Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: सर्व नागरिकांना आता मिळणार मोफत आरोग्य सुविधा!!

Table of Contents

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana In Marathi 2024

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana In Marathi 2024 (महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहे? या योजनेचे फायदे काय आहेत? या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतो? या योजेनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? काय आहेत या योजनेची वैशिष्ट्ये? या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? ई सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते जेणेकरून आपल्या राज्यातील तसेच देशातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा, राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुरळीत व्हावे, राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांचा आर्थिक विकास व्हावा, म्हणून कायम प्रयत्नशील असते, नवनवीन योजना राबवत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024” होय.

मित्रांनो, आपल्या देशातील आणि राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन ही योजना सुरू केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्व पांढरी शिधापत्रिका धारक नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार देण्याचा एक अतीशय उत्तम निर्णय सरकारने घेतलेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने 19 जून 2024 रोजी दिले आहेत. मित्रांनो, मागील वर्षी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची मर्यादा वाढवून ती 1.5 लाखावरून ते 5 लाख रुपयांपर्यंत केली होती. त्यावेळी मात्र काही कारणास्तव योजनेची अंमलबजावणी करण्याचे राहून गेले होते. मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांढरी शिधापत्रिका असलेल्या नागरिकांनाही 1 जुलैपासून 5 लाख रुपयांचे मोफत उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.

मित्रांनो, आज आपण पाहतच आहोत की, आपल्या राज्यातील बहुतांश ग्रामीण भागातील कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यावर त्यांना वैद्यकीय उपचार करणे शक्य होत नाही, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक असते. त्यांच्याकडे उपचारासाठी लागणारे पैसे नसतात. त्यांना पैशाअभावी आपला जीव देखील गमवावा लागतो. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबाकडे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी लागणारा खर्च परवडण्यासारखा नसतो, त्यांना उपचारासाठी खूप समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र शासनाने “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024” ही योजना सुरू करण्याचा एक अतीशय महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो, ही योजना पूर्वी “राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना” या नावाने ओळखली जात होती. दिनांक 2 जुलै 2012 पासून ही योजना महाराष्ट्र राज्यातील एकूण 8 जिल्ह्यात लागू करण्यात आली होती, त्यानंतर दिनांक 21 नोव्हेंबर 2013 पासून ही योजना महाराष्ट्र राज्यातील उर्वरित 28 जिल्ह्यांमध्ये राबविली गेली. आणि नंतर 14 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेच्या नावात बदल करून “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना” असे ठेवण्यात आले. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांना निःशुल्क सेवा पुरविण्यात येत आहे. म्हणूनच सदर योजना सुरू करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024: थोडक्यात माहिती

योजनेचे नावMahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana In Marathi 2024
(महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्य रेषेवरील कुटुंबे
योजनेचा लाभ काय5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार
योजनेचे उद्देशराज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना निःशुल्क आरोग्य सुविधा प्रदान करणे
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: योजनेचे वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024” ची काय काय वैशिष्ट्ये आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा प्राप्त व्हाव्या या साठी महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 सुरू केली आहे.
  • राज्यातील सर्व जाती धर्मातील कुटुंबांना या योजनेच्या अंतर्गत विमा संरक्षण दिले जाते.
  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून उपचारासाठी फायदा होणार आहे.
  • आपल्या महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी त्याचबरोबर त्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी ही योजना अतीशय महत्वाची भूमिका बजावणार आहे.
  • त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील पांढरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या 7/12 उतारा व फोटो ओळखपत्राच्या आधारे विमा संरक्षण दिले जाते.
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 ही पूर्णपणे संगणकीकृत असल्यामुळे या योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयातून लाभार्थी असलेल्या नागरिकाला वैध शिधापत्रिका व फोटो ओळखपत्राच्या आधारे विमा संरक्षण दिले जाते.
  • मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 ची प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही कार्यालयात फेऱ्या मारायला लागणार नाहीत.
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 च्या माध्यमातून नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयामध्ये नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024” चे काय काय उद्देश आहेत?

