Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024:एकात्मिक बाल विकास योजना 2024|

Ekatmik Bal Vikas Seva Yojana In Marathi 2024

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 (एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील 6 वर्षांखालील बालकांच्या विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

चला तर मग जाणून घेऊया “एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024” ची सविस्तर माहिती जसे की, नक्की काय आहे ही योजना? या योजनेची सुरुवात कोणी केली? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश? महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या सेवा पुरविल्या जातात? ई संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024

एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावEkatmik Bal Vikas Seva Yojana 2024
(एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीकेंद्र सरकार
योजनेचे मुख्य उद्देश कायराज्यातील सहा वर्षांखालील लहान मुलांचे पोषण आहाराचा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे लाभार्थीराज्यातील 6 वर्षांखालील बाळ व त्यांच्या माता
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभपोषण आहार व आरोग्य सेवा
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 नक्की काय आहे?

राज्यातील 6 वर्षांखालील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 (एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून बालक आणि माता यांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 (एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024) च्या माध्यमातून भोजन, प्राथमिक आरोग्य सेवा, पोषण आहार, लसीकरण, आरोग्य व पोषण शिक्षण ई सेवा पुरविल्या जातात. जेणेकरून आपल्या राज्यातील 6 वर्षांखालील बालके व त्यांच्या माता सदृढ राहतील.

या सर्व सेवा आयसीडीएस केंद्राच्या मार्फत पुरविल्या जातात. मित्रांनो, आयसीडीएस ला ‘अंगणवाडी’ असे म्हंटले जाते. स्थानिक पातळीवरील अंगणवाडी केंद्र हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा प्रमुख आधारभूत उपक्रम आहे. महत्वाचं म्हणजे आयसीडीएस हा आपल्या केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांपैकी एक आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येतो.

आपल्या राज्यात आयसीडीएस उपक्रमाचे एकूण 553 प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये 364 ग्रामीण, 85 आदिवासी तसेच 104 शहरी झोपडपट्टींमध्ये आहेत.

लहान बालकांच्या आरोग्य व पोषण आहाराच्या समस्या त्यांच्या मातेचा विचार न करता सोडविणे शक्य नाही म्हणूनच हा उपक्रम किशोरवयीन मुली, गरोदर महिला, स्तनपान करणाऱ्या माता यांच्या पर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे. katmik Bal Vikas Seva Yojana 2024 (एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024) च्या माध्यमातून आपल्या राज्यातील लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य सेवा, निगा आणि शाळा पूर्व शिक्षण ह्या सेवा पुरविण्यात येतात.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग जाणून घेऊया “एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • आपल्या राज्यातील सहा वर्षांखालील लहान मुलांचे पोषण आहाराचा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणे, हा Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 (एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024) चा मुख्य उद्देश आहे.
  • त्याचबरोबर त्यांचा मानसिक, शारीरिक तसेच सामाजिक विकासाचा पाया मजबूत करणे.
  • आपल्या राज्यातील लहान मुलांच्या आकस्मित मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करणे.
  • त्याचबरोबर कुपोषण आणि शाळाबाह्यतेला प्रतिबंध करणे.
  • महत्वाचं म्हणजे राज्यभरातील लहान मुलांच्या मातांना आरोग्य आणि पोषण मूल्यांची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षित करणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे. जेणेकरून माता आपल्या मुलांचे संगोपन व्यवस्थित करू शकतील.
  • राज्यातील लहान बाळाबरोबरच गर्भवती महिलांना देखील पौष्टिक आहार पुरविणे.
  • योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे आरोग्य पोषणयुक्त राहील याबाबतच्या आवश्यकतेची काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम बनविणे.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024:योजनेद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सुविधा

चला तर मग जाणून घेऊया “एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024” च्या माध्यमातून कोणत्या कोणत्या सुविधा पुरविल्या जातात?

  • राज्यातील बालकांना आणि महिलांना पूरक पोषण आहार देणे.
  • लहान बाळांचे लसीकरण योग्य वेळी करणे.
  • त्यांची आरोग्य तपासणी करणे.
  • आरोग्य संबंधित सर्व सेवा पुरविण्याचे काम करणे.
  • अनौपचारिक शाळा पूर्व शिक्षण देणे.
  • त्याचबरोबर पोषण आणि आरोग्य शिक्षण देणे.
  • इत्यादी सेवा Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 (एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024) च्या माध्यमातून पुरविल्या जातात.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
सुभद्रा योजना 2024

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024:FAQ’s

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 (एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 (एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024) ची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 (एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील सहा वर्षांखालील लहान मुलांचे पोषण आहाराचा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 (एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

राज्यातील 6 वर्षांखालील बाळ व त्यांच्या माता त्याचबरोबर गर्भवती महिला या Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 (एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.