Gay Gotha Anudan Yojana 2024:गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार अनुदान!असा करा अर्ज|

Gay Gotha Anudan Yojana In Marathi 2024

Gay Gotha Anudan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Gay Gotha Anudan Yojana 2024 (गाय गोठा अनुदान योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आपल्या गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधू शकताय. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे.

चला तर मग शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो, जाणून घेऊया नक्की काय ही योजना? या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गोठा बांधण्यासाठी किती अनुदान मिळणार आहे? कोण कोण या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे? कोण कोण या योजनेचा अर्ज करू शकतो? या योजेनच्या अटी व शर्ती काय आहेत? सदर योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो, आम्ही खाली दिलेली सविस्तर माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकताय.

मित्रांनो, आपल्या माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात बहुतांश नागरिक शेती हा व्यवसाय आजदेखील पारंपारिक पद्धतीने करत आहेत. आपल्या राज्यात असा एकही शेतकरी नाही की ज्यांच्या कडे गाई, म्हशी, बैल अशी जनावरे नाहीत, प्रत्येक शेतकऱ्याकडे 1, 2 किंवा त्याहून जास्त जनावरे आहेत. त्याचबरोबर आपल्या राज्यात बहुतांश नागरिक पशुपालक देखील आहेत. या सर्वांकडे त्यांच्या पशूंसाठी म्हणजेच आपल्या जनवारांसाठी असणारा गोठा असतो, ज्यात जनावरे ऊन, वारा, पाऊस यांपासून वाचू शकतात.

मात्र काही शेतकऱ्यांकडे तसेच पशुपालकांकडे आवश्यक तेवढी जागा उपलब्ध नसते, तसेच गोठ्याची जागा ही व्यवस्थित नसते, ओबडधोबड असते, यामुळे त्यांच्या जनावरांना ऊन, वारा, पाऊस, थंडीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर पावसाळ्यात मात्र खूपच समस्या निर्माण होतात. पावसाच्या पाण्यामुळे गोठ्यात सर्वत्र पानी आणि चिखल तयार होतो, जनावरांना चिखलातच बसावे लागते. त्यामुळे जनावरांना मोठ्याप्रमाणात आजार होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे आधुनिक गोठा नसल्यामुळे जनावरांचे शेण व मूत्र इतरत्र पडते, जनावरांच्या खालील बाजूस जखमा देखील होतात.

मित्रांनो, काही ठिकाणी आपण पाहतो की जनावरांचा गोठा हा उत्तम दर्जाचा म्हणजेच चांगल्या प्रकारे बांधलेला नसतो, त्यामुळे त्यांना चारा टाकण्यासाठी दावण नसते, त्यांना मोकळ्या ठिकाणी चारा टाकला जातो, त्या चाऱ्यावरच त्यांचे शेण आणि मूत्र पडल्याने जनावरे तो चारा खात नाहीत, त्यामुळे मोठ्याप्रमाणात चाऱ्याचे देखील नुकसान होते. त्याचबरोबर गोठ्याची जमीन व्यवस्थित सपाट नसल्यामुळे शेण आणि मूत्र जमा करता येत नाही. आपल्याला माहितीच आहे की जनावरांचे शेण हे आपल्या शेतीसाठी किती उपयुक्त असते, त्यांच्या शेणापासून सेंद्रिय खत तयार होते. अशातच जर गोठ्याची जागा ही सिमेंट ने पक्क्या स्वरूपात सपाटीकरण केलेली असल्यास त्यांचे शेण व मूत्र व्यवस्थित गोठ्याच्या एका कोपऱ्यात जमा करून ठेवता येते, जेणेकरून आपल्या शेतीला सेंद्रिय खत मिळावे.

परंतु, महाराष्ट्र राज्यातील आपला शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे त्यांना त्यांच्या जनवारांसाठी चांगला पक्का गोठा बांधण्यासाठी पुरेसे पैसे जवळ नसतात, त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी Gay Gotha Anudan Yojana 2024 (गाय गोठा अनुदान योजना 2024) सुरू करण्याचा अतीशय योग्य निर्णय घेतला आहे.

Gay Gotha Anudan Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गाय गोठा अनुदान योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावGay Gotha Anudan Yojana 2024
(गाय गोठा अनुदान योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासन
योजनेची सुरुवात3 फेब्रुवारी 2021
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालक
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभजनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान
योजनेचे उद्देशपशुपालनासाठी प्रोत्साहित करणे,
शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे
योजनेची अर्ज प्रक्रियाऑफलाइन
गाय गोठा अनुदान योजना 2024 शासन निर्णय➡️येथे क्लिक करा⬅️

Gay Gotha Anudan Yojana 2024: योजनेचे उद्देश

चला तर मग शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो, जाणून घेऊया “गाय गोठा अनुदान योजना 2024” चे उद्देश काय काय आहेत?

 • महाराष्ट्र राज्यातील पशुपालक त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी म्हणजेच गाई, म्हैस, बैलांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • आपल्या राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांना समृद्ध करणे.
 • राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनविणे.
 • राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
 • राज्यातील इतर नागरिकांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे.
 • पशुपालक तसेच शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण करणे.

Gay Gotha Anudan Yojana 2024: योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो, जाणून घेऊया “गाय गोठा अनुदान योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

 • महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे या योजेनची सुरुवात केली गेली आहे.
 • गाय गोठा अनुदान योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
 • या योजनेच्या माध्यमातून मिळणारी अनुदानाची रक्कम लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटी च्या सहाय्याने जमा केली जाते.
 • या योजनेची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे अर्ज करताना कोणत्याही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

Gay Gotha Anudan Yojana 2024: योजनेचे फायदे

चला तर मग शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो, जाणून घेऊया “गाय गोठा अनुदान योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?

 • Gay Gotha Anudan Yojana 2024 (गाय गोठा अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळणार आहे.
 • महाराष्ट्र राज्यात या योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहे.
 • आणि महत्वाचं म्हणजे या योजनेद्वारे मिळणाऱ्या अनुदानातून शेतकरी आणि पशुपालक आपल्या जनावरांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी या समस्यांपासून संरक्षण करणार आहे.

Gay Gotha Anudan Yojana 2024: अनुदान

चला तर मग शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो, जाणून घेऊया “गाय गोठा अनुदान योजना 2024” च्या माध्यमातून किती अनुदान मिळणार आहे?

 • Gay Gotha Anudan Yojana 2024 (गाय गोठा अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकडे 2 ते 6 जनावरे असल्यास 77,188 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
 • त्याचबरोबर 6 ते 12 जनावरांसाठी दुप्पट अनुदान मिळणार आहे.
 • आणि 18 पेक्षा अधिक जनावरांसाठी तीन पट अनुदान दिले जाणार आहे.
Gay Gotha Anudan Yojana 2024

Gay Gotha Anudan Yojana 2024: गोठा कसा असावा

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया गोठा बांधण्याची पद्धत कशी असावी?

 • 2 ते 6 जनावरांसाठी गोठ्याची जागा 26.95 चौरस मीटर असावी, त्याची लांबी 7.70 मीटर व रुंदी 3.50 मीटर असावी.
 • दावण 7.7 मीटर बाय 2.2 मीटर बाय 0.65 मीटर
 • तसेच महत्वाचं म्हणजे जनावरांच्या पाण्यासाठी 200 लीटर क्षमता असलेली टाकी बांधावी.

Gay Gotha Anudan Yojana 2024: कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो

 • अनुसूचित जाती
 • अनुसूचित जमाती
 • भटक्या विमुक्त जाती, जमाती
 • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
 • महिला प्रधान कुटुंब
 • शारीरिक अपंगत्व असलेला व्यक्ती
 • भू-सुधार योजनेचा लाभार्थी
 • कृषी कर्ज माफी 2008 नुसार अल्पभूधारक शेतकरी

Gay Gotha Anudan Yojana 2024: लाभार्थी

 • Gay Gotha Anudan Yojana 2024 (गाय गोठा अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते, त्यामुळे शेतकरी आणि पशुपालक या योजनेचे लाभार्थी आहेत.

Gay Gotha Anudan Yojana 2024: अटी व शर्ती

चला तर मग शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो, जाणून घेऊया “गाय गोठा अनुदान योजना 2024” च्या काय काय अटी व शर्ती आहेत?

 • गाय गोठा अनुदान योजना 2024 चा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अनू पशुपालक घेऊ शकतात.
 • या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे किमान 2 ते 6 जनावरे असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराने त्यांच्या जवळील जनावरांचे टॅपिंग करणे आवश्यक आहे.
 • संबंधित अर्जदारास पशुपालनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराने प्रशिक्षण घेतलेले असावे.
 • सदर योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती घेऊ शकतो.

Gay Gotha Anudan Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो, जाणून घेऊया “गाय गोठा अनुदान योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

 • आधार कार्ड
 • रहिवासी दाखला
 • जातीचा दाखला
 • जनावरांची टायपिंग प्रमाणपत्र
 • कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र
 • ऑनलाइन जॉब कार्ड किंवा झेरॉक्स प्रत
 • जमिनीचा 7/12 व 8 अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 चा उतारा
 • बँक खात्याचा तपशील
 • ग्रामपंचायतचे प्राधान्य क्रमानुसार शिफारस पत्र
 • मोबईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
 • स्वयंघोषणापत्र
 • निवडलेल्या जागेचा रेखांश अक्षांश असलेल्या फोटोसह ग्रामसेवक तांत्रिक सहाय्यक (नरेगा पशू धन पर्यवेक्षक लाभार्थी यांची संयुक्त सहीचा घटनास्थळाचा पाहणी अहवाल)

Gay Gotha Anudan Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो, जाणून घेऊया “गाय गोठा अनुदान योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

 • Gay Gotha Anudan Yojana 2024 (गाय गोठा अनुदान योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी अर्जदारास सर्वात आधी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल.
 • कार्यालयातून Gay Gotha Anudan Yojana 2024 (गाय गोठा अनुदान योजना 2024) चा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे.
 • माहिती भरल्यानंतर अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
 • आणि नंतर अर्ज एकदा तपासून घ्यायचा आहे, संपूर्ण माहिती योग्य असल्यास अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे मोतरांनो, तुमची Gay Gotha Anudan Yojana 2024 (गाय गोठा अनुदान योजना 2024) ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

➡️गाय गोठा अनुदान योजना 2024 चा अर्ज ⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालागाय गोठा अनुदान योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४मोफत शिलाई मशीन योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४बीज भांडवल योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024आंतरजातीय विवाह योजना 2024
डिझेल पंप सबसिडी योजना 2024पीक कर्ज योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024
Gay Gotha Anudan Yojana 2024:FAQ’s
Gay Gotha Anudan Yojana 2024 (गाय गोठा अनुदान योजना 2024) कोणी सुरू केली?

सदर योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे.

गाय गोठा अनुदान योजना 2024 चे लाभार्थी कोण?

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालक

या योजनेच्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे.

गाय गोठा अनुदान योजना 2024 चा अर्ज कसा करायचा आहे?

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.