Savitribai Fule Scholarship Yojana 2024:सावित्री बाई फुले शिष्यवृत्ती योजना २०२४|

Table of Contents

Savitribai Fule Scholarship Scheme 2024

Savitribai Fule Scholarship Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. काय आहे ही योजना, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहे, तसेच पात्र असणाऱ्या व्यक्तींनी कोणती कोणती कागदपत्रे सादर करावी, सावित्रीबाई फुले योजनेचा अर्ज कसा भरावा, कशाप्रकारे आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे ई सर्व माहिती आम्ही खाली सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृपया खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्ही वाचू शकताय.

मित्रांनो, सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ति म्हणून त्यांना ओळखले जाते. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले.

सावित्रीबाई फुले यांनी समान संधीचा प्रचार आणि सामाजिक अडथळे दूर करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या शिक्षणाच्या महत्वपूर्ण समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सन्मानार्थ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून मुलींसाठी त्याचबरोबर महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.

महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सतत प्रयत्न केले जातात. मित्रांनो, आपण पाहतच आहोत की आज काल दिवसेंदिवस सरकारी शाळेतील मुलींची संख्या घटत चालली आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इयत्ता 7 वे ते इयत्ता 10 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. जेणे करून त्या मुलींना शिक्षणात कोणत्याही प्रकारचे अढथळे येऊ नये, त्याचप्रमाणे त्यांना देखील उच्चशिक्षण घेता यावे. चला तर मग मित्रांनो, या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

Savitribai Fule Scholarship Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Savitribai Fule Scholarship Yojana 2024: सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

योजनेचे संपूर्ण नावसावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभशिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ देणे
लाभार्थीइयत्ता 5 वी ते इयत्ता 7 वी मध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थिनी
योजेनचे मुख्य उद्देशमहाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याकणहे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देणे
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कसा करावाऑनलाइन/ऑफलाइन

Savitribai Fule Scholarship Yojana 2024:मुख्य वैशिष्ट्ये

मित्रांनो, काय आहेत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची मुख्य वैशिष्ट्ये, जाणून घेऊया:

 • महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत “सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची’ स्थापना करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलींसाठी ही एक महत्वाची योजना ठरलेली आहे.
 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 5 वी ते इयत्ता 7 वी मध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलींसाठी एक महत्वाची योजना आहे.
 • आपण पाहतच आहोत की आज काल दिवसेंदिवस सरकारी शाळेतील मुलींची संख्या घटत चालली आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इयत्ता 7 वे ते इयत्ता 10 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे.
 • मुलींना शिक्षण घेता यावे त्यामुळे या योजेनच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देऊन मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त केले जात आहे.
 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2024 अंतर्गत दिली जाणारी रक्कम ही विद्यार्थिनींच्या राष्ट्रीयकृत खात्यामध्ये डी. बी. टी च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
 • त्याचबरोबर मित्रांनो, मुलींना भविष्यात उच्चशिक्षण घेण्यासाठी देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अर्थसाहाय्य करते.
 • मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. यासाठी मुलींनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

Savitribai Fule Scholarship Yojana 2024:मुख्य उद्देश

मित्रांनो, काय आहेत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची मुख्य उद्देश, जाणून घेऊया:

 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2024: महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 5 वी ते इयत्ता 7 वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज प्रवर्गातील तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र राज्यात शैक्षणामध्ये मुलींची संख्या वाढावी त्याचबरोबर कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची स्थापना करण्यात आली आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील मुलांच्या शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणे.
 • मुलींना शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनवणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे हे देखील या योजनेचे उद्देश आहे.
 • त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब मागास असलेले कुटुंब मुलींसाठी पैसे भरून शिक्षण देऊ शकत नाहीत अशा मुलींना आर्थिक दृष्ट्या मदत करणे व त्यांना शिक्षणासाठी मदत करणे.
 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींमध्ये शैक्षणिक गुणवत्ता असून देखील मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यासाठी योजनेसाठी माध्यमातून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा देखील या योजने मागील उद्देश आहे.
 • मित्रांनो, एकंदरीतच या योजनेचा लाभ घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुलींना नक्कीच शिक्षणासाठी भरपूर मदत मिळणार आहे.
 • नक्कीच या योजनेमुळे राज्यातील मुलींच्या शिक्षणामध्ये भर पडणार आहे.
 • शिक्षणासाठी मुलींनी कुटुंबाकडे कोणत्याही प्रकारे पैशासाठी आग्रह करू नये किंवा कोणत्याही बँकेतून कर्ज काढू नये व आपलया नातेवाईकांकडे हात पसरू नये या साठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

