Pm Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या उतरत्या वयात 3,000/- रुपये दरमहा पेन्शन देण्यात येणार आहे.
चला तर मग ही योजना नक्की काय आहे? हो योजना कोणी आणि कधी सुरू केली? या योजनेचे फायदे काय काय आहेत? कोण कोण या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवू शकणार आहेत? या योजनेचा अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहे? त्याचबरोबर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.
देशभरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) होय. मित्रांनो, असंघटित क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र जे सरकारसोबत रजिस्टर नसताना त्यामध्ये जसे कामगार रस्त्यावरील धंदे करणारे वेंडर्स, रिक्षावाले, घरगुती काम करणाऱ्या स्त्रिया यांचा समावेश होतो.
असंघटित क्षेत्रात तसेच संघटित क्षेत्रात कोण कोण येतात याची संपूर्ण यादी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टलवर दिलेली आहे. Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) चा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षित कायदा सामाजिक सुरक्षा कायदा 2008 नुसार या क्षेत्रातील नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे |
योजनेची सुरुवात कधी झाली | 1 फेब्रुवारी 2019 |
कोणी सुरू केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी |
विभाग | श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार |
योजनेचे मुख्य उद्देश | नागरिकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे |
योजनेचे लाभार्थी | भारत देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | कामगारांना 3,000/- रुपये दरमहा पेन्शन दिली जाणार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन /ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 नक्की काय आहे?
देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी 2019 मध्ये Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) ची सुरुवात केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या उतरत्या वयात दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) ही योजना पूर्णतः असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या संपूर्ण कामाची देखरेख ही मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट विभाग करते. त्याचबरोबर या योजनेमधून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी LIC व CSC सेंटर अंमलबजावणी करते.
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) अंतर्गत असंघटित क्षेत्रातील नागरिकांना महिन्याला काही रक्कम भ्रूण वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती रक्कम पेन्शन स्वरूपात कमीत कमी 3,000/- रुपये दरमहा शासनामार्फत दिले जातात.
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024:योजनेचे फायदे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?
- Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) चा फायदा असंघटित क्षेत्रातील कामगारांना होतो.
- सदर योजनेच्या माध्यमातून लाभार्थी नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सहाय्य म्हणून पेन्शन सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
- तसेच या योजनेच्या माध्यमातून महिन्याला फक्त 55 रुपये गुंतवणूक वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3 हजार रुपये दरमहा पेन्शन स्वरूपात रक्कम मिळते.
- महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी व्यक्तीच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येते.
- Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, यामध्ये कएडनर सरकार संपूर्ण आर्थिक मदत करते.
- तसेच या योजनेच्या लाभार्थी नागरिकांचा 60 वर्ष अगोदर मृत्यू झाल्यास त्यांचे जोडीदार गुंतवणूक चालू ठेऊ शकतात किंवा अकाऊंट बंद करून जेवढी रक्कम भरली आहे त्यानुसार सेविंग बँक व्याजदर लागू होऊन रक्कम दिली जाते.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय कमी असेल तर कमी प्रीमियम भरावा लागतो, त्याचबरोबर जास्त वय असेल तर जास्त प्रीमियम भरावा लागतो.
- या योजनेअंतर्गत भरला जाणारा प्रीमियम हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून डीबीटी करून घेतला जातो, त्यामुळे कोणताही प्रीमियम चुकत नाही.
- नागरिकाचे वय 10 वर्ष असल्यास त्यांना प्रत्येक महिन्याला 55 रुपये भरावे लागतात.
- तसेच नागरिकांचे वय 40 वर्ष असल्यास त्यांना प्रतिमहा 200 रुपये भरावे लागतात.
- आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाभार्थीचे 60 वर्षांनंतर निधन झाल्यावर पेन्शनची रक्कम जोडीदाराला 50 टक्के प्रमाणे देण्यात येते.
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024:पात्रता
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे?
- Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर अर्जदार हा असंघटित क्षेत्रातील नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा आयकर दाता नसावा.
- आर्जदाराकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असावे.
- अर्जदाराला महिन्याला पगार 15,000/- असणे आवश्यक आहे.
- महत्वाचं म्हणजे अर्जदाराकडे ई-श्रम कार्ड असणे आवश्यक आहे.
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024:योजनेचे लाभार्थी
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?
- सफाई कामगार
- लहान व मध्यम शेतकरी
- पशुपालक
- मासेमारी करणारे नागरिक
- जमीन नसलेले शेतकरी
- चर्मकार
- भाजी व फळे विकणारे वेंडर
- रिक्षावाले
- पॅकिंगची कामे करणारे नागरिक
- एक राज्यातून दुसऱ्या राज्यात कामासाठी आलेले नागरिक
- घरगुती काम करणारे
- बांधकाम कामगार
- विटभट्टी व दगड खाणीमध्ये काम करणारे नागरिक
- विणकाम करणारे
- कचरा गोळा करणारे
- डोक्यावर ओझे उचलणारे
- धोबी
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- वयाचा पुरावा
- रहिवासी दाखला
- ई-श्रम कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑनलाइन अर्ज पद्धत :-
- Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी अर्जदारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
- त्यासाठी अर्जदारस सर्व प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला होमपेज वरील ‘क्लिक हेअर टू अप्लाय नाऊ’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल, त्यामध्ये तुम्हाला सेल्फ इनरोलमेन्ट हा पर्याय दिसेल. तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे.
- आता तुम्हाला कॅपच्या कोड टाकून ओटीपी वर क्लिक करावे लागणार आहे.
- तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) चा अर्ज दिसेल.
- आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- त्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- आणि नंतर सबमीट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे मित्रांनो, तुमची Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024:FAQ’s
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024 ची सुरुवात केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी 2019 मध्ये केली आहे.
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
नागरिकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024 च्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणारे नागरिक लाभ घेण्यास पात्र आहेत.
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024 च्या माध्यमातून दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
Pm Shram Yogi Mandhan Yojana 2024 (प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024) चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.