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्व पांढरी शिधापत्रिका धारक नागरिकांना महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना निःशुल्क चांगली वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही एक अतीशय महत्वाची योजना आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना गंभीर आजरांवर तसेच मोठ्या शस्त्रक्रियेवर निःशुल्क उपचार तसेच उत्तम आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबांना सशक्त बनविणे.
  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविणे.
  • त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना त्यांच्या उपचारासाठी म्हणजेच त्यांच्या आजारपणात पैशांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये.
  • त्यांना त्यांच्या उपचारासाठी तसेच त्यांच्या आजारपणात सहाय्य करणे.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: पात्रता

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024” साठी कोण कोण पात्र आहे?

  • सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • सदर कुटुंब दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 1 लाख रुपये असणे आवश्यक आहे.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: समाविष्ट रुग्णालये

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 30 पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय, निम शासकीय, खाजगी तसेच धर्मादाय संस्था अशी एकूण 973 रुग्णालये समाविष्ट आहेत.
  • लाभार्थी व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकतो.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: आजार यादी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024” अंतर्गत कोणत्या कोणत्या आजारावर उपचार मिळणार आहेत?

जळीतमज्जातंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया
हृदयरोगस्त्री रोग व प्रसुती शस्त्र
हृदयरोग शस्त्रक्रिया व उपचारनेत्ररोग शस्त्रक्रिया
आकस्मिक सेवाअस्थिव्यंग शस्त्रक्रिया
त्वचा रोगबालरोग शस्त्रक्रिया
अंतःस्त्राव संस्थेचे विकारबालरोग कर्करोग
कान, नाक, घसा रोगप्लास्टीक सर्जरी
सर्वसाधारण औषधशास्त्र चिकित्साआकस्मिक वैद्यकीय उपचार
सर्वसाधारण शस्त्रक्रियाकृत्रिम अवयव उपचार
व्याधी चिकित्साफुफ्फुसाचे आजार
संसर्गजन्य आजारकिरणोत्सर्गाद्वारे कर्करोग चिकित्सा
इंटरव्हेशनल रेडिओलॉजीसंधिवात सबंधी उपचार
जठरांत्रमार्गाचे रोगजठर व आंत्र विकाराच्या शस्त्रक्रिया
कर्करोगावरील औषधोपचारकर्करोगाच्या शस्त्रक्रिया
नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापनमूत्रवह संस्थेच्या विकरांवरील शस्त्रक्रिया
मुत्रपिंड विकारमानसिक आजार
मज्जातंतूचे विकारजबडा व चेहऱ्यावरील अस्थीवरील शस्त्रक्रिया

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशनकार्ड
  • दारिद्र्य रेषेखालील केशरी रेशनकार्ड
  • अंत्योदय रेशनकार्ड
  • अन्नपूर्णा रेशनकार्ड
  • रहिवासी दाखला
  • ई-मेल आयडी
  • मोबईल नंबर
  • 3 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 चा अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.
  • तुमच्या समोर होम पेज उघडल्यानंतर “Online Empanelment” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये सर्वात शेवटी (खालच्या बाजूला) तुम्हाला “Fresh Application” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सदर योजनेचा अर्ज उघडेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • आणि नंतर “Save” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024
  • अशा प्रकारे मित्रांनो तुमची “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024” ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: महत्वाच्या लिंक्स

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 GR➡️येथे क्लिक करा⬅️
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 PDF➡️येथे क्लिक करा⬅️
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 शासन निर्णय➡️येथे क्लिक करा⬅️
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024पीक कर्ज योजना 2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
चंदन कन्या योजना 2024इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
मध केंद्र योजना 2024महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024:FAQ’s
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 ही कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

सदर योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना निःशुल्क आरोग्य सुविधा प्रदान करणे

या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार मिळणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे.

सदर योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.