Savitribai Fule Scholarship Yojana 2024: पात्रता

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2024 साठी कोण कोण पात्र आहे, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा

 • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • विशेष मागास वर्ग (SBC), विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT), अनुसूचित जाती (SC) असणे आवश्यक आहे.
 • इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादेची आवश्यक नाही.
 • त्याचबरोबर इयत्ता 5 वी ते 7 वी मधील मुलींसाठी योजनेच्या सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलींना प्राधान्य मिळेल.
 • महाराष्ट्राच्या सरकारी, अनुदानित किंवा विनाअनुदानित माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 5 वी ते 10 पर्यंतचा विद्यार्थी असावा.

Savitribai Fule Scholarship Yojana 2024:किती आर्थिक सहाय्य मिळणार

 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेमध्ये इयत्ता 5 वी ते 7 वी मधील विद्यार्थिनींना दरमहा 60 रुपये याप्रमाणे 10 महिन्यांकरिता 600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.
 • इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना 10 महिन्यांसाठी प्रतिमहा 100 रुपये, प्रतिवर्ष 1000 रुपये.

Savitribai Fule Scholarship Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, सदर योजनेसाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, जाणून घेऊया खालील माहितीमध्ये

 1. आधार कार्ड
 2. रेशन कार्ड
 3. रहिवासी दाखला
 4. ई-मेल आयडी
 5. मोबईल नंबर
 6. पासपोर्ट आकाराचे फोटो
 7. मागील संलग्न अभ्यासक्रमाच्या/विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेची प्रत
 8. वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलदाराने दिलेला)
 9. राष्ट्रीयकृत बँक बचत खाते पासबुकची झेरॉक्स प्रत
 10. प्रतिज्ञापत्र

Savitribai Fule Scholarship Yojana 2024: अर्ज कसा करावा

मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते पाहूया.

● ऑफलाइन पद्धत

 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2024 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराने आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे.
 • तिथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन अर्ज घ्यावा.
 • अर्जात सर्व माहिती पुरेपूर आणि अचूक पद्धतीने भरावी.
 • माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडावी.
 • आणि नंतर अर्ज संपूर्ण माहिती भरलेली आहे की नाही ते तपासून जमा करावा.
 • अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकताय.

● ऑनलाइन

 • अर्जदाराने प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे.
 • त्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे.
 • लॉगइन केल्यानंतर सर्व माहिती अचूक आणि योग्यरित्या भरावी.
 • शाळा, मुख्याध्यापकांची संपर्क माहिती, विद्यार्थी नोंदणी क्रमांक व्यवस्थि भरावा.
 • त्यानंतर नवीन पेज तुमच्यासमोर आल्यानंतर त्यामध्ये बँकेची माहिती, तुमचा पत्ता, अर्जदाराची माहिती आणि शाळेची माहिती भरून सेव्ह करा वर क्लिक करा.
 • त्यांनंतर “अर्ज सबमिट करा” या वर क्लिक करा.
 • आता अर्जात भरलेली संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल, सर्व माहिती पुन्हा तपासा आणि आवश्यक असल्यास त्यामध्ये सुधारणा करा.
 • सर्व माहिती अचूक असल्यास सबमिट करा.
 • अशा प्रकारे मित्रांनो तुमचा ऑनलाइन अर्ज तुम्ही सादर करू शकताय.

Savitribai Fule Scholarship Yojana 2024: महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइट ➡️येथे क्लिक करा⬅️
इतर सरकारी योजना ➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024

मोदी आवास घरकुल योजना 2024

मोफत उच्चशिक्षण योजना २०२४

सुकन्या समृद्धी योजना 2024

मोफत शौचालय योजना 2024

कृपया ही रोजगार बातम्यांची आणि सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे आणि सरकारी योजनांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Savitribai Fule Scholarship Yojana 2024: FAQ’s
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना कुणासाठी लागू आहे.

सदर योजना ही महाराष्ट्रातील मुलींसाठी लागू होणार आहे.

कोणत्या प्रवर्गातील मुलींना या योजनेचा फायदा होणार आहे?

महाराष्ट्र राज्यातील वीजाभज /विमाप्र प्रवर्गातील मुलींना या योजनेचा फायदा होणार आहे.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2024 साठी अर्ज करण्याची पद्धती काय आहे?

ऑनलाइन /ऑफलाइन अर्ज पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.