Manodhairya Yojana In Marathi 2024
Manodhairya Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात अत्यंत महत्वाच्या अशा योजनेची म्हणजेच Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही योजना केंद्र व राज्य शासनाच्या एकत्रितकरणाने सुरू करण्यात आलेली अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
आपण या लेखात नक्की काय आहे ही योजना? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? या योजनेचे मुख्य उद्देश काय काय आहेत? काय आहेत या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास कोण पात्र आहेत? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? काय आहेत या योजनेचे फायदे? या योजनेचा अर्ज करतेवेळे कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.
Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) ची सुरुवात केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे केली आहे. या योजनेअंतर्गत बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिलांना व बालकांना पुनर्वसन करण्यासाठी शासनामार्फत 1 ते 10 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. त्याचबरोबर पिडीतांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असणारा निवारा, समुपदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर सहाय्य, शिक्षण आणि व्यवसायिक प्रशिक्षण देखील दिले जाते.
राज्यात बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार यामुळे त्यांना मानसिक आघात होतो. तसेच त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर त्यांना खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्यातील बलात्कार आणि अॅसिड हल्ला व बालकांवरील लैंगिक अत्याचार यामुळे पिडीतांवर झालेल्या मानसिक आघातातून सावरणे आवश्यक असते. याबरोबरच त्यांना आवश्यक असणारा निवारा, आर्थिक सहाय्य व वैद्यकीय आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे महत्वाचे असते.
या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने राज्यभरात Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) सुरू करण्याचा अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतला आहे. राज्यातील बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच अॅसिड हल्ल्यातील पीडित महिला व बालके यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
मनोधैर्य योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | केंद्र सरकार |
योजनेची सुरुवात कधी झाली | 21 ऑक्टोबर 2013 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महिला व बाल विकास विभाग |
योजनेचे मुख्य उद्देश | पिडीत महिला व बालकांना मानसिक आघातातून सावरणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. |
योजनेचे लाभार्थी | पिडीत महिला व बालके |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | 1 ते 10 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन /ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
मनोधैर्य योजना 2024 PDF | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Manodhairya Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मनोधैर्य योजना 2024” चे मुख्य उद्देश काय आहेत?
- अत्याचाराला बळी पडलेल्या पिडीत महिलांना व बालकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- पिडीत महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणे.
- महत्वाचं म्हणजे पिडीत महिला व बालकांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे.
- त्याचबरोबर त्यांना समुपदेशन, निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करणे.
- बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना व त्यांच्या वारसदारांना आवश्यकतेनुसार निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण यांसारख्या आधार सेवा उपलब्ध करून देणे.
- महिला व मुलांवरील हिंसचाराच्या मुद्यांबद्दल जागरूकता वाढविणे.
Manodhairya Yojana 2024: योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मनोधैर्य योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे 21 ऑक्टोबर 2013 मध्ये सुरू करण्यात आलेली Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) ची अंमलबजावणी आणि देखरेख महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या देखरेखेखाली केली जाते.
- त्याचबरोबर या योजनेअंतर्गत 50 टक्के तरतूद ही केंद्र सरकार ची व 50 टक्के तरतूद ही राज्य शासनाची आहे.
- महत्वाचं म्हणजे या योजनेमध्ये पिडीत महिला व बालकांची ओळख गुप्त ठेवण्यात येते.
- ही योजना पिडीत महिला व बालकांना पुन्हा आत्मविश्वास मिळविण्यासाठी आणि सामान्य जीवन जगण्यास सक्षम करते.
Manodhairya Yojana 2024: आर्थिक सहाय्य
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मनोधैर्य योजना 2024” च्या माध्यमातून किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे?
- Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) च्या माध्यमातून पीडितांना किमान 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य करण्यात येते.
- गंभीर व क्रूर स्वरूपाच्या बलात्काराच्या घटनेमध्ये पिडीत महिला व बालकांना किंवा त्यांच्या वारसदारांना 3 लाख रुपये इतके आर्थिक सहाय्य केले जाते.
- अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांस त्यांचा चेहरा विद्रूप झाल्यास अथवा त्यांना कायमचे अपंगत्व आल्यास ₹3,00,000 आणि अॅसिड हल्ल्यात इतर जखमा झालेल्या महिला व बालकांना 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.
- भूल देऊन, फसवून, लग्नाचे आमिष दाखवून केलेले बलात्कार प्रथम खबरी अहवाल दाखल झाल्यानंतर 2 लाख रुपयांच्या 50 टक्के रक्कम धनादेशाद्वारे अदा केली जाईल. तसेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर उर्वरित 50 टक्के अर्थसहाय्य जिल्हा महामंडळाद्वारे अदा करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्य व्यतिरिक्त बलात्कार, लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ल्यात पिडीत महिला व बालक यांना वैद्यकीय उपचार, प्रवास व इतर खर्चासाठी प्रत्येक प्रकरणात 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते.
Manodhairya Yojana 2024: योजनेचे फायदे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मनोधैर्य योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?
- पीडितांना आर्थिक सहाय्य :-
- बलात्कार आणि अॅसिड हल्ल्यातील पिडीत महिलांना 1 लाख रुपयांची मदत.
- लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्यातील पिडीत मुलींना 50,000/- रुपयांची आर्थिक मदत.
- गंभीर प्रकरणांमध्ये 10 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- वैद्यकीय मदत :-
- विनामूल्य वैद्यकीय तपासणी आणि उपचार
- मानसिक आरोग्य समुपदेशन आणि समर्थन
- कायदेशीर मदत :-
- पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यास मदत
- खटल्यात विनामूल्य कायदेशीर सहाय्य
- पुनर्वसन सुविधा :-
- निवारा
- शिक्षण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण
- रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगाराच्या संधी
Manodhairya Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मनोधैर्य योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहेत? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?
- Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पिडीत महिला व बालके महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील पीडितांनाच या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना व बालकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही.
- राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे पिडीत महिला व बालकांस अर्थसहाय्य देण्यात येईल, त्यामुळे गृह विभागाच्या किंवा अन्य विभागाच्या योजनांमध्ये सदर पीडितांना अर्थसहाय्य देण्यात येणार नाही.
- या योजनेअंतर्गत पीडितास मंजूर करावयाच्या अर्थसहाय्याच्या रकमेसाठी तीच्या स्वतःच्या नावे KYV norms असलेले बँक खाते उघडणे बंधनकारक आहे.
- त्याचबरोबर पिडीत व्यक्ति अज्ञात असेल तर त्याच्या बाबतीत पालकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या नावे बँक खाते उघडण्यात यावे.
Manodhairya Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मनोधैर्य योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑनलाइन अर्ज पद्धत :-
- Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) चा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- त्यानंतर होमपेज उघडल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड मिळेल, त्याने तुम्हाला लॉगइन करायचे आहे.
- लॉगइन केल्यानंतर तुम्हाला Manodhairya Yojana (मनोधैर्य योजना) वर क्लिक करायचे आहे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- तसेच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
- संपूर्ण माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे मित्रांनो, Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
- Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) चा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पीडितेला आपल्या क्षेत्रातील महिला व बाल विकास विभागात जावे लागणार आहे.
- त्यानंतर तेथून सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे.
- आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपर्वक भरावी लागेल.
- तसेच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आपल्या अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.
- आणि नंतर भरलेला अर्ज संबंधित विभागात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “मनोधैर्य योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Manodhairya Yojana 2024:FAQ’s
Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?
सदर योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे.
Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
पिडीत महिला व बालकांना मानसिक आघातातून सावरणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) चे च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
या योजनेच्या माध्यमातून पीडितांना 1 ते 10 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
मनोधैर्य योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
Manodhairya Yojana 2024 (मनोधैर्य योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?
बलात्कार व अॅसिड हल्ला पिडीत महिला व बालके या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.