साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजना|Annabhau Sathe Karj Yojana 2024|

Annabhau Sathe Karj Yojana In Marathi 2024

Annabhau Sathe Karj Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या Annabhau Sathe Karj Yojana 2024 (अण्णाभाऊ साठे कर्ज योजना 2024) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, The Lokshahir Annabhau Sathe Development Corporation (LASDC) म्हणजेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ होय. LASDC योजना महाराष्ट्र राज्यातील दारिद्रयरेषे खालील मातंग आणि तत्सम समुदायांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या शैक्षणिक ,आर्थिक आणि सामाजिक विकासात मदत करण्यासाठी, त्यांना सन्मानाचे स्थान देण्यासाठी ही योजना काम करते. त्याचप्रमाणे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने कंपनी कायदा, 1956 (1) च्या तरतुदीनुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिनांक 11 जुलै 1985 रोजी केली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजना ही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेली योजना आहे. हे महामंडळ मातंग समाजातील एकूण 12 पोटजातींना आर्थिक मदत व्हावी यासाठी काम करते. मित्रांनो, आपल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात अशा विविध जाती जमाती आहेत की ज्या दारिद्रयरेषे खाली आपले जीवन जगत आहेत. त्यांना स्वतःचा नवीन उद्योगधंदा सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल उपलब्ध होत नसल्यामुळे, त्यांना त्यांचा व्यवसाय देखील सुरू करता येत नाही. आणि म्हणूनच अशा गरीब तसेच मातंग समाजातील एकूण 12 पोटजाती असलेल्या व्यक्तींना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ ह्या योजनेच्या आधारे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

चला तर मग मित्रांनो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजना कशी आहे, या योजनेची उद्दिष्टे काय आहेत, कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो, या योजेनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याचप्रमाणे या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, अर्ज भरताना कोणती कोणती कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेच्या अटी व नियम काय आहेत ई. सर्व माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

Annabhau Sathe Karj Yojana 2024

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजना

Annabhau Sathe Karj Yojana 2024 (अण्णाभाऊ साठे कर्ज योजना 2024) चा लाभ कोणत्या जातींमधील व्यक्तींना मिळणार आहे? ते जाणून घेऊया⤵️⤵️

  • मातंग
  • मांग
  • गारुडी
  • मदारी
  • मादिंग
  • मांग गारोडी
  • मांग महाशी
  • मादगी /मादीगा
  • मिनी मादीग
  • दानखणी मांग
  • राधे मांग
  • इत्यादी एकूण 12 पोटजाती मधील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Annabhau Sathe Karj Yojana 2024:अनुदान योजना

  • प्रकल्प मर्यादा रु. 50,000/-
  • प्रकल्प खर्चाच्या 50% किंवा रु. 10,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून दिले जाईल.
  • बँक कर्ज – अनुदान वगळता उर्वरित रक्कम बँक कर्ज आहे.
  • या कर्जावर बँकेच्या दरानुसार व्याज आकारले जाते. कर्जाची परतफेड बँकेला 36 ते 60 समान मासिक हप्त्त्यांमध्ये करावी लागेल.

प्रशिक्षण योजना

  • तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी व शासनमान्य संस्थांमध्ये प्रशिक्षणार्थी देण्यात येतात.
  • प्रशिक्षणाचा कालावधी 6 ते 12 महिने असतो.

Annabhau Sathe Karj Yojana 2024:संस्थांची फी

  • तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीसाठी प्रति प्रशिक्षणार्थी फी रु. 2500/-
  • संगणक प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी एकूण प्रशिक्षण कालावधी शुल्क रु. 3,500/-
  • वाहन चालक प्रशिक्षणासाठी (चारचाकी वाहनांसाठी) एकूण प्रशिक्षण कालावधीसाठी प्रति प्रशिक्षणार्थी फी रु. 2,300/- (तीन चाकी वाहनांसाठी) रु. 2,000/-
  • ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा एकूण कालावधी प्रति प्रशिक्षणार्थी शुल्क रु. 3,500/-
  • शिवण प्रशिक्षणाचा एकूण कालावधी प्रति प्रशिक्षणार्थी शुल्क रु. 1,200/-

शुल्क व्यतिरिक्त विद्यावेतन

  • प्रशिक्षणार्थी राहत असलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यास प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा रु. 150/-
  • महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या व प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीस दरमहा रु. 250/-
  • प्रशिक्षणार्थी ज्या गावात किंवा शहरात राहतो त्या गावाशिवाय इतर गावात/ शहरात प्रशिक्षण घेत असल्यास प्रतिमहा रु. 300/-

Annabhau Sathe Karj Yojana 2024:शिष्यवृत्ती योजना

पात्रता :- इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी आणि डिप्लोमा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय परीक्षेत किमान 60% किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या मातंग समाजातील पुरुष आणि महिला विद्यार्थ्यांची जिल्हावार गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाते आणि उपलब्ध निधीच्या मर्यादेत एकदाच प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते.

