Bij Bhandval Yojana 2024: व्यवसाय करण्यासाठी तरुणांना मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज!!

Bij Bhandval Yojana In Marathi 2024

Bij Bhandval Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Bij Bhandval Yojana 2024 (बीज भांडवल योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील तरुण तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. जेणेकरून राज्यातील तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करतील आणि इतर बेरोजगार तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहे? या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो? या योजनेअंतर्गत किती लाभ मिळणार आहे? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? या योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो, आपण पाहतच आहोत की, आपल्या राज्यातील मोठ्याप्रमाणात तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत. आजच्या घडीला आपल्या तरुण मित्र मैत्रिणींना नोकरीच्या शोधात इकडे तिकडे फिरावे लागत आहे. त्यांच्या जवळ मोठ्या मोठ्या डिग्री असून देखील त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाहीये. या कारणांमुळे आपल्या महाराष्ट्र राज्यात मोठ्याप्रमाणात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या समस्यांना लक्षात घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्यातील तरुणांना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून महाराष्ट्र शासनाने “बीज भांडवल योजना 2024” सुरू केली आहे. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना कर्ज मिळणार आहे, जेणेकरून ते बेरोजगारीवर मात करतील आणि स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करतील.

या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जावर व्याजदर देखील कमी आहे. नक्कीच या योजनेचा आपल्या महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे. त्याचबरोबर त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास देखील या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे राज्यातील तरुणांना नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहता येणार आहे.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की बहुतांश तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असतात. परंतु त्यांच्या कडे एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते. त्याचबरोबर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येण नाही. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणी कर्ज देखील देत नाही. या कारणांमुळे बहुतांश तरुण इच्छा नसली तरीही नोकरी करत असतात मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापासून वंचित राहतात. परंतु आता या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुणांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच बेरोजगारी नष्ट करण्याच्या उद्देशाने “बीज भांडवल योजना 2024” ची सुरुवात केली आहे.

Bij Bhandval Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बीज भांडवल योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावBij Bhandval Yojana 2024 (बीज भांडवल योजना 2024)
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण
योजनेद्वारे मिळणारा लाभमहाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. (95 टक्के कर्ज)
योजनेचे उद्देशस्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Bij Bhandval Yojana 2024: योजनेचे वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, “बीज भांडवल योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत? जाणून घेऊया;

 • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे, आता त्यांना नोकरी शोधण्याची गरज भासणार नाही, त्यांचा या योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक व्हावा म्हणून ही योजना खूप फायद्याची ठरणार आहे.
 • आपल्या महाराष्ट्र राज्यातील चर्मकार समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अतीशय कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
 • बीज भांडवल योजना 2024 ही महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली एक अतीशय महत्वाची योजना आहे.
 • त्याचबरोबर बीज भांवडल योजना 2024 अंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी च्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.
 • सदर योजनेची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी असल्यामुळे इच्छुक असणाऱ्या तरुणांना या योजनेचा अर्ज करताना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

Bij Bhandval Yojana 2024: योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “बीज भांडवल योजना 2024” चे उद्देश काय काय आहेत?

 • महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
 • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील, चर्मकार समाजातील तरुणांचे जीवनमान सुधारणे, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
 • आपल्या राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना सशक्त कुटुंबांना आत्मनिर्भर बनवणे.
 • बरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
 • राज्यातील तरुण तरुणींना आर्थिक सहाय्य करून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे.
 • राज्यातील तरुणांना स्वावलंबी बनविणे, तसेच त्यांचे भविष्य उज्वल बनविणे.
 • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील, चर्मकार समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये, त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने “बीज भांडवल योजना 2024” सुरू करण्यात आलेली आहे.

