Subhadra Yojana 2024:सुभद्रा योजना 2024|महिलांना मिळणार 50 हजार रुपये!

Subhadra Yojana In Marathi 2024

Subhadra Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून महिलांना भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास देखील हातभार लागणार आहे.

चला तर जाणून घेऊया ही योजना नक्की काय आहे? ही योजना कोणी सुरू केली? या योजनेची सुरुवात कधी करण्यात आली? या योजनेचे मुख्य उद्देश आणि वैशिष्ट्ये काय काय आहेत? महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र ठरणार आहे? कोण कोण या योजनेसाठी पात्र आहे? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

केंद्र आणि राज्य सरकार आपल्या राज्यातील व देशातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. जसे की आपल्या राज्यातील व देशातील तरुणांसाठी विविध कर्ज योजना, त्याचबरोबर देशभरातील शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना, वृद्ध व्यक्तींसाठी विविध पेन्शन योजना, राज्यातील महिलांच्या विकासासाठी योजना, त्याचबरोबर आपल्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना, एकूणच आपल्या देशभरातील नागरिकांच्या विकासासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. अशातच सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) होय.

Subhadra Yojana 2024

सुभद्रा योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावSubhadra Yojana 2024
(सुभद्रा योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीओडिसा सरकार
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली17 सप्टेंबर 2024
योजनेचे मुख्य उद्देश कायराज्यातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीओडिसा राज्यातील महिला
योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा लाभया योजनेच्या माध्यमातून महिलांना 50,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Subhadra Yojana 2024 नक्की काय आहे?

ओडिसा राज्य सरकारने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर 2024 रोजी Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) ची सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ओडिसा राज्यातील सर्व महिलांना 17 सप्टेंबर 2024 पासून या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे. ही योजना ओडिसा मध्ये भाजप सरकारने सुरू केली आहे.

Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) च्या माध्यमातून लाभार्थी महिलांना 50,000/- रुपये पर्यंत कॅश व्हाउचर दिले जाणार आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून 21 वर्ष ते 60 वर्ष वय असणाऱ्या 1 कोटी पेक्षा जास्त महिलांना पुढील येणाऱ्या 5 वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षाला 10,000/- रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.

मित्रांनो, ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी विधानसभेत Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) ची घोषणा केली असून ही योजना 17 सप्टेंबर 2024 म्हणजेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ओडिसा सरकारने 55 हजार 825 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना एकूण 50,000/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. ही मदत 2024-25 ते 2028-29 पर्यंत केली जाणार आहे. याचाच अर्थ असा की प्रत्येक वर्षाला 10,000/- रुपये 2 टप्प्यात 5-5 हजार रुपये महिलांना दिले जातील. महत्वाचं म्हणजे रक्षाबंधन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस या दिवशी ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

Subhadra Yojana 2024: योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “सुभद्रा योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत ?

  • राज्यातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • त्याचबरोबर महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • ओडिसा राज्यातील महिलांना पुढील 5 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षाला 10,000/- रुपये याप्रमाणे 50,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना सहाय्य करून महिलांचे सक्षमीकरण करणे.

Subhadra Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “सुभद्रा योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • ओडिसा सरकारने राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर 2024 Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना वार्षिक 10,000/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
  • ही रक्कम महिलांना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे दोन हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे.
  • त्याचबरोबर Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) ही 2024-25 ते 2028-29 पर्यंत चालू राहणार आहे.
  • अशा एकूण 5 वर्षाच्या कार्यकाळात महिलांना 50,000/- रुपये दिले जाणार आहेत.
  • ही लाभाची रक्कम लाभार्थी असलेल्या महिलांच्या थेट बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.
  • त्यासोबतच महिलांना डेबिट कार्ड देखील दिले जाईल.
  • आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत आणि शहरी संस्था सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणाऱ्या 100 महिलांना 500/- रुपये अतिरिक्त दिले जातील.
Subhadra Yojana 2024

Subhadra Yojana 2024:लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “सुभद्रा योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) च्या माध्यमातून ओडिसा राज्यातील महिला अरजब करण्यास पात्र आहेत.

Subhadra Yojana 2024:लाभ

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “सुभद्रा योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ दिला जाणार आहे?

  • सुभद्रा योजना 2024 च्या माध्यमातून ओडिसा राज्यातील महिलांना 50,000/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
Subhadra Yojana 2024

Subhadra Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “सुभद्रा योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?

  • Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी फक्त ओडिसा राज्यातील महिलाच पात्र आहेत.
  • त्याचबरोबर महिलांचे वय 21 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार नाही.
  • आयकर भरणाऱ्या महिलाही या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवू शकणार नाहीत.
  • महत्वाचं म्हणजे ज्या महिला या पूर्वीच्या काळात राज्य सरकारच्या 1500 रुपयांच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

Subhadra Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “सुभद्रा योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • विज बिल
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Subhadra Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “सुभद्रा योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी अर्जदार महिलांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • त्यासाठी अर्जदार महिलांना सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल.
  • त्यामध्ये तुम्हाला ‘ऑनलाइन अर्ज करा’ हा पर्याय निवडायचा आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला योजनेचा अर्ज दिसेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व अचूकपद्धतीने भरायची आहे.
  • त्याचबरोबर आता तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
  • संपूर्ण माहिती तसेच कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यायचा आहे, संपूर्ण माहिती अचूक आहे की नाही यांची खात्री करणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती अचूक असल्यास आता तुम्हाला ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे तुमची ‘Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024)’ ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “सुभद्रा योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
Subhadra Yojana 2024:FAQ’s
Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?

ओडिसा राज्य सरकारने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर 2024 रोजी Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) ची सुरुवात केली आहे.

Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे, हे सुभद्रा योजना 2024 चे मुख्य उद्देश आहे

Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) चे लाभार्थी कोण कोण आहेत?

ओडिसा राज्यातील महिला या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

Subhadra Yojana 2024 (सुभद्रा योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सुभद्रा योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.