  • शिष्यवृत्ती
    • 10 वी :- रु. 1,000/-
    • 12 वी :- रु. 1,500/-
    • पदवी आणि पदविका :- रु. 2,000/-
    • अभियांत्रिकी आणि वैद्यकीय :- रु. 2,500/-

Annabhau Sathe Karj Yojana 2024:आवश्यक पात्रता

  • LASDC योजना महाराष्ट्र राज्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे आणि 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार हा मातंग व 12 पोटजातीतील असावा.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव /प्रशिक्षण घेतलेले असावे.
  • त्याचप्रमाणे योजने अंतर्गत उत्पन्न मर्यादा. शहरी भागाकरिता रु. 1 लाख व ग्रामीण भागाकरिता रु. 81,000/- असावे.
  • तसेच अर्जदाराने इतर कोणत्याही शासकीय योजनांचा किंवा महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  • महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या शर्ती व अटी अर्जदारावर बंधनकारक राहतील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

Annabhau Sathe Karj Yojana 2024:अटी व नियम

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेअंतर्गत मातंग तसेच 12 पोटजाती मधील अर्जदार व्यक्तींना आपला स्वतःचा रोजगार /उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाईल.
  • योजनेमध्ये जे तरुण ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत आणि ज्यांनी राज्यपातळीवर क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेला आहे अशा उमेदवारांना प्रथम आणि विशेष प्राधान्य दिले जाईल.
  • त्याचप्रमाणे जे सैनिक सैन्यदलात वीरमरण पावले आहेत त्यांच्या घरातील एका सभासदाला देखील ह्या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाईल.
  • अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेअंतर्गत महिलांना 50% आणि परूषांना 50% आरक्षण राखीव ठेवण्यात येईल.
  • ह्या योजनेत अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे आणि 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराचे उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • एक कुटुंबातील एकच व्यक्ती या योजेनेचा लाभ घेऊ शकतो.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजना २०२४: आवश्यक कागदपत्रे

Annabhau Sathe Karj Yojana 2024 (अण्णाभाऊ साठे कर्ज योजना 2024) साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे ⤵️⤵️⤵️

  1. अर्जदाराचा जातीचा दाखला. (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा.)
  2. अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला. (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा.)
  3. नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 2 प्रति जोडाव्यात.
  4. राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराच्या बाबत नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 3 प्रति जोडाव्यात.
  5. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला.
  6. रेशन कार्ड झेरॉक्स प्रती
  7. आधार कार्ड झेरॉक्स प्रती /मोबईल नंबर
  8. ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेबाबतचा पुरावा.
  9. ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल त्या जागेची भाडे पावती, कारारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा.
  10. NSFDC योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स व RTO कडील प्रवासी वाहतूक परवाना ई.
  11. वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंगबद्दल /किंमतीबद्दल अधिकृत विक्रेता /कंपनीकडील दरपत्रक.
  12. व्यवसायसंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला.
  13. व्यवसायसंबंधी प्रकल्प अहवाल/ खरेदी करावयाच्या मालाचे, साहित्याचे कोटेशन.
  14. प्रतिज्ञापत्र (स्टॅम्प पेपरवर)
  15. व्यवसाय सुरू करण्यासाठीचे नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र.

अर्ज कसा करायचा ?

  • Annabhau Sathe Karj Yojana 2024 (अण्णाभाऊ साठे कर्ज योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी एका लाभार्थीस एकच अर्ज मागणी अर्ज दिला जाईल.
  • जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील गरजूंनी विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातून घेऊन जिल्हा कार्यालयातच जमा करणे आवश्यक आहे.
  • संपर्क कार्यालयाचे नाव / जिल्हा व्यवस्थापक / सर्व जिल्हे.

उद्दिष्टे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे ⤵️⤵️⤵️

  • मातंग व तत्सम समाज्याच्या आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक असतील अशा व्यापक आर्थिक चलवळींना चालना देणे आणि त्यासाठी सहाय्य करणे.
  • तंतुकामाच्या व्यवसायात गुंतलेल्या मातंग समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे.
  • घायपाताचे निर्माते, संस्करणक, आयातक, निर्यातक, खरेदीदार, विक्रेते, संग्रही, वितरक ह्यांचा व्यवसाय चालू ठेवणे.
  • कृषि उत्पादनाचे पणन, प्रक्रिया, वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, इमारत बांधकाम, वाहतूक ई. लघु उद्योग, व्यापार चालू ठेवण्यासाठी भांडवल, कर्ज आणि तांत्रिक, व्यवस्थापकीय साहाय्यासाठी तरतूद करणे.
अधिकृत वेबसाइट ➡️येथे क्लिक करा⬅️
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ योजनेचा अर्ज फॉर्म ➡️येथे क्लिक करा⬅️
वीज भांडवल योजना अर्ज➡️येथे क्लिक करा⬅️
मुदत कर्ज योजना अर्ज ➡️येथे क्लिक करा⬅️
महिला समृद्धी योजना अर्ज➡️येथे क्लिक करा⬅️
लघु ऋण वित्त योजना अर्ज➡️येथे क्लिक करा⬅️
महिला किसान योजना अर्ज➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजना २०२४ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, कर्ज मिळवण्यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 मोफत उच्चशिक्षण योजना २०२४
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४शबरी घरकुल योजना २०२४
मोफत शौचालय योजना 2024वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
बीज भांडवल योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
निपुण भारत योजना 2024महतारी वंदना योजना 2024
एचडीएफसी बँक शिष्यवृत्ती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 2024
प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024अटल भूजल योजना 2024
महामेष योजना 2024महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024गोदाम अनुदान योजना 2024
एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024युवा प्रशिक्षण योजना 2024
एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना 2024मनोधैर्य योजना 2024
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मदत करा. इतर सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Annabhau Sathe Karj Yojana 2024: काही प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे
LASDC म्हणजे काय?

The Lokshahir Annabhau Sathe Development Corporation (LASDC) म्हणजेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ होय.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

मातंग समाजातील 12 पोटजातीतील व्यक्ती.

अर्ज कसा करायचा ?

तुम्ही वर दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन अर्ज फॉर्म सबमिट करू शकताय.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहे?

मातंग समाजातील 12 पोटजातीतील व्यक्ती.

कोणती कोणती कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत?

मित्रांनो वर दिलेल्या माहितीमध्ये आम्ही आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकताय.