टी वाढवण्यात आली असून 1 जुलैपासून शाळा सुरू होतील.

Vidarbha School Reopening 2026 या निर्णयानंतर शिक्षण विभागाने नवीन आदेश दिला आहे, शाळा सुरू होण्याआधी पाणी, स्वच्छता, वर्गखोल्या आणि इतर सुविधा व्यवस्थित आहेत की नाही हे तपासले जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांनाही दिलासा मिळाला आहे. आता मुलांना कडक उन्हात शाळेत जावे लागणार नाही. तसेच शाळांना तयारीसाठी थोडा जास्त वेळ मिळेल.

काही शिक्षकांना मात्र अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल का याची चिंता आहे. पण शिक्षण विभागाने सांगितले आहे की अभ्यासक्रमाचे योग्य ते नियोजन केले जाईल.

Vidarbha School Reopening 2026 एकूणच, विदर्भातील शाळा सुरू होण्याची नवीन तारीख 1 जुलै 2026 ठरली आहे आणि त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

⇒ हे देखील पहा: Vidarbha School Reopening 2026: मोठा बदल, शाळा आता 1 जुलैपासून सुरू वेबस्टोरी

Vidarbha School Reopening 2026 निष्कर्ष:

Vidarbha School Reopening 2026 एकूणच, विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या तारखेत झालेला हा बदल विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे. तीव्र उन्हाळ्याचा विचार करून शाळा आता 15 जून ऐवजी 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला असून शाळांना तयारीसाठीही अधिक वेळ मिळणार आहे. आता नवीन शैक्षणिक वर्ष 1 जुलैनंतर उत्साहात सुरू होईल.

धन्यवाद!

⇒ हे देखील वाचा: Maratha students OBC benefits GR 2026: मोठा निर्णय! संपूर्ण माहिती, पात्रता आणि फायदे