Shabari Gharkul Yojana 2024:बेघर बांधवांना घर बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये !!

Shabari Gharkul Scheme 2024

Shabari Gharkul Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपल्या या नोकरी आणि सरकारी योजनेच्या मराठी वेबसाइटवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण या लेखात शबरी घरकुल योजना २०२४ बाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आम्ही अशी आशा करतो की तुम्ही हा लेख काळजीपूर्वक वाचाल. तसेच तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल तर खाली दिलेल्या माहितीच्या आधारे या योजनेसाठी अर्ज करू शकताय. चला तर मग मित्रांनो, शबरी घरकुल योजना २०२४ ची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो, आपल्या भारत देशात तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनामार्फत त्याचप्रमाणे राज्य शासनामार्फत विविध प्रकारच्या अनेक सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविल्या जातात. या सरकारी योजनांपैकीच एक म्हणजे “शबरी घरकुल योजना” आहे. या योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहे, कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, त्याचबरोबर सदर योजनेच्या अर्जासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत आणि म्हणूनच हा लेख तुम्ही संपूर्ण वाचने आवश्यक आहे.

शबरी घरकुल योजना २०२४ अंतर्गत अनेक बेघर बांधवांना त्यांची स्वतःची घरे बांधण्यासाठी सरकार त्यांना अनुदान देणार आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना याचा भरपूर फायदा होणार आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील ज्या नागरिकांना राहण्यासाठी आपली स्वतःची पक्के घरे नाहीत, अशा नागरिकांना त्यांची स्वतःच्या हक्काची पक्की घरे उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना कार्य करते.

मित्रांनो, आपल्या माहितीच असेल की आज देखील महाराष्ट्र राज्यातील अनेक अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची पक्के घरे नाहीत, ते आज देखील मातीच्या कच्च्या घरात तसेच झोपडीत वास्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांना ऊन, वारा, पाऊस अशा अनेक समस्यांना प्रत्येक वर्षी तोंड द्यावे लागते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र सरकारने “शबरी घरकुल योजना” सुरू करण्याचा हा एक अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जमाती मधील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबाला २६९ चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून दिले जाते.

Shabari Gharkul Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Shabari Gharkul Yojana 2024:सविस्तर माहिती

● शबरी घरकुल योजना २०२४ आढावा

योजनेचे संपूर्ण नावशबरी घरकुल योजना
विभागआदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र
राज्यमहाराष्ट्र राज्य
उद्देशशबरी घरकुल योजने अंतर्गत पक्के घर बांधून देणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि वंचित असणारे नागरिक
वर्ष२०२४
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन अर्ज पद्धत
द्वारे सुरूमहाराष्ट्र सरकार

Shabari Gharkul Yojana 2024: घर बांधण्यासाठी देण्यात येणारी रक्कम

ग्रामीण क्षेत्र१ लाख ३२ हजार रुपये
नक्षलवादी व डोंगराळ भाग१ लाख ४२ हजार रुपये
नगर परिषद क्षेत्र१ लाख ५० हजार
नगरपालिका क्षेत्र२ लाख रुपये

Shabari Gharkul Yojana 2024: योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, “शबरी घरकुल योजना २०२४”ची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत जाणून घेऊया

 • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण अतिदुर्गम भागातील आदिवासी समुदायासाठी आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने “शबरी घरकुल योजना” सुरू केली आहे.
 • मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड प्राधान्य क्रमाने करण्यात येते.
 • मित्रांनो, शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाचा विकास होण्यास मदत होणार आहे.
 • शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांचे स्वतःचे घर बांधून झाल्यानंतर याच योजनेच्या माध्यमातून शौचालय बांधण्यासाठी देखील मदत मिळणार आहे.
 • या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी सरकारकडून १.२० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे.
 • शबरी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करताना ग्राम सभा, पंचायत समिति, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून मंजूरी देण्यात येते.
 • या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाजातील कुटुंबांना, पारधी जमातीच्या कुटुंबांना, निराधार, विधवा महिलांना, दुर्गम भागातील कुटुंबांना प्राधान्य देण्यात येईल.
 • महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक ब आर्थिक विकास होण्यासाठी सदर योजना महत्वाची ठरणार आहे.

