PM Awas Yojana 2024: घरासाठी 2.5 लाख मिळणार? अर्ज कसा करायचा

PM Awas Yojana 2026 Update

PM Awas Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात प्रधानमंत्री आवास योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून देशभरातील गरीब कुटुंबांना स्वतःच्या हक्काची घरे मिळणार आहेत. तसेच ही योजना केंद्र सरकारने सुरू केली असून 2026 मध्येही सुरू आहे. या योजनेचे नवीन अपडेट खाली दिले आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ज्या लोकांकडे आपले स्वतःचे हक्काचे घर नाही, त्यांना शासनामार्फत आर्थिक सहाय्य करून घर मिळवून दिले जाणार आहे. या योजनेचे उद्घाटन 25 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महत्वाचं म्हणजे ही योजना यापूर्वी इंदिरा आवास योजना म्हणून ओळखली जात होती.

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालामध्ये अनेक जनकल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान योजना, प्रधानमंत्री जीवण ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री मानधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ई योजना केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आल्या आहेत.

PM Awas Yojana (प्रधानमंत्री आवास योजना ) ही दोन भागांत विभागण्यात आलेली आहे. एक म्हणजे ग्रामीण आणि दुसरी म्हणजे शहरी भागात विभागण्यात आलेली आहे. या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.

महत्वाचं म्हणजे PM Awas Yojana (प्रधानमंत्री आवास योजना) अंतर्गत आतापर्यंत गरीब कुटुंबांसाठी एकूण 3.21 कोटी घरे बांधण्यात आलेली आहेत. तसेच या योजनेअंतर्गत अजून 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

PM Awas Yojana 2026

प्रधानमंत्री आवास योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावPM Awas Yojana 2024
(प्रधानमंत्री आवास योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीकेंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे
योजनेची सुरुवात कधी झाली25 जून 2015
राज्यमहाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देशदेशभरातील गरीब कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर देणे
योजनेचे लाभार्थीआर्थिकदृष्ट्या गरीब नागरिक
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभस्वतःच्या हक्काचे घर
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन /ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

PM Awas Yojana 2024:योजनेचे प्रकार

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “PM Awas Yojana 2024 (प्रधानमंत्री आवास योजना 2024)” चे प्रकार किती आहेत?

  • पंतप्रधान आवास योजना ग्रामीण
  • पंतप्रधान आवास योजना शहरी

PM Awas Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “PM Awas Yojana 2024 (प्रधानमंत्री आवास योजना 2024)” साठी काय काय पात्रता आवश्यक आहेत? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?

  • PM Awas Yojana 2024 (प्रधानमंत्री आवास योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदार हा सरकारी नोकरीत कार्यरत असेल तर, त्यास या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार नाही.
  • अर्जदार हा आयकर दाता नसावा.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • महत्वाचं म्हणजे अर्जदाराच्या नावे स्वतःचे घर नसावे.
  • अर्जदाराने या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.
  • या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 18 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
  • EWS कोट्यातील लोकांचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
PM Awas Yojana 2024

PM Awas Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “PM Awas Yojana 2024 (प्रधानमंत्री आवास योजना 2024)” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशनकार्ड
  • जातीचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

PM Awas Yojana 2026:अर्ज करण्याची प्रक्रिया

अपडेट: 2026 मध्ये देखील अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीमध्ये उपलब्ध आहे.

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “PM Awas Yojana 2024 (प्रधानमंत्री आवास योजना 2024)” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदार नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • त्यासाठी अर्जदार व्यक्तीस सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज उघडेल.
  • त्यामध्ये तुम्हाला ऑनलाइन अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सदर योजनेचा अर्ज उघडेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • तसेच तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला आता तुम्ही भरलेली अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे. अर्जात विचारलेली माहिती अचूक भरलेली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरलेली असल्यास आता तुम्हाला सबमीट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची PM Awas Yojana 2024 (प्रधानमंत्री आवास योजना 2024) ची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “PM Awas Yojana 2024 (प्रधानमंत्री आवास योजना 2024)” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

PM Awas Yojana 2026:FAQ’s
प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात कोणी केली?

प्रधानमंत्री आवास योजना ची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे.

PM Awas Yojana 2026 (प्रधानमंत्री आवास योजना 2026) ची सुरुवात कधी करण्यात आली?

सदर योजनेची सुरुवात 25 जून 2015 रोजी करण्यात आली आहे.

PM Awas Yojana 2026 (प्रधानमंत्री आवास योजना 2026) चे मुख्य उद्देश काय आहे?

देशभरातील गरीब कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

PM Awas Yojana 2026 (प्रधानमंत्री आवास योजना 2026) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

सदर योजनेच्या माध्यमातून देशभरातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना स्वतःच्या हक्काची घरे मिळणार आहेत.

PM Awas Yojana 2026 (प्रधानमंत्री आवास योजना 2026) चा अर्ज कसा करायचा आहे?

प्रधानमंत्री आवास योजना 2026 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.