Ekatmik Gramin Vikas Yojana In Marathi 2024
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना उच्च कौशल्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर या योजनेच्या मदतीने ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान देखील सुधारण्यास हातभार लागणार आहे.
चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकणार आहे? काय आहेत या योजनेचे उद्देश? त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून किती सबसिडी मिळणार आहे? या योजनेचा अर्ज करताना तुमच्याकडे कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? तसेच या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.
मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार आपल्या देशातील व राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून आपल्या देशातील नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा. तसेच राज्यातील नागरिकांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असते. अशातच केंद्र सरकारने एक योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) होय.
एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | भारत सरकार |
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली | 2 ऑक्टोबर 1980 पासून झाली आहे. |
योजनेचे मुख्य उद्देश | ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे |
योजनेचे लाभार्थी | ग्रामीण भागातील नागरिक |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | रोजगाराच्या नवनवीन संधी मिळणार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 नक्की काय आहे?
केंद्र सरकार आपल्या देशातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या हितासाठी कायम प्रयत्नशील असते. तसेच सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. त्यातीलच एक योजना म्हणजेच Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) होय. या योजनेला इंग्रजीमध्ये Integrated Rural Development Program (IRDP) म्हंटले जाते.
मित्रांनो, केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून देशभरातील ग्रामीण भागात राहणारे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबे, सीमांत शेतकरी, शेती मजूर, ग्रामीण भागातील कारागीर, अनुसूचित जाती -जमातीचे नागरिक, मोलमजुरी करणारे कामगार त्याचबरोबर छोटी मोठी कामे करणाऱ्या नागरिकांना कर्ज किंवा सबसिडी देऊन त्यांना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाते.
त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरिबांना स्वयंरोजगाराचे स्रोत उभा करण्यासाठी व्यापारी सहकार्य आणि प्रादेशिक बँकांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) ही केंद्र आणि राज्य सरकार या दोघांच्या वतीने चालतो. या योजनेअंतर्गत 50 टक्के केंद्र सरकार तसेच 50 टक्के राज्य सरकारचा हिस्सा आहे.
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024:योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली?
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “एकात्मिक ग्रामीण विकास योजना” ची सुरुवात कोणी आणि कधी केली?
- Integrated Rural Development Program (IRDP) म्हणजेच Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) ची सुरुवात ही सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात 1978 मध्ये करण्यात आली. तसेच या योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यातील सर्व पंचायत समितींच्या पातळीवर 2 ऑक्टोबर 1980 पासून झाली आहे.
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024: योजनेचे मुख्य उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- त्याचबरोबर ग्रामीण भागात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे.
- ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करून देणे.
- तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करत असताना विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करण्यास भर देणे.
- महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागात पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्य पालन, डेअरी फार्म, वराह पालन यांसारखे उद्योग सुरू करून तेथील नागरिकांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, हा देखील ‘एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024’ चा मुख्य उद्देश आहे.
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024: लाभार्थी कोण?
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024” च्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकणार आहेत?
- ग्रामीण भागातील मजूर
- शेतकरी व शेतमजुरी करणारे मजूर
- सीमांत शेतकरी
- ग्रामीण कारागीर
- अनुसूचित जाती – जमातीचे नागरिक
- आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिक ज्यांचे वार्षिक उत्पन्न 11 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024:कोणाच्या माध्यमातून कार्य करते?
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024” ही कोणाच्या माध्यमातून काम करते?
- ग्रामीण क्षेत्र आणि रोजगार मंत्रालय
- राज्य पातळीवरील समन्वय समिती
- ब्लॉक किंवा पंचायत
- जिल्हा ग्रामीण विकास संस्था
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024:निधी व्यवस्था
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024” अंतर्गत निधी व्यवस्था कशाप्रकारे आहे?
- Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) साठी केंद्र आणि राज्य सरकार 50:50 टक्के अशा प्रमाणात निधी पुरवठा करतात.
- त्याचबरोबर या योजनेसाठी ग्रामीण बँक, व्यवसायिक बँक आणि सहकारी बँका व पतसंस्था पैसे उपलब्ध करून देतात.
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024:सबसिडी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024” अंतर्गत किती सबसिडी मिळते?
- Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) अंतर्गत महिला लाभार्थी असल्यास 40 टक्के सबसिडी दिली जाते.
- दिव्यांग लाभार्थी असल्यास 30 टक्के सबसिडी दिली जाते. त्याचबरोबर त्यांना या योजनेअंतर्गत 4 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत देखील केली जाते.
- अनुसूचित जाती – जमातीच्या नागरिकांना 50 टक्के सबसिडी दिली जाते त्याचबरोबर 6 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते.
- छोटे शेतकरी व शेट मजूर लाभार्थी असल्यास 33.33 टक्के सबसिडी दिली जाते.
- त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून शिक्षित बेरोजगार म्हणजेच इयत्ता 8 वी पास किंवा नापास लाभार्थी असल्यास त्यांना 50 टक्के सबसिडी दिली जाते.
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
- बँक खात्याचा तपशील
- मागील वर्षीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑनलाइन अर्ज पद्धत :-
- Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी अर्जदारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- त्यासाठी अर्जदारास सर्व प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर अर्जदारास नवीन नोंदणी करावी लागेल.
- त्यासाठी तुम्हाला ‘नवीन नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती जसे की, तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, जन्मतारीख ई माहिती व्यवस्थित भरावी लागणार आहे.
- आता तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील भरावा लागणार आहे.
- त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल ते ओटीपी दिलेल्या जागी भरावा लागणार आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला एक युनिक आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- आता तुम्हाला तुमचा अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे. अर्जात भरलेली संपूर्ण माहिती अचूक आहे की नाही यांची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे.
- संपूर्ण माहिती अचूक असल्यास तुमचा अर्ज तुम्ही सबमीट करू शकताय.
- अशाप्रकारे मित्रांनो, तुमची Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024:FAQ’s
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) ची सुरुवात केंद्र सरकारद्वारे करण्यात आली.
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) ची सुरुवात कधी झाली?
एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024 ची सुरुवात ही सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात 1978 मध्ये करण्यात आली. तसेच या योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यातील सर्व पंचायत समितींच्या पातळीवर 2 ऑक्टोबर 1980 पासून झाली आहे.
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) चे लाभार्थी कोण कोण आहेत?
ग्रामीण भागातील मजूर
शेतकरी व शेतमजुरी करणारे मजूर
सीमांत शेतकरी
ग्रामीण कारागीर
अनुसूचित जाती – जमातीचे नागरिक
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024 च्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
Ekatmik Gramin Vikas Yojana 2024 (एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.