Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024:जमीन खरेदीसाठी 100% अनुदान मिळणार!!

Table of Contents

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana In Marathi 2024

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024 (दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील दारिद्र्य रेषेखालील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांना जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते.

चला तर मग मित्रांनो, नक्की काय आहे ही योजना? या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? योजनेचे मुख्य उद्देश्य काय आहे? या योजेनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतो? कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहे? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? या योजनेद्वारे काय काय लाभ मिळणार आहे? या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकतो? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत. कृपया खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज सादर करा.

मित्रांनो, आपण पाहतच आहोत की आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे ही आर्थिकदृष्ट्या गरीब आणि भूमिहीन आहेत. त्याचबरोबर दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. स्वतःची शेतजमीन नसल्यामुळे व आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्यामुळे आपल्या गरजा भागवण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात काम करतात तसेच काही नागरिक दुसऱ्यांच्या शेतात पीक घेतात, काही शेतमजूर असतात. मात्र त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला शक्यतो मिळत नाही. अतोनात काबाडकष्ट करून देखील त्यांचा आर्थिक विकास होत नाही. त्यामुळे ही कुटुंबे वर्षानुवर्षे आपले जीवन दारिद्र्य रेषेखाली जगत असतात.

बहुतांश कुटुंबे ही आर्थिकदृष्ट्या गरीब आणि भूमिहीन असल्यामुळे आणि शेतमजुरी करून देखील योग्य तो मोबदला न मिळाल्याने त्यांना स्वतःची जमीन विकत घेणे शक्य नसते. त्यांना रोजच्या जीवनात खूप समस्यांचा सामना करवा लागतो. आणि म्हणूनच या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून, या कुटुंबांचा आर्थिक विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकारने “दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024” ची सुरुवात करण्याचा एक अतीशय योग्य निर्णय घेतला आहे.

दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि भूमिहीन कुटुंबांना स्वतःची जमीन खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी कर्ज व 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते, म्हणजेच या योजनेच्या लाभार्थी कुटुंबाला 100 टक्के अनुदान तत्वावर जमीन उपलब्ध करून दिली जाते. जेणेकरून आर्थिकदृष्ट्या गरीब आणि भूमिहीन कुटुंबांना स्वतःची जमीन खरेदी करता यावी, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024 (दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024) अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि भूमिहीन नागरिकांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील कुटुंबांसाठी म्हणजेच त्यांना त्यांच्या हक्काची स्वतःची जमीन मिळावी या साठी 2 एकर ओलीताखालील किंवा 4 एकर कोरडवाहू शेत जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजेनच्या माध्यमातून मिळणारी जमीन ही लाभार्थी असलेल्या कुटुंबांच्या पती -पत्नीच्या नावे केली जाईल. मात्र महिला जर विधवा असले तर ही जमीन त्या विधवा महिलेच्या नावे केली जाईल.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024: थोडक्यात माहिती

योजनेचे नावDadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024
(दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब भूमिहीन कुटुंबे
लाभआर्थिकदृष्ट्या गरीब भूमिहीन कुटुंबांना स्वतःची शेतजमीन खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य
योजनेचे उद्देशमहाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब भूमिहीन कुटुंबांना स्वतःची शेतजमीन उपलब्ध करून देणे आणि त्यांचा आर्थिक विकास करणे
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024: योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सुरू केलेली योजना आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि भूमिहीन कुटुंबांचा आर्थिक विकास होण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली गेली आहे.
  • दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील दारिद्र्य रेषेखालील आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबांना आणि भूमिहीन शेतमजुरांना त्यांच्या स्वतःच्या हक्काची शेतजमीन मिळणार आहे.
  • दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि भूमिहीन कुटुंबांना स्वतःची जमीन खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी कर्ज व 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते, म्हणजेच या योजनेच्या लाभार्थी कुटुंबाला 100 टक्के अनुदान तत्वावर जमीन उपलब्ध करून दिली जाते.
  • मित्रांनो, या योजनेची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024: योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024” चे उद्देश काय काय आहेत?

  • दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 चे मुख्य उद्देश म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील दारिद्र्य रेषेखालील आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबांना आणि भूमिहीन शेतमजुरांना त्यांच्या स्वतःच्या हक्काची शेतजमीन उपलब्ध करून देणे.
  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि भूमिहीन कुटुंबांचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि भूमिहीन कुटुंबांना सशक्त बनविणे, त्यांचे जीवनमान सुधारणे.
  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024:लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील अनिसुचीत जाती व नवबौद्ध वर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबे.
  • राज्यातील विधवा महिला व परित्यक्त्या महिला.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024: लाभार्थी कुटुंबाला दिली जाणारी शेतजमीन

  • दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 च्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबाला 2 एकर ओलीताखालील किंवा 4 एकर कोरडवाहू शेत जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024: अनुदान

  • दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि भूमिहीन कुटुंबांना स्वतःची जमीन खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी कर्ज व 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते, म्हणजेच या योजनेच्या लाभार्थी कुटुंबाला 100 टक्के अनुदान तत्वावर जमीन उपलब्ध करून दिली जाते.
Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024:परतफेड कालावधी

  • योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 10 वर्ष निर्धारित केलेला आहे.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024” साठी कोण कोण पात्र असणार आहे? आणि काय काय अटी व शर्ती आहेत?

  • दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 साठी अर्ज फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकच करू शकतात.
  • महाराष्ट्र राज्यातील भूमिहीन कुटुंबांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • राज्यातील अनुसूचित जाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंब ज्यांच्या कडे स्वतःची जमीन नाही यांनाच या योजनेद्वारे लाभ मिळणार आहे.
  • दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 चा अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या माध्यामातून मिळणाऱ्या बिनव्याजी कर्जाची परतफेड लाभार्थी कुटुंबास 10 वर्षात करावी लागणार आहे.
  • सरकारी नोकरी मध्ये कार्यरत असलेल्या कुटुंबियांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 च्या माध्यमातून मिळणारी जमीन ही दुसऱ्या व्यक्तीला विकता येणार नाही किंवा भाडेतत्वावर देखील देता येणार नाही.
  • महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाने ज्या लाभार्थी कुटुंबांना गायरान किंवा सिलिंगची जमीन दिली आहे, अशा नागरिकांना याचा लाभ देण्यात येणार आहे.
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखाली असणे आवश्यक आहे.
  • दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 ही मुंबई व मुंबई उपनगर वगळून राज्यभरात राबविली जाते.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • बँक खात्याचा तपशील
  • उत्पन्नाचा दाखला (मागील 3 वर्षाचा तहसीलदारांनी दिलेला)
  • कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अर्जदार कुटुंब भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी दिलेला दाखला
  • प्रतिज्ञापत्र

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024 (दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024) चा अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
  • जिल्हा कार्यालयात गेल्यानंतर समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्त कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागेल.
  • मित्रांनो, आम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट “दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024” चा अर्ज डाउनलोड करू शकताय.
  • अर्ज मिळाल्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण अर्ज आता तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे, सर्व माहीत अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती अचूक असल्यास आता तुम्ही तुमचा अर्ज कार्यालयात जमा करू शकताय.
  • अशाप्रकारे मित्रांनो, तुमची “दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024” ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

➡️Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024 (दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024) अर्ज ⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालादादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४मोफत शिलाई मशीन योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४बीज भांडवल योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024पीक कर्ज योजना 2024
चंदन कन्या योजना 2024इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024

कृपया ही रोजगार बातम्यांची आणि सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे आणि सरकारी योजनांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024:FAQ’s
दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 ही कोणी सुरू केली आहे?

ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.

दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024 चे लाभार्थी कोण असणार आहे?

महाराष्ट्र राज्यातील अनिसुचीत जाती व नवबौद्ध वर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबे.

या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना काय लाभ मिळणार आहे?

आर्थिकदृष्ट्या गरीब भूमिहीन कुटुंबांना स्वतःची शेतजमीन खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024 चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.