Vasantrao Naik Karj Yojana 2024:स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये मिळणार!!

Vasantrao Naik Karj Yojana 2024 In Marathi

Vasantrao Naik Karj Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. काय आहे ही योजना? या योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहे? कसा या योजनेचा लाभ घेता येणार आहे? योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे? योजनेचा अर्ज करण्याची पद्धत नक्की काय आहे? आणि सर्वात महत्वाच म्हणजे कोण कोण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत? वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेच्या अटी व नियम काय आहेत? ई सर्व माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा.

आज आपण पहातच आहोत की, राज्यातील तरुण सुशिक्षित असून देखील बेरोजगार आहे. इच्छा असून देखील आपल्या राज्यातील तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाहीयेत. याचे मुख्य कारण म्हणजेच व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारा पुरेसा पैसा त्यांचकडे नाहीये. यामुळे राज्यातील तरुण बेरोजगारी आणि काम नसल्यामुळे मानसिक तणवात आपले जीवन जगत आहेत. मित्रांनो, केंद्र आणि राज्यसरकार यांच्या माध्यमातून देशातील आणि राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी तसेच त्यांचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी नवनवीन योजना राबविल्या जात असतात.

मित्रांनो, आपण पाहतच आहोत की, आपल्या महाराष्ट्र राज्यात बेरोजगारांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढतच चालली आहे. त्यामुळे कुशल आणि सुशिक्षित तरुणांना काम देण्याच्या हेतूने, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी पाठबळ मिळावे, त्याचबरोबर त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायातून इतर होतकरू आणि बेरोजगार तरुणांना देखील नोकऱ्या मिळाव्या या उद्देशाने आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास व्हावा तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यात जे दुर्बल घटक आहेत, त्या घटकांचा विकास व्हावा या हेतूने महाराष्ट्र सरकारने “वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४” ची स्थापना केली आहे.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ ही महराष्ट्र शासनाने मुक्त जाती -जमाती, विशेष मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्तीतील सदस्य असलेल्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या योजेनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील जे तरुण जीवन जगत आहेत, अशा तरुणांना आर्थिक उन्नतीसाठी त्यांना स्वयंरोजगार निर्मिती करून देण्याच्या उद्देशाने या महामंडळामार्फत ०१ लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येते.

Vasantrao Naik Karj Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४: थोडक्यात आढावा

योजनेचे नाववसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
कोनाद्वारे सुरू करण्यात आलीमहाराष्ट्र सरकार
विभागइतर मागास बहुजन कल्याण विभाग
लाभाची रक्कम०१ लाख रुपये
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील रहिवासी नागरिक
योजनेचे उद्देशभटक्या, विमुक्त जाती -जमातीतील नागरिकांचा विकास करणे
योजनेसाठी अर्ज प्रकियाऑनलाइन /ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Vasantrao Naik Karj Yojana 2024:योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की “वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४” चे मुख्य वैशिष्ट्ये काय आहे?

 • वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली योजना आहे.
 • वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे मुख्य उद्दिष्ट वंचित वर्गातील तरुणांना, मुक्त झालेल्या जाती- जमातीतील आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील तरुणांना आर्थिक पाठबळ देणे, जेणेकरून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
 • या योजेनेअंतर्गत तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतर तरुणांसाठी देखील रोजगार निर्माण करू शकतील.
 • वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ चे मुख्य विशिष्ट्य म्हणजे भटक्या जाती -जमाती आणि मुक्त झालेल्या सुशिक्षित तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे आहे.
 • या योजेनच्या माध्यमातून तरुणांना सामाजिक आणि आर्थिक विकास होणार आहे.
 • महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून राज्यातील होतकरू आणि बेरोजगार तरुणांना ०१ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते.
 • वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ ची अर्ज प्रकिया अतीशय सोपी आहे.
 • आम्ही खाली दिलेल्या वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ यांच्या “अधिकृत वेबसाइट” च्या समोरील बटणावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकताय.
 • सदर योजनेची अर्ज प्रकिया ऑनलाइन असल्यामुळे या योजनेअंतर्गत प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता आहे.
 • या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया असल्यामुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे अर्ज करता येणार आहे.
 • वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ चा अर्ज करण्यासाठी नागरिकांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी देखील लागणार नाही.
 • वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ माध्यमातून पात्र लाभार्थी असलेल्या तरुणांना जे कर्ज मिळणार आहे ते त्यांच्या थेट बँक खात्यात डी. बी. टी च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.
 • मित्रांनो, वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य तरुणांचा आर्थिक विकास तर होणारच आहे, त्याचबरोबर आपल्या राज्यात औद्योगिक क्षेत्रात वाढ होणार आहे.

Vasantrao Naik Karj Yojana 2024: योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की “वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४” चे मुख्य उद्देश काय आहे?

 • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज (आर्थिक मदत) उपलब्ध करून देणे.
 • वसंतराव नाईक महामंडळासाठी कर्ज महाराष्ट्रातील मुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील सदस्यांचा आर्थिक किकस करणे हे वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ या योजेनचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
 • आपल्या राज्यातील युवकांना व्याज न घेता कर्ज देणे उपलब्ध करून देणे, जेणेकरून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहतील.
 • राज्यातील बेरोजगारी कमी करून आपल्या राज्याचा औद्योगिक विकास करणे.
 • आपल्या महाराष्ट्र राज्यात नवीन नोकरीच्या संधी सादर करणे.
 • महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देऊन त्यांचा आर्थिक विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • राज्यातील तरुणांना आत्मनिर्भर बनवणे.
 • तसेच राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योगधंदा, व्यवसाय सुरू करण्यासाठी इतरांकडे पैसे मागण्याची गरज भासू नये, त्यामुळे वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ थेट कर्ज मंजूर करून देते.

Vasantrao Naik Karj Yojana 2024:योजनेअंतर्गत सुरू करता येणारे व्यवसाय

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की “वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४” अंतर्गत आपण कोणते व्यवसाय सुरू करू शकतो?

 1. मत्स्य व्यवसाय
 2. कृषि क्लिनिक
 3. पॉवर टिलर
 4. हार्डवेअर व पेंट शॉप
 5. सायबर कॅफे
 6. संगणक प्रशिक्षण
 7. झेरॉक्स
 8. स्टेशनरी
 9. सलून ब्युटी पार्लर
 10. मसाला उद्योग
 11. पापड उद्योग
 12. मसाला मिरची कांडप उद्योग
 13. वडापाव विक्री केंद्र
 14. भाजी विक्री केंद्र
 15. ऑटो रिक्षा
 16. सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र
 17. डी टी पी वर्क
 18. स्वीट मार्ट
 19. ड्राय क्लीनिंग सेंटर
 20. हॉटेल
 21. टायपिंग इंस्टीट्यूट
 22. ऑटो रीपेरिंग
 23. गॅरेज
 24. फ्रिज दुरुस्ती
 25. एसी दुरुस्ती
 26. चिकन/मटन शॉप
 27. एलेक्ट्रॉनिक शॉप
 28. आईस्क्रीम पार्लर
 29. मासळी विक्री
 30. भाजीपाला विक्री
 31. फळ विक्री
 32. किराणा दुकान
 33. आठवडी बाजारामध्ये छोटेसे दुकान
 34. टेलिफोन बूथ किंवा अन्य तांत्रिक लघुउद्योग

Vasantrao Naik Karj Yojana 2024: आवश्यक पात्रता

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की “वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४” चा लाभ घेण्यासाठी काय पात्रता लागणार आहे?

 • वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ साठी अर्जदार हा महराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • त्याचबरोबर अर्जदार व्यक्ती ही विमुक्त जाती, भटक्या -जमाती विशेष मागास प्रवर्गातील असल्यास या योजनेसाठी पात्र असेल.
 • या योहजेनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराचे वय १८ वर्षे ते ५५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

Vasantrao Naik Karj Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की “वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४” चा लाभ घेण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवासी दाखला
 • विज बील
 • मोबईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • उत्पन्नाचा दाखला
 • फोटो
 • डोमिसाईल सर्टिफिकेट
 • प्रतिज्ञापत्र
 • जातीचा दाखला
 • जन्म प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • बँक पासबुक
 • व्यवसाय सुरू करणार त्याचे कोटेशन

Vasantrao Naik Karj Yojana 2024: अर्ज कसा करावा

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की “वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

 • वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ साठी अर्ज करण्यासाठी इच्छूक आणि पात्र असणाऱ्या नागरिकांनी सर्वप्रथम ➡️Official Website⬅️ वर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर होमपेज ओपन होईल तिथे तुम्हाला नोंदणी हा ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
 • त्यावर क्लिक केल्यानंतर विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
 • अर्जात संपूर्ण माहिती पूर्णपणे भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
 • सर्व अर्ज एकदा तपासून “Submit” या बटणावर क्लिक करायचे आहे.
 • अशाप्रकारे मित्रांनो, तुमची ऑनलाइन अर्ज प्रकिया पूर्ण होईल.

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

 • अर्जदाराला प्रथम आपल्या जिल्ह्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागात जाऊन वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा.
 • घेतलेल्या अर्जात सर्व माहिती काळजीपूर्वक भरून त्यासोबत सर्व आवश्यक असनरी कागदपत्रे जोडावीत.
 • अर्ज एकदा तपासून कार्यालयात जमा करावा.
 • अशा प्रकारे मित्रांनो “वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४” चा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून लाभ घेऊ शकताय.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024

मोदी आवास घरकुल योजना 2024

मोफत उच्चशिक्षण योजना २०२४

शबरी घरकुल योजना २०२४

सुकन्या समृद्धी योजना 2024

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४

आंतरजातीय विवाह योजना 2024

कृपया ही रोजगार बातम्यांची आणि सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे आणि सरकारी योजनांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Vasantrao Naik Karj Yojana 2024:FAQ’s
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ अंतर्गत किती कर्ज मिळणार ?

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ अंतर्गत तरुणांना ०१ लाख रुपये कर्ज मिळणार आहे.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ ही कोनाद्वारे सुरू करण्यात आली आहे?

सदरची योजना महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४ साठी अर्ज कसा करायचा?

या योजनेसाठी ऑनलाइन /ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.