Annasaheb Patil Loan Scheme 2024
Annasaheb Patil Karj Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Annasaheb Patil Karj Yojana 2024 च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित कुशल तरूणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचप्रमाणे ज्या तरुणांचा आधीपासूनच व्यवसाय आहे, त्यांच्या व्यवसायाला अधिक चालना मिळण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायात वाढ करण्यासाठी तब्बल 10 ते 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण या संपूर्ण लेखात पाहणार आहोत.
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे लाखों विद्यार्थी शिक्षण घेऊन आपलं गाव, तालुका, जिल्हा सोडून बाहेर पडत आहेत. परंतु मित्रांनो, आजच्या घडीला प्रत्येकालाच नोकरी मिळणे अशक्य झाले आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या कमी न होता वाढतच चालली आहे. महाराष्ट्र सरकारने ही गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय त्याचबरोबर उद्योगधंदा सुरू करण्यासाठी “अण्णासाहेब पाटील कर्ज योजना” त्यांच्या व्यवसायाला हातभार लागावा म्हणून तसेच आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी कर्ज देत आहे.
महाराष्ट्र राज्यात बेरोगारांची संख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे सुशिक्षित आणि कुशल तरुणांना काम देण्याच्या हेतूने, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, त्यांना स्वतःचा काहीतरी नवीन व्यवसाय किंवा उद्योगधंदा सुरू करावा, सुरू केलेल्या व्यवसायातून इतर बेरोजगारांना देखील नोकऱ्या मिळाव्या या उद्देशाने आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास व्हावा तसेच Annasaheb Patil Karj Yojana 2024 महाराष्ट्र राज्यात जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, त्या घटकांचा विकास करण्याच्या हेतूने राज्यशासनाच्या वतीने “अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची” स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखांपेक्षा अशा व्यक्तींना 10 रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीसाठी 4% निधी राखून ठेवण्यात येणार आहे. “अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेमध्ये महामंडळाचे कर्ज घेतल्यास त्या रकमेवरील व्याज हे महामंडळ भरते. यामुळे बेरोजगार तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी आर्थिक मदत सहजरीत्या मिळते.
त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची काय काय वैशिष्ट्य आहेत, या योजनेची उद्दिष्ट काय आहेत, योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरूणांकडे कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे असावीत, एकूणच अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सर्व माहिती आपण या लेखात पहाणार आहोत. कृपया खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना २०२४ बद्दल महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे
मंडळाचे नाव | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ |
मंडळाची स्थापना | २७ नोव्हेंबर १९९८ |
राज्य मर्यादा (कोणत्या राज्यात लागू) | महाराष्ट्र राज्य |
मंडळाचे उद्देश | बेरोजगार तरूणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत तसेच आर्थिक मागास घटकांचा विकास घडवून आणणे. |
शासन विभाग | आर्थिक कल्याण विभाग |
मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या इतर योजना | • वैयक्तिक व्याज परतावा योजना • गट कर्ज व्याज परतावा योजना • गट प्रकल्प कर्ज योजना |
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे स्वरूप | १० ते ५० लाख पर्यंत व्याज परतावा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन अर्ज प्रकिया (अधिकृत वेबसाइटद्वारे) |
मंडळाच्या मुख्य कार्यालयाचा पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बरुद्दीन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट च्या पाठीमागे, सी. एस. टी स्टेशन जवळ, मुंबई 400001 |
दूरध्वनी क्रमांक | ०२२-२२६५७६६२ ०२२-२२६५८०१७ |
Annasaheb Patil Karj Yojana 2024:मुख्य उद्देश
चला तर मग मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना २०२४ ची मुख्य उद्देश काय काय आहेत, जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️
- आपल्या महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरूणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचप्रमाणे आधीपासूनच चालू असणाऱ्या व्यवसायाला अधिक चालना मिळण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून आपल्या महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित आणि कुशल तरुणांना या योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देश आहे.
- महाराष्ट्र राज्यात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेक तरुण आर्थिकदृष्ट्या मागे आहेत, अशा तरूणांना आर्थिक मदत पोहोचवून त्यांना आपला स्वतःचा नवीन व्यवसाय/उद्योगधंदा सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे व त्यांना सक्षम बनविणे.
- राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना २०२४ च्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक स्वरूपात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सतत कार्यरत राहणे.
- महाराष्ट्र राज्याचा विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी संपून नवे उद्योगधंदे सुरू करणे, त्याचबरोबर राज्यात नवनवीन व्यवसाय वाढवण्यास पाठबळ देणे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारी कमी होणे तसेच बेरोजगारांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांचा सामाजिक आर्थिक दृष्ट्या विकास घडवून आणणे.
