Maharashtra Lek Ladki Yojana 2024:लेक लाडकी योजने अंतर्गत मिळणार 1,01,000/- रुपये!

Maharashtra Lek Ladki Yojana In Marathi 2024

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Lek Ladki Yojana 2024 (लेक लाडकी योजना २०२४) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, नक्की काय आहे ही योजना? या योजनेतून काय लाभ मिळणार आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहे? या योजनेचे फायदे काय आहेत? या योजनेचे वैशिष्ट्ये त्याचप्रमाणे उद्देश काय आहेत? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे? या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतो? अशी संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो, महाराष्ट्र शासन आपल्या राज्यात महिलांसाठी सतत नवनवीन योजना सुरू करत असते. तसेच महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्याचबरोबर महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभे रहाता यावे, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा या साठी राज्य शासनाद्वारे विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे “लेक लाडकी योजना २०२४” होय. या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्मला आल्यानंतर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलावा, मुलगी जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने आनंद साजरा करावा, त्याचबरोबर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिच्या खात्यातून तिला पैसे काढता येणार आहेत.

लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत आर्थिक मदत करणे हे आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्यातील मुलींना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी २०२३ च्या बजट मधून सुरू करण्यात आलेली एक अतीशय महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत तिच्या शिक्षणासाठी एकूण 75,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

लेक लाडकी योजना 2024 च्या माध्यमातून मिळणारे हे आर्थिक सहाय्य एकूण 5 टप्प्यात विभागून देण्यात येणार आहे. मित्रांनो, ही योजना प्रामुख्याने मुलींसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करून, स्वावलंबी बनून तसेच त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास देखील होणार आहे. मित्रांनो, आजदेखील बहुतांश ठिकाणी मुलगी जन्माला आल्यानंतर तुच्छ मानले जाते, अनेक मुली आज देखील शिक्षणापासून वंचित आहेत, परंतु या योजनेच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टींना आळा बसणार आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे.

Maharashtra Lek Ladki Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लेक लाडकी योजना २०२४: थोडक्यात माहिती

योजनेचे नावMaharashtra Lek Ladki Yojana 2024 (लेक लाडकी योजना २०२४)
योजनेचे उद्देशमुलींना स्वावलंबी बनवून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
योजनेअंतर्गत मिळणारा लाभ1,01,000/- रुपये आर्थिक सहाय्य
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील मुली
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन /ऑफलाइन
योजनेचा अर्ज➡️येथे क्लिक करा⬅️

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “लेक लाडकी योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

 • मित्रांनो, ही योजना राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
 • आपल्या राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत आर्थिक मदत करणे.
 • मुलींचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा यासाठी ही एक अतीशय महत्वाची योजना ठरणार आहे.
 • आणि महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम थेट लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात डीबीटी च्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.
 • मित्रांनो, “लेक लाडकी योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कुटुंबाला कुठलीही अडचण येणार नाही, कारण या योजनेची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आलेली आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून मुली जन्मल्यानंतर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलणार आहे.
 • लेक लाडकी योजने अंतर्गत मुलींचा आत्मविश्वास वाढणार आहे.
 • मुली स्वावलंबी बनणार आहेत, तसेच त्या स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहणार आहेत.

लेक लाडकी योजना शासन निर्णय (GR)

Maharashtra Lek Ladki Yojana 2024

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “लेक लाडकी योजना 2024” चे उद्देश काय काय आहेत?

 • लेक लाडकी योजना 2024 चे मुख्य उद्देश म्हणजे आपल्या राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत आर्थिक मदत करणे.
 • गर्भ हत्येला आळा घालणे.
 • आपल्या राज्यातील मुलींचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
 • मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
 • मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे.
 • आपल्या राज्यातील मुलींचा सर्वांगीण विकास करणे.
 • राज्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना मुलीचे शिक्षण परून करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये.
 • तसेच इतर कोणाकडून कर्ज काढून किंवा पैसे उधार घेण्याची वेळ येऊ नये.
 • राज्यातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये.
 • मुलींचा जन्मदर वाढवण्यास मदत करणे.
 • मुलींचा मृत्यूदर कमी करणे.
 • आपल्या राज्यातील मुलींना स्वावलंबी बनविणे.