Shabari Gharkul Yojana 2024: मुख्य उद्देश

शबरी घरकुल योजनेचे मुख्य उद्देश पुढीलप्रमाणे

 • महाराष्ट्र राज्यातील जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत अशा कुटुंबांना राहण्यासाठी निवारा म्हणजेच त्यांना घर उपलब्ध करून देणे.
 • महाराष्ट्र राज्यातील ज्या कुटुंबाकडे कच्च्या मातीची घरे तसेच जे झोपडीत राहतात अशा अनुसूचित समाजातील कुटुंबांना राहण्यासाठी पक्के घर उपलब्ध करून देणे हे या शबरी योजनेचे मुख्य उद्देश आहे.
 • त्याचबरोबर जे कुटुंब दारिद्रयरेषेखाली आपले जीवन जगत आहेत, त्यांना स्वतःची पक्की घरे बांधून देणे आणि त्यांना जगण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे.
 • महाराष्ट्र राज्यातील अतिदुर्गम तसेच डोंगराळ भागातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या कुटुंबांचा विकास करणे.
 • अतिदुर्गम डोंगराळ भागात वास्तव्य करणाऱ्या मुख्य प्रवाहापासून लांब असणाऱ्या अनेक कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणणे.
 • जे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांच्याकडे हवे तेवढे पैसे नसतात त्यामुळे त्यांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून शबरी घरकुल योजना अंतर्गत त्यांना घरे बांधून देणे.

Shabari Gharkul Yojana 2024:आवश्यक पात्रता

शबरी घरकुल योजना २०२४ साठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे

 • शबरी घरकुल योजना २०२४ चा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील कुटुंब शबरी घरकुल योजनेसाठी पात्र असतील.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Shabari Gharkul Yojana 2024: महत्वाची कागदपत्रे

शबरी घरकुल योजना २०२४ साठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली कागदपत्रे आपल्या जवळ असणे आवश्यक आहे. कृपया खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 • आधार कार्ड
 • मतदान कार्ड
 • रेशन कार्ड ‘
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • मोबईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • उत्पन्नाचा दाखला
 • वयाचा दाखला
 • जात प्रमाणपत्र
 • अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र
 • ७/१२ उतारा
 • ८ अ दाखला
 • ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र
 • बँक खात्याचा तपशील

Shabari Gharkul Yojana 2024: अटी व शर्ती

 • शबरी घरकुल योजना २०२४ साठी अर्ज करू इच्छिणारा अर्जदार हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे.
 • या योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या बाहेरील कुटुंबांना याचा लाभ घेता येणार नाही, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • अर्जदाराचे शहरी भागातील वार्षिक उत्पन्न १.२० लाख आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये.
 • या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांकडे पक्के घर नसावे.
 • शबरी घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अर्जदारांकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.
 • सदर योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षांपासून रहिवासी असावा.
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसल्यास त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल.
 • जर अर्जदार पक्क्या घरात राहत असेल आणि अर्जदाराने शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्याचा देखील अर्ज रद्द होऊ शकतो, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • त्याचप्रमाणे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न शासनाने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्यास त्याचा देखील अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
 • सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येते की, शासनाने निर्धारित केलेल्या नियम व अटी त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे संपूर्ण पात्रतेत बसत असेल तरच या शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करावा.
 • अशा प्रकारे मित्रांनो या योजनेसाठी शासनाने नियम व अटी लागू करण्यात आलेल्या आहेत.

Shabari Gharkul Yojana 2024: अर्ज कसा करावा

शबरी घरकुल योजना २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे, चला तर मग जाणून घेऊया⤵️⤵️⤵️

 • मित्रांनो, तुम्ही जर सदर योजनेसाठी पात्र असाल तर त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचयातीच्या कार्यालयात किंवा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज जमा करावा लागतो. [खाली दिलेली माहीत पहा]
 • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संबंधित अर्ज डाउनलोड करू शकताय.
 • अर्ज डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये सर्व माहिती सविस्तरपणे भरा.
 • त्यासोबत आम्ही वर दिलेली सर्व कागदपत्रे जोडावीत.
 • अर्ज पूर्णपणे भरून झाल्यानंतर ग्रामपंचयातीच्या कार्यालयात किंवा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जमा करावा.

Shabari Gharkul Yojana 2024: महत्वाच्या लिंक्स

शबरी घरकुल योजना २०२४ अर्ज डाउनलोड करा ➡️येथे क्लिक करा⬅️
शबरी घरकुल योजना २०२४ GR पाहण्यासाठी ➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “शबरी घरकुल योजना २०२४” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024

मोदी आवास घरकुल योजना 2024

मोफत उच्चशिक्षण योजना २०२४

सावित्री बाई फुले शिष्यवृत्ती योजना २०२४\

सुकन्या समृद्धी योजना 2024

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४

मोफत शौचालय योजना 2024

रमाई आवास योजना २०२४

कृपया ही रोजगार बातम्यांची आणि सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे आणि सरकारी योजनांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Shabari Gharkul Yojana 2024:FAQ’s
या योजनेचे संपूर्ण नाव काय आहे?

शबरी घरकुल योजना

शबरी घरकुल योजना कुणामार्फत कार्यरत आहे?

ही योजना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत कार्यरत आहे.

शबरी घरकुल योजना २०२४ साठी कोण कोण पात्र आहे?

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि वंचित असणारे नागरिक

शबरी घरकुल योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

शबरी घरकुल योजने अंतर्गत अनुसूचित जमातीतील बेघर बांधवांना पक्के घर बांधून देणे