PM PRANAM YOJANA In Marathi 2024
PM PRANAM YOJANA 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या लेखात PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
केंद्र सरकार आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून शेतकरी बांधवांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांचे जीवनमान सुधारावे, एकूणच त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असते. अशातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी तसेच त्यांच्या हितासाठी एक योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) होय.
PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) च्या माध्यमातून शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरील अनुदानाचा भार देखील कमी होणार आहे. महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे रासायनिक खतांना पर्यायी खते निर्माण करणे हे आहे.
प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | केंद्र सरकार |
योजनेची सुरुवात कधी करण्यातआली | 7 सप्टेंबर 2022 |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेचे मुख्य उद्देश | रासायनिक खतांचा वापर कमी करणे |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | या योजनेच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढविण्यास मदत होणार आहे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
PM PRANAM YOJANA 2024 नक्की काय आहे?
सर्वात आधी आपण PRANAM म्हणजे काय ते जाणून घेऊया, PRANAM म्हणजेच Promotion of Alternate Nutrients for Agriculture Management. PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे त्याचबरोबर शेतीची उत्पादकता वाढविणे, पिकांची पोषकता वाढविणे, तसेच नैसर्गिक खतांचा वापर करणे व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे यावर भर देण्यात येणार आहे.
रासायनिक खतांना पर्यायी खते म्हणून सेंद्रिय खते, कंपोस्ट खत, शेणखत, बायोफर्टीलायझर यांचा उपयोग करणे आणि महत्वाचं म्हणजे नैसर्गिक खतांचा वापर करून जमिनीची धूप थांबवणे व मातीचे आरोग्य सुधारणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
PM PRANAM YOJANA 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांच्या मिश्रणात खतांचा संतुलन वापर करणे.
- शेतीची उत्पादकता वाढविणे.
- शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे.
- या योजनेअंतर्गत प्रथम एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- त्याचबरोबर 10 हजार जैव संसाधन केंद्र स्थापन केली जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सूक्ष्म खते आणि कीटकनाशक उत्पादनाचे आणि वितरणाचे जाळे वाढविण्यास मदत होईल.
- रासायनिक खतांच्या कमी वापरामुळे जमिनीचा दर्जा सुधारेल, यामुळे जमिनीची होणारी धूप देखील थांबेल.
- महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून शेती उत्पादकता वाढण्यास हातभार लागणार आहे.
PM PRANAM YOJANA 2024:योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) च्या माध्यमातून रासायनिक खतांचा वापर कमी होणार आहे.
- या योजनेसाठी कोणतेही वेगळे अनुदान दिले जाणार नाही.
- रासायनिक खतांसाठी दिला जाणारा निधी पंतप्रधान प्रणाम योजनेसाठी वापरण्यात येणार आहे.
- प्रत्येक राज्याला अनुदानावर बचत केलेल्या पैशाच्या 50 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत मिळेल.
- तसेच मिळालेल्या निधीपैकी 70 टक्के निधी पर्याय खते आणि पर्याय खत उत्पादन सुविधा विकसित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
- उर्वरित 30 टक्के निधी हा शेतकरी पंचायत शेतकरी उत्पादक संस्था आणि बचत गट यांना मदत करण्यासाठी वापरला जाईल.
PM PRANAM YOJANA 2024:लाभार्थी
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?
- PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) च्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकरी लाभ घेऊ शकणार आहेत.
PM PRANAM YOJANA 2024:पात्रता
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे?
- केंद्र सरकारने सुरू केलेल्या “PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024)” साठी राज्यातील सर्व शेतकरी पात्र आहेत.
- तसेच रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय खतांचा जास्त वापर करणारे सर्व इच्छुक शेतकरी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.
PM PRANAM YOJANA 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
PM PRANAM YOJANA 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत. त्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांना आपल्या जवळील सी एस सी सेंटरला भेट द्यावी लागणार आहे.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024)” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
PM PRANAM YOJANA 2024:FAQ’s
PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?
प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024 ची सुरुवात केंद्र सरकारद्वारे करण्यात आली आहे.
PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) ची सुरुवात कधी करण्यात आली?
सदर योजनेची सुरुवात 7 सप्टेंबर 2022 साली करण्यात आली आहे.
PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
रासायनिक खतांचा वापर कमी करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) चे लाभार्थी कोण कोण आहेत?
प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024 च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी पात्र आहेत.
PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
PM PRANAM YOJANA 2024 (प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024) चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.