MahaDBT Biyane Anudan Yojana 2024:शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदानावर बियाणे!!असा करा अर्ज

Table of Contents

MahaDBT Biyane Anudan Yojana In Marathi 2024

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या लेखात MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. राज्य सरकार आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांचा आर्थिक विकास व्हावा, तसेच राज्यातील शेतकरी बांधव आत्मनिर्भर व्हावेत. अशीच एक योजना आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) होय.

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) नक्की काय आहे? ही योजना कोणी सुरू केली? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहे? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? त्याचबरोबर या योजेनच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्या पिकांची बियाणे दिली जाणार आहेत? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या खालील लेखाद्वारे पाहणार आहोत.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024

महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावMahaDBT Biyane Anudan Yojana 2024
(महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र सरकार
योजनेची सुरुवात कधी झाली2007-08 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागकृषी विभाग
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा लाभशेतकऱ्यांना विविध पिकांचे बियाणे मिळणार
पिकेअन्नधान्य, कडधान्य, तृणधान्य, फळबाग
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 नक्की काय आहे?

आपल्या हक्काचे सरकार म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार 2007-08 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) ची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतीला आवश्यक असणारे बियाणे मोफत देणार आहे. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी महाराष्ट्र शासनामार्फत बियाणे वाटप हे शेती हंगामाच्या सुरुवातीला म्हणजेच जून मध्ये करण्यात येते. तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे वाटप हे पीक लागवडीच्या पूर्वी म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान करण्यात येते.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जास्तीत जास्त पिके घेऊन चांगले उत्पन्न घेता यावे तसेच राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने म्हणजेच एकूणच आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाने ही योजना सुरू करण्याचा अतीशय महत्वाचा असा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार शेतकरी सोयाबीन, कापूस, वाटाणा, मसूर ई पिकांच्या बियाण्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

मित्रांनो, तुम्हालाही या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असेल तर खालील लेख संपूर्ण वाचा, तसेच हा लेख आपल्या जवळील शेतकरी मित्रांना त्याचबरोबर आपल्या जवळील नातेवाईकांना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांनाही MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेता येईल.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024:कोणत्या बियाण्यांच्या खरेदीवर अनुदान मिळणार

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024” च्या माध्यमातून कोणत्या बियाण्यांच्या खरेदीवर अनुदान मिळणार आहे?

  • कापूस
  • उडीद
  • तूर
  • नाचणी
  • बाजरी
  • भुईमूग
  • भात
  • मूग
  • सोयाबीन

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024:समाविष्ट जिल्हे आणि त्यांना दिली जाणारी बियाणे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024” च्या माध्यमातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या बियाण्यांच्या खरेदीवर अनुदान मिळणार आहे?

पिकेजिल्हा
कापूसयवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती
बाजरीनगर, नाशिक, जळगाव, सातारा, पुणे,सांगली, बीड, संभाजीनगर, धाराशिव, जालना, धुळे
ज्वारीनगर, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, धाराशिव, नांदेड, कोल्हापूर, परभणी, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, बीड, जालना
ऊससंभाजीनगर, बीड, जालना
कडधान्यमहाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पात्र आहेत.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024:लाभ

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

  • सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना विविध पिकांची बियाणे खरेदी करण्यासाठी 50 टक्के ते 100 टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे.
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024:पात्रता

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे?

  • MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही.
  • त्याचबरोबर अर्जदार शेतकऱ्याच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्याकडे आपल्या जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदार शेतकऱ्यांकडे शेतीला आवश्यक मुबलक प्रमाणात सिंचन सुविधा असणे आवश्यक आहे.
  • महत्वाचं म्हणजे महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024 अंतर्गत अर्जदार शेतकरी अनुसूचित जाती -जमाती मधील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकरी जर गहू,तांदूळ, कापूस, डाळिंब व ऊस या पिकासाठी अर्ज करत असेल तर अर्ज करताना शेतकरी संबंधित जिल्ह्याचा असणे आवश्यक आहे.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
  • पूर्व समंतीपत्र

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
  • त्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांना शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला होमपेजवर ‘नवीन अर्जदार नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे.
  • तुमची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ‘शेतकरी योजना’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेती विषयक योजना दिसतील, त्यामध्ये तुम्हाला ‘महाडीबीटी बियाणे अनुदान योजना’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सदर योजनेचा अर्ज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या पिकासाठी तसेच किती पिकासाठी बियाणे अनुदान पाहिजे, अशी सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आता तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आपल्या अर्जासोबत अपलोड करावी लागणार आहेत.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना तुम्हाला 26. 60/- रुपये ऑनलाइन अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे.
  • तुम्हाला आता तुम्ही भरलेला अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे, आपण भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती अचूक असल्यास आता तुम्हाला ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे तुमचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमीट होईल, आणि कृषी विभागाकडे सादर केला जाईल.
  • तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांच्या आत कृषी विभागातील कृषी सहाय्यक आधिकारी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवून देतील.
  • त्यानंतर अनुदान स्वरूपात बियाणे पॅकिंग पिशव्या तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात काही दिवसातच दिल्या जातील.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
सुभद्रा योजना 2024ड्रोन अनुदान योजना 2024
बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024मोफत फवारणी पंप योजना 2024
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024:FAQ’s
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024 ची सुरुवात महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) ची सुरुवात कधी करण्यात आली?

सदर योजनेची सुरुवात 2007-08 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत करण्यात आली आहे.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे, हे या महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024 चे मुख्य उद्देश आहे.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024 साठी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना विविध पिकांची बियाणे खरेदी करण्यासाठी 50 टक्के ते 100 टक्के अनुदान शासनामार्फत दिले जाणार आहे.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.