Bij Bhandval Yojana 2024: योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप

 • बीज भांडवल योजना 2024 अंतर्गत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी 50,000/- रुपये ते 5 लाख रुपयांपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो.
 • या योजनेच्या माध्यमातून व्यवसायासाठी 50,000/- रुपये ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा द.सा.द.शे. 9.5 ते 12.5 टक्के व्याज दराने बँकेमार्फत करण्यात येतो.
 • बीज भांडवल योजना 2024 अंतर्गत मंजूर झालेले बँकेचे कर्ज 75 टक्के रक्कम राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते.
 • उर्वरित 5 टक्के रक्कम ही लाभार्थ्याने स्वतःचा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. व उर्वरित 20 टक्के रक्कम ही महामंडळ बीज कर्ज म्हणून देते.
 • त्या रक्कमेपैकी 10,000/- रुपये अनुदान म्हणून देण्यात येते तर उर्वरित रक्कम ही 4 टक्के या व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यात येते.
 • बीज भांडवल योजना 2024 अंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड ही राष्ट्रीयकृत बँकेस व महामंडळास 36 ते 60 मासिक हप्त्यांत एकाचवेळी करावयाची असते.

Bij Bhandval Yojana 2024: पात्रता

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया सदर योजनेसाठी कोण कोण पात्र आहे?

 • अर्जदार व्यक्ती कमीत कमी इयत्ता 7 वी पास असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे.
 • सदर योजनेसाठी अर्ज करू इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा किमान 15 वर्षाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

Bij Bhandval Yojana 2024:योजनेच्या अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “बीज भांडवल योजना 2024” च्या अटी व शर्ती काय काय आहेत?

 • बीज भांडवल योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र राज्याचा बाहेरील नागरिकांना या योजेनेचा लाभ मिळणार नाही.
 • त्याचबरोबर अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
 • सदर योजनेसाठी इच्छुक असणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 45 वर्ष असावे.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी या पूर्वी अर्जदाराकडे कोणत्याही शासकीय, निमशासकीय अथवा वित्तीय संस्थेचे कर्ज बाकी असू नये, याची नोंद घ्यावी.
 • राज्य महामंडळाच्या योजनांकरीता शहरी व ग्रामीण भागतील अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 1,00,000/- तसेच केंद्रीय महामंडळाच्या योजनांसाठी शहरी भागाकरीता रु. 1,20,000/- व ग्रामीण भागाकरीता रु. 98,000/- पर्यंत असावे.
 • या योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला एकदाच कर्ज मिळेल.
 • अर्जदाराकडे आपला जातीचा दाखला तसेच वार्षिक उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
 • जर अर्जदार व्यक्ती सरकारी नोकरीत असेल तर त्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Bij Bhandval Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “बीज भांडवल योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी नागरिकांकडे कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • रहिवासी दाखला
 • बँक पासबुक
 • जातीचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • डोमेसाइल प्रमाणपत्र
 • प्रतिज्ञापत्र
 • व्यवसाय स्थळाची भाडेपावती
 • व्यवसाय स्थळाचा करारनामा, 7/12 उतारा
 • तांत्रिक व्यवसायासाठी आवश्यक असतील असे परवाने, लायसन्स
 • व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक
 • अर्जदार अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र

Bij Bhandval Yojana 2024: अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “बीज भांडवल योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

 • सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागणार आहे.
 • तिथे गेल्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन सदर योजनेचा म्हणजेच बीज भांडवल कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
 • संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
 • आणि नंतर अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यायचा आहे.
 • संपूर्ण अर्ज तपासून झाल्यानंतर कार्यालयात अर्ज जमा करायचा आहे.
 • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची “बीज भांडवल योजना 2024” ची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “बीज भांडवल योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024पीक कर्ज योजना 2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
चंदन कन्या योजना 2024इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024

कृपया ही रोजगार बातम्यांची आणि सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे आणि सरकारी योजनांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Bij Bhandval Yojana 2024:FAQ’s
बीज भांडवल योजना 2024 ही कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

सदर योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

या योजनेचे उद्देश काय आहे?

राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.

बीज भांडवल योजना 2024 चे लाभार्थी कोण कोण असणार आहे?

महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण जे स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत.

बीज भांडवल योजना 2024 द्वारे काय लाभ मिळणार आहे?

महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. (95 टक्के कर्ज)

या योजेनचे उद्देश काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील, चर्मकार समाजातील तरुणांचे जीवनमान सुधारणे, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.

सदर योजनेचा अर्ज कसा करायचा आहे?

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.