Modi Awas Gharkul Yojana 2024:मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत मिळणार 10 लाख लाभार्थ्यांना हक्काची घरे!!

Modi Awas Gharkul Yojana 2024

Modi Awas Gharkul Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात मोदी आवास घरकुल योजना 2024 बद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. “सर्वांसाठी घरे – २०२४” हे राज्यशासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना “सन २०२४” पर्यंत स्वतःचे घर मिळावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे या धोरणानुसार ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत विविध योजनांतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना तसेच निवासी प्रयोजनार्थ शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करून देणे इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येतात.

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांची निवड सामाजिक,आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाच्या माहितीनुसार राज्यातील राज्यातील कुटुंबाची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामसभेमार्फत यादी तयार करण्यात आली. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना इ. उपलब्ध आहेत.

इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरीता अशा प्रकारच्या कोणत्याही योजना अस्तित्वात नाही. इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहत आहेत. सन २०२३-२०२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतांना मा. उप. मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी इतर मागास वर्गासाठी ३ वर्षात १० लाख घरे पूर्ण करण्यासाठी “मोदी आवास” घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी नवीन “मोदी आवास”घरकुल योजना राबविण्याबाबतचा मंत्रीमंडळ प्रस्ताव मान्य झाला आहे.

Modi Awas Gharkul Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Modi Awas Gharkul Yojana 2024:शासन निर्णय

● राज्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी “मोदी आवास” घरकुल योजना राबविण्यात शासन मान्यता देत आहे.

 1. आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी
 2. आवास प्लस प्राणलीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टम द्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी
 3. जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी

Modi Awas Gharkul Yojana 2024:योजनेचे स्वरूप

● उपरोक्त १, २ आणि ३ मध्ये समाविष्ट असलेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रु १.२० लक्ष अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे. या योजने अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना किमान २६९ चौ. फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक राहील.

 • या योजने अंतर्गत लाभार्थ्यांची निवड वरील १,२ आणि ३ मधून उपलब्ध झालेल्या कुटुंबाच्या यादीमधून निवड करण्यात येईल.
 • सदर उपलब्ध यादीमधून प्राप्त उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्रधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
 • या योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाहणी यापूर्वी झाली नसेल अशा लाभार्थ्यांची स्थळ पाहणी करण्यात येईल.
 • ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांचे मार्फत करण्यात येईल, त्यानंतर मान्यतेसाठी जिल्हास्तरावर पाठविण्यात येईल.

● ग्राम सभेने निवड केलेल्या लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावर खालील प्रमाणे जिल्हास्तरीय निवड समिती गठीत करण्यात यावी.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदअध्यक्ष
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणासदस्य
उप अभियंता / शाखा अभियंता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणासदस्य
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारीसदस्य सचिव

Modi Awas Gharkul Yojana 2024:जिल्हास्तरीय निवड समितीची कार्ये

● समिती दर तीन महिन्यातून एकदा आवश्यकतेनुसार योजनेचा आढावा घेऊन योजनेची अंमलबजावणी सुलभरितीने होण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करेल. सदस्य सचिवांकडून घरकुल योजनेच्या अनुषंगाने सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावांवर निर्णय घेईल व त्या अनुषंगाने निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करेल. लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर तालुकानिहाय पात्र लाभार्थ्यांची यादी पुढील कार्यवाहीसाठी तालुक्याकडे पाठवेल.
● सामाजिक अंकेक्षण – योजनेचे सामाजिक अंकेक्षणप्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीणच्या धर्तीवर करण्यात येईल.

Modi Awas Gharkul Yojana 2024:लाभार्थी पात्रता

 1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
 2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षे असावे.
 3. लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न रु. १. २० लाखापेक्षा जास्त नसावे.
 4. लाभार्थ्यांचे स्वतःच्या अथवा कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
 5. लाभार्थ्यांकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे. अथवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
 6. लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण /गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
 7. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
 8. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.

Modi Awas Gharkul Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

 • ७/१२ उतारा
 • मालमत्ता नोंदपत्र
 • ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र
 • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
 • आधार कार्ड
 • स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्डची प्रत
 • रेशन कार्ड
 • निवडणूक ओळखपत्र
 • विद्युत बिल
 • मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्यांच्या स्वतःच्या नवे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत

Modi Awas Gharkul Yojana 2024:प्राधान्य क्षेत्र

● लाभार्थी यादी पात्र करतांना ग्रामनसभेने विचारात घ्यावयाचे प्राधान्यक्षेत्र खालीलप्रमाणे असतील.

 • घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा/परितक्त्या महिला, कुटुंब प्रमुख.
 • पूरग्रस्त क्षेत्रातील लाभार्थी अथवा पिडीत लाभार्थी.
 • जातीय दंगलीमुळेघराचे नुकसान (आग व इतर तोडफोड) झालेली व्यक्ती.
 • नैसर्गिक आपत्तीबाधीत व्यक्ती.
 • दिव्यांग व्यक्ती :- उद्दिष्टाच्या किमान ५% उद्दिष्ट दिव्यांगांकरीता राखीव ठेवणे अवशीज आहे.
 • इतर पात्र कुटुंबे.

Modi Awas Gharkul Yojana 2024:अर्थसहाय्य वितरण पद्धती

सदर योजनेची अंमलबाजवणी, समन्वय ग्रामविकास विभागांतर्गत असलेले राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय करेल. जिल्हा पातळीवर सदर योजनेची अंमलबजावणी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचेमार्फत करण्यात येईल. योजनेकरिता आवश्यक निधी राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांचेकडे शासनामार्फत वर्ग करण्यात येईल.

घरच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापन कक्ष -ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे (PFMS) निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल. घरकुल योजने अंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ /दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरिता प्रति घरकुल रु. १.३० लक्ष व सर्वसाधारण क्षेत्राकरीता प्रति घरकुल रु. १.२० लक्ष अर्थसहाय्य देय राहील.

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण योजनेप्रमाणे, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय असलेले अनुदान ९०/९५ दिवस अकशुल मजुरीच्या स्वरूपात अभिसरणाद्वारे अनुज्ञेय राहील. तसेच शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देय असलेले रु. १२,०००/- प्रोत्साहनपर अनुदानास देखील लाभार्थी पात्र असेल. सदर योजने अंतर्गत आवश्यक निधीची तरतूद विभागामार्फत करण्यात येईल.

Modi Awas Gharkul Yojana 2024:वित्तीय भार

● या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षामध्ये इतर मागास प्रवर्गातील 10,00,000 पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ खालीलप्रमाणे देण्याचे प्रस्तावित आहे.

वर्ष उद्दिष्ट आर्थिक भार
२०२३-२४३ लाखरु. ३६०० कोटी
२०२४-२५३ लाखरु. ३६०० कोटी
२०२५-२६४ लाखरु. ४८०० कोटी
एकूण१० लाखरु. १२००० कोटी

● सदर योजनेची अंमलबजावणी संनियंत्रण व समन्वय ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण या यंत्रणेमार्फत करण्यात येईल. त्याकरिता राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास ४% प्रशासकीय निधी म्हणून देय राहील.

● या योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरीता वरील प्रमाणे वर्षनिहाय निधी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.

● सदर योजनेसाठी होणारा खर्च मागणी क्र. झेडजी- ३, २२२५ – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक यांचे कल्याण, ०३, मागासवर्गीयांचे कल्याण, १०२, आर्थिक विकास, (०१), विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण, (०१), (१२) इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांकरीता मोदी आवास घरकुल योजना (२२२५ एफ ७८२) कार्यक्रम), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशीर्षाखाली मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

मित्रांनो, योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील शासन निर्णय (GR) वाचा.

इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय :- ➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला मोदी आवास घरकुल योजना २०२४ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024

मोफत उच्चशिक्षण योजना २०२४

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४

शबरी घरकुल योजना २०२४

सावित्री बाई फुले शिष्यवृत्ती योजना २०२४

कृपया ही रोजगार बातम्यांची आणि सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे आणि सरकारी योजनांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Modi Awas Gharkul Yojana 2024:FAQs

मोदी आवास घरकुल योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना “सन २०२४” पर्यंत स्वतःचे घर मिळावे.

किती उमेदवारांना याचा लाभ घेता येणार आहे?

१० लाख लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

घर बांधणीसाठी सरकार किती अर्थसहाय्य करणार आहे?

घरकुल योजने अंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ /दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरिता प्रति घरकुल रु. १.३० लक्ष व सर्वसाधारण क्षेत्राकरीता प्रति घरकुल रु. १.२० लक्ष अर्थसहाय्य देय राहील.