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: आर्थिक सहाय्य

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “लेक लाडकी योजना 2024” च्या माध्यमातून किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे?

टप्पा रक्कम
पहिलामुलीच्या जन्मानंतर5,000/- रुपये
दुसरामुलगी इयत्ता 1 ली मध्ये गेल्यावर6,000/- रुपये
तिसरामुलगी इयत्ता 6 वी मध्ये गेल्यावर7,000/- रुपये
चौथामुलगी इयत्ता 11वी मध्ये गेल्यावर8,000/- रुपये
पाचवामुलगी 18 वर्षाची झाल्यावर75,000/- रुपये
एकूण लाभ 1,01,000/- रुपये

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: योजनेचे लाभार्थी

 • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली
 • पिवळा आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबे

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: योजनेची कार्यपद्धती

Maharashtra Lek Ladki Yojana 2024

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: योजनेचे लाभ

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “लेक लाडकी योजना 2024” चे काय काय लाभ आहेत?

 • लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांचे वय 18 वर्षे पूर्ण होई पर्यंत एकूण 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.
 • जेव्हा मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होते तेव्हा तिच्या बँक खात्यात 75,000/- रुपये थेट डीबीटी च्या सहाय्याने जमा केले जातात.
 • या योजनेच्या माध्यमातून मुली स्वतःच्या शिक्षणासाठी सक्षम बनतील.
 • या योजनेच्या माध्यमातून मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतः नोकरी मिळवू शकतील.
 • त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतील.
 • लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींचा सर्वांगीण विकास होणार आहे.
 • तसेच त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास देखील या योजनेच्या माध्यमातून होणार आहे.
 • आपल्या राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबात असणाऱ्या मुलींना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत मिळणार आहे. जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारेल.
 • महत्वाचं म्हणजे या योजेनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील मुलींचे भविष्य उज्वल होणार आहे.

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “लेक लाडकी योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

 • अर्जदार मुलीचे आधार कार्ड
 • पालकाचे आधार कार्ड
 • मुलीचा जन्म दाखला
 • कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला [वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे]
 • बँक पासबुक (पहिल्या पानाची छायांकित प्रत)
 • रेशन कार्ड (पिवळे अथवा केशरी रेश कार्ड साक्षांकित प्रत)
 • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
 • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला)
 • बोनाफाईड
 • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
 • मोबईल नबंर
 • अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसल्यास अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: अर्ज करण्याची पद्धत

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “लेक लाडकी योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

 • सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्व प्रथम लेक लाडकी योजना च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्यासमोर होमपेज उघडेल.
 • होमपेज उघडल्यानंतर तिथे तुम्हाला लेक लाडकी योजना या वर क्लिक करावे लागणार आहे.
 • त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल.
 • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
 • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर त्यासोबत तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
 • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: महत्वाच्या लिंक्स

लेक लाडकी योजना शासन निर्णय (GR)➡️येथे क्लिक करा⬅️
लेक लाडकी योजना अर्ज ➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “लेक लाडकी योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024मोफत पिठाची गिरणी योजना 2024
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024

कृपया ही रोजगार बातम्यांची आणि सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे आणि सरकारी योजनांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: FAQ’s
लेक लाडकी योजना 2024 चे उद्देश काय आहे?

मुलींना स्वावलंबी बनवून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.

या योजनेअंतर्गत किती लाभ मिळणार आहे?

योजनेअंतर्गत मिळणारा लाभ एकूण 98,000/-रुपये.

या योजनेसाठी लभार्थी कोण आहे?

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली, आणि
पिवळा आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबे

लेक लाडकी योजना 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ?

सदर योजनेसाठी ऑनलाइन /ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.