Annasaheb Patil Karj Yojana 2024: मुख्य वैशिष्ट्ये
मित्रांनो, जाणून घेऊया अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना २०२४ ची मुख्य वैशिष्ट्ये⤵️⤵️⤵️
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
- मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना २०२४ चा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही श्रेणीचा उमेदवार अर्ज करू शकतो व या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊ शकतो.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना २०२४ चा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही.
- मित्रांनो तुम्ही घरी बसून स्वतःच्या मोबईलवर किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन अर्ज करू शकताय.
- त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही गोष्टींची बचत होणार आहे.
- महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजातील होतकरू मागास घटकांचा विकास करण्यासाठी ही योजना महत्वाची भूमिका बजावत आहे.
- सुशिक्षित आणि कुशल तरूणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून तसेच या व्यवसायामधून इतरांनासुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
- एकंदरीत समाजाचा विकास घडवून आणण्याचे काम ही योजना प्रामुख्याने करत आहे.
Annasaheb Patil Karj Yojana 2024:मंडळाच्या एकूण तीन योजना आहे
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
- गट कर्ज व्याज परतावा योजना
- गट प्रकल्प कर्ज योजना
Annasaheb Patil Karj Yojana 2024:आवश्यक पात्रता
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना २०२४ साठी कोण कोण आणि काय काय पात्रता आवश्यक असणार आहे. ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️
- आर्थिक विकास महामंडळ योजना २०२४ साठी अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे. इतर दुसऱ्या राज्याच्या व्यक्तींना अर्ज करता येणार नाही.
- सदर योजनेसाठी पुरुष अर्जदाराचे वय ५० वर्षे तर महिलांकरिता जास्तीत जास्त ५५ वर्षे असेल.
- या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- आर्थिक विकास महामंडळ योजना २०२४ मध्ये एका व्यक्तीला एकदाच या योजेनचा लाभ घेता येईल.
- आर्थिक विकास महामंडळ योजना २०२४ साठी अर्ज करणारी व्यक्ती ही जर दिव्यांग असेल तर त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र अर्ज करतेवेळी जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज केलेल्या व्यक्तीने जर कर्जाची रक्कम नियमित परतफेड केली नसेल तर त्या व्यक्तीला व्याज परतावा दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
- अर्जदार व्यक्तीने एखाद्या वाहनासाठी कर्ज घेतले असेल तर त्या कर्जफेडीचा हप्ता हा प्रति महिना असेल.
- सदर योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची कोणत्याही बँकेची थकबाकी बाकी नसावी.
- गट प्रकल्प योजनेसाठी किमान एक भागीदाराची शैक्षणिक अर्हता इयत्ता १० वी उत्तीर्ण असावी.
- त्याचबरोबर अर्जदार व्यक्तीला उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य असेल.
Annasaheb Patil Karj Yojana 2024:Important Documents
आर्थिक विकास महामंडळ योजना २०२४ साठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ;पाहूया ⤵️⤵️⤵️
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला [वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे.]
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
- ई-मेल आयडी
- मोबईल नंबर
- प्रकल्प अहवाल
- रेशनकार्ड
- वीज बिल
- उद्योग सुरू करण्याबाबतचा परवाना
- बँक खात्याचे स्टेटमेंट
- व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
Annasaheb Patil Karj Yojana 2024:अर्ज कसा करावा
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला https://udyog.mahaswayam.gov.in/#/registration या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- त्यावर गेल्यानंतर नोंदणी वर क्लिक करा.
- त्यामध्ये तुमची अचूक आणि योग्यपद्धतीने संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर “पुढे” या बटणावर क्लिक करा.
- तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल, त्याचा वापर करून पुन्हा लॉगइन करा.
- लॉगइन केल्यानंतर अर्ज करण्यासाठी या ऑप्शन वर क्लिक करा आणि आपल्या जिल्ह्याची निवड करा.
- सर्व माहिती अर्जात भरल्यानंतर शेवटी अचूक पद्धतीने सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- मित्रांनो, अशाप्रकारे तुमचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
Annasaheb Patil Karj Yojana 2024:Important Links
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ साठी कर्ज देणाऱ्या बँक पीडीएफ | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.
Annasaheb Patil Karj Yojana 2024:FAQ’s
मंडळाचे नाव काय आहे?
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?
२७ नोव्हेंबर १९९८.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ साठी अर्ज कसा करायचा?
सदर योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.