Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अंतर्गत मिळणार 100% अनुदान !!

Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024 In Marathi

Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या राज्यातील व देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी त्याचबरोबर नागरिकांचे भविष्य उज्वल होण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्यसरकार सतत नवनवीन योजना राबवत असतात. यासाठी महाराष्ट्र सरकार कायम प्रयत्नशील असते. राज्यसरकार वेळोवेळी नवीन योजनांची अंमलबजावणी करत असते.

जसे की आपल्या राज्यातील तरुणांसाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना असतील, जेणे करून आपल्या राज्यातील तरुणांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, विमा योजना, आरोग्य सुविधा, आपल्या देशातील आणि राज्यातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना व अर्थसहाय्य योजना आणि महत्वाचं म्हणजेच राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी निवृत्ती वेतन योजना, अपंग आणि विधवा महिलांसाठी पेन्शन योजना त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना अशा विविध प्रकारच्या योजना सरकार राबवत असते, त्यातीलच एक म्हणजे “भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४” होय.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ ची सविस्तर माहिती जसे की, काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेसाठी पात्र आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे? अर्ज करताना कोणत्या अटी व शर्ती तसेच कोणते नियम आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकतो? ई सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. तुम्ही सदर योजनेची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचाल अशी आम्ही आशा करतो. चला तर मग मंडळी “भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४” ची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४

शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी विविध प्रकारच्या नवनवीन योजना राबविल्या जातात, त्यामध्ये एक महत्वाची अशी योजना म्हणजेच “भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४” . या योजने अंतर्गत शेतकऱ्याला फळबाग लागवडीसाठी प्रति एकर ०१ लाख ४० हजार रुपये अनुदान दिले जाते. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ अंतर्गत शेतकऱ्यांना आंबा, डाळिंब, द्राक्षे, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, संत्रा, चिकू, अंजीर, मोसंबी, या फळबागांसाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत “जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी” फळबाग लागवडीकरीता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत.राज्यात ८०% अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही, जॉबकार्ड नसल्याने ते सदर योजनेचा लाभ मिळवण्यास अपात्र ठरत आहेत. त्याचप्रमाणे ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरणार आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ च्या माध्यमातून पिक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे फळबाग लागवडीमूळे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल ऋतु बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास मदत होणार आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सन २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून राज्यात राबविण्यात येत आहे.

Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024: पात्र फळांची रोपे

  1. आंबा
  2. डाळिंब
  3. द्राक्षे
  4. काजू
  5. पेरू
  6. सीताफळ
  7. आवळा
  8. चिंच
  9. जांभूळ
  10. कोकम
  11. फणस
  12. कागदी लिंबू
  13. संत्रा
  14. चिकू
  15. अंजीर
  16. मोसंबी
  17. नारळ रोपे

Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024:कोण कोण पात्र आहे?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ साठी कोण कोण पात्र आहे? जाणून घेऊया खालील माहितीमध्ये;

  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल.
  • शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे. जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खतेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील.
  • जमिन कुळ कायद्याखाली येत असल्यास ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील.
  • ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजिवीका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार केला जाईल.
  • प्राप्त झालेल्या अर्जामधून लाभार्थीची निवड करताना अनुसूचित जाती/जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला, दिव्यांग व्यक्ती यांना प्राधान्य देण्यात यावे.
  • परंपरागत वन निवासी (वन अधिकारी मान्यता) अधिनियम, २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र राहील.
  • अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याला फळबाग केल्यानंतर त्यात ठिबक सिंचन बसवावे लागेल या साठी सरकारकडून १००% अनुदान देण्यात येते त्या योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला तुमच्या शेतात ठिबक सिंचन बसवावे लागेल.
  • जे शेतकरी संपूर्णपणे शेती करतात त्यांच्या घरामध्ये एकही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये काम करत नसेल त्यांनाच भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ चा लाभ दिला जाईल.
  • आणि महत्वाचं म्हणजेच जर शेतकऱ्याने या अगोदर संबंधित योजनेचा लाभ घेतला असेल त्या त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ पुनः मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.

Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024:अनुदान वाटप

चला तर मग शेतकरी मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ अंतर्गत किती व कसे अनुदान मिळणार?

● भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ साठी अनुदान ही एकूण तीन टप्प्यांमध्ये दिले जाते.

  • ज्यामध्ये प्रथम टप्प्यात अर्जदार उमेदवार या योजनेसाठी पात्र होतो तेव्हा त्यांना ५०% अनुदान दिले जाते. म्हणजेच जर तुम्हाला ०१ लाख रुपये मंजूर झाले असतील तर प्रथम वर्ष तुम्हाला ५०% अनुदान मिळणार आहे. म्हणजेच ५० हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे.
  • त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला ३०% अनुदान दिले जाते, म्हणजेच ३० हजार रुपये तुम्हाला दिले जातात.
  • शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला २०% अनुदान दिले जाते. ते म्हणजेच २० हजार रुपये.
  • अशाप्रकारे एकूण तीन टप्प्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ अंतर्गत तीन वर्षाच्या कालावधीमध्ये अनुदान दिले जाते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ GR

Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024:शासनाची व शेतकऱ्यांनी करावयाची कामे

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ अंतर्गत शेतकऱ्यांनी आणि सरकारने कोणती कोणती कामे करायची आहेत, जाणून घेऊया खालील माहितीमध्ये;

● शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे (१००% लाभार्थी शेतकरी)

  1. जमीन तयार करणे
  2. माती व शेणखत/सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे
  3. रासायनिक खत वापरुन खड्डे भरणे
  4. आंतर मशागत करणे
  5. काटेरी झाडांचे कुंपण करणे

शासन अनुदानीत कामे (१००% सरकारची कामे)

  • खड्डे खोदणे
  • कलमे लागवड करणे (नारळाच्या बाबतीत रोपे)
  • १००% राज्य शासन
  • पीक संरक्षण
  • ठिबक सिंचनाद्वारे पानी देणे

Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचबरोबर अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • ७/१२ उतारा व ८ अ खाते उतारा
  • आधार कार्ड /पॅन कार्ड (ओळखीसाठी)
  • जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • तहसीलदार उत्पन्नाचा दाखला
  • बँक खाते पासबुक (झेरॉक्स)
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024: अर्ज कसा करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ साठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे? जाणून घेऊया पुढील माहितीमध्ये;

  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ साठी पात्र आणि इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • शेतकरी मित्रांनो, तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबईलेच्या माध्यमातून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ साठी अर्ज करू शकताय.
  • त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या (आम्ही खाली दिलेल्या लिंक वर) क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.
  • त्यानंतर तुम्हाला लिंक उघडल्यानंतर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबईलच्या माध्यमातून अर्ज पूर्णपणे भरू शकताय.
  • त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ साठी तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन देखील तुमचा अर्ज भरू शकताय.

Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024:महत्वाच्या लिंक्स

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ GR➡️येथे क्लिक करा⬅️
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ पीडीएफ ➡️येथे क्लिक करा⬅️
अधिकृत वेबसाइट ➡️येथे क्लिक करा⬅️
ऑनलाइन अर्ज करा➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024अटल बांबू समृद्धी योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 2024
प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024अटल भूजल योजना 2024
एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना 2024मनोधैर्य योजना 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Bhausaheb Fundkar Phalbaag Yojana 2024:FAQ’s
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ साठी कोण कोण पात्र आहे?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ साठी पात्र आणि इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ साठी तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन देखील तुमचा अर्ज भरू शकताय.