Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana In Marathi 2024
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर होऊ नये यासाठी आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
मित्रांनो, आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. जसे की राज्यभरातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी, तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी राज्यसरकार सातत्याने प्रयत्नशील असते.
अशातच राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी एक योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) होय. या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील जेष्ठ पत्रकारांना शासनामार्फत दरमहा 11,000/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 नक्की काय आहे?
प्रसिद्धी माध्यमे व पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भात मागणी विविध पत्रकार संघटना लोकप्रतिनिधी विधानमंडळ सदस्य यांच्याकडून वारंवार सरकारकडे करण्यात येत होती. त्यामुळे राज्यभरातील ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या उतरत्या वयात म्हणजेच वृद्धावस्थेत त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर होऊ नये, यासाठी राज्य सरकारने Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) सुरू करण्याचा अतीशय महत्वाचा असा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 च्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 11 हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 2018-19 मध्ये 15 कोटी त्याचबरोबर 2021-22 मध्ये 10 कोटी असे एकूण 25 कोटी इतकी रक्कम मुदत स्वरूपात गुंतवण्यात आली आहे.
महत्वाचं म्हणजे शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत ज्येष्ठ पत्रकारांच्या आर्थिक विकासासाठी Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) सुरू करण्यात आली आहे.
चला तर मग जाणून घेऊया ही योजना नक्की काय आहे? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? या योजनेचे मुख्य उद्देश काय काय आहेत? काय आहेत या योजनेची वैशिष्ट्ये? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे? महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकतो? त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजेनचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली | 2 फेब्रुवारी 2019 |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
योजनेचे मुख्य उद्देश | राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा आर्थिक विकास करणे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ पत्रकार |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | दरमहा 11,000/- रुपये आर्थिक सहाय्य मिळणार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या उतरत्या वयात म्हणजेच वृद्धावस्थेत इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये यासाठी शासनामार्फत त्यांना दरमहा 11,000/- आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
- ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या वृद्धावस्थेत आर्थिक सहाय्य करणे.
- आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ पत्रकारांचे योगदान आणि त्यांच्या क्षेत्रातील सेवांचा आदर करणे आणि त्याचबरोबर कृतज्ञता व्यक्त करणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- राज्यभरातील ज्येष्ठ पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकार लाभ मिळवू शकतात.
- त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी वव्यक्तीच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:लाभार्थी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?
- सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकार लाभ घेण्यास पात्र आहेत.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:लाभ
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 11,000/- रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. जेणेकरून त्यांना त्यांच्या वृद्धावस्थेत इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.
- तसेच पात्र असलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना राज्य सरकारमार्फत एक सन्मानपत्र आणि शाल देण्यात येणार आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहेत? कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?
- Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 60 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने वृत्तपत्र आणि इतर वृत्त प्रसारमाध्यम यांचे संपादक म्हणून 30 वर्ष काम केलेले असावे.
- तसेच सदर योजनेसाठी सलग 10 वर्ष आधीस्वीकृतीधारक असलेले पत्रकार पात्र आहेत.
- गंभीर गुन्ह्यामध्ये दोषसिद्ध होऊन शिक्षा झालेल्या पत्रकारांना सदर योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार नाही.
- अर्जदार हा फक्त पत्रकारच असणे आवश्यक आहे. या व्यतिरक्त तो कोणत्याही नोकरीत असल्यास त्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदार हा आयकर दाता नसावा.
- आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून अर्जदार हा हयात असे पर्यंतच लाभ मिळणार आहे, त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- वयाचे प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- अनुभव असल्याचा पुरावा
- बँक खात्याचा तपशील
- माध्यमांमध्ये काम करत असताना मिळालेल्या वेतनाचा पुरावा
- स्वयंघोषणापत्र
- योजनेचा अर्ज
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
- अर्जदारास सर्वप्रथम आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 चा अर्ज डाउनलोड करावा लागणार आहे.
- या योजनेसाठी ज्येष्ठ पत्रकार आणि आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी/उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय/उपसंचालक वृत्त मुंबई यांच्याकडे आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
- आणि त्यानंतर अर्ज माहिती व जनसंपर्क यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून तपासण्यात येईल व लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:FAQ’s
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?
आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 ची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारने 2 फेब्रुवारी 2019 रोजी केली.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा आर्थिक विकास करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ पत्रकार या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 11,000/- रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.