Madh Kendra Yojana 2024:मध केंद्र उद्योगासाठी मिळणार 50 टक्के अनुदान!!

Table of Contents

Madh Kendra Yojana In Marathi 2024

Madh Kendra Yojana 2024:नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्यात मधकेंद्र उद्योगाला चालना देण्यासाठी त्याचबरोबर इतर नागरिकांना मधकेंद्र उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

चला तर मग जाणून घेऊया ही योजना नक्की काय आहे? ही योजना कोणी सुरू केली आहे? या योजनेचे मुख्य उद्देश काय काय आहेत? या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहे? या योजनेअंतर्गत कोणती कोणती कामे करायची आहेत? या योजनेचे काय काय फायदे आहेत? या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदारांकडे कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. शेती करत असताना त्यासोबतच एखादा छोटा मोठा व्यवसाय शेतकरी करत असतात. जेणेकरून त्यांचा आर्थिक विकास व्हावा. त्यामुळे शेती हा व्यवसाय जास्तीत जास्त फायदेशीर करण्यासाठी आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. अशातच महाराष्ट्र राज्य सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) होय.

Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) च्या माध्यमातून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना मध केंद्र उद्योग सुरू करण्यासाठी शासनामार्फत 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तसेच उर्वरित 50 टक्के रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे. त्याचबरोबर मध केंद्र योजना 2024 साठी मुद्रा लोन योजनेतून देखील कर्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) राबविली जाते. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून महाबळेश्वर येथे मध संचालनालय सुरू करण्यात आले आहे. या संचालनालयाद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर या केंद्राच्या माध्यमातून मधमाशा वस्तीसह मदत पेट्या तसेच अन्य साहित्याचे वितरण देखील करण्यात येते.

Madh Kendra Yojana 2024

मध केंद्र योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावMadh Kendra Yojana 2024
(मध केंद्र योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागखादी व ग्रामोद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील शेतकरी व इतर नागरिकांना मधकेंद्र उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी व मधपाळ
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभमधकेंद्र उद्योग सुरू करण्यासाठी 50 टक्के अनुदान मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Madh Kendra Yojana 2024 नक्की काय आहे?

महाराष्ट्र राज्य शासनाच्या खादी व ग्रामोद्योग विभागामार्फत सुरू करण्यात आलेली Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) ही एक महत्वाची अशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना मधकेंद्र उद्योग सुरू करण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तसेच उर्वरित 50 टक्के रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतः भरायची आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून कर्ज देखील दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर कोणाकडून कर्ज किंवा इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

मित्रांनो, मधमाशांमुळे शेतीच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होते, त्यामुळे मध केंद्र उद्योगाला चालना देण्यासाठी राज्यसरकारने आता पुढाकार घेतला आहे. मध केंद्र व्यवसाय केवळ शेतीला एक जोडधंदा म्हणून न करता एक मुख्य व्यवसाय म्हणून केल्यास राज्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास देखील या योजनेच्या माध्यमातून होईल.

त्याचबरोबर मधमाशापालन हा एक अतीशय महत्वाचा असा बहुउद्देशीय व्यवसाय म्हणून म्हणून ओळखला जातो. Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) च्या माध्यमातून मध संकलन मध्यमाशांच्या वासहतीची संख्या वाढविणे, तसेच मराठवाडा मध्ये तेलबियांच्या पिकाचे प्रमाण अधिक आहे, पश्चिम घाटात व विदर्भात असणारे वनक्षेत्र, कोकण विभागात जंगल व फळबागांचे क्षेत्र तसेच वैविध्यपूर्ण निसर्ग संपदा असल्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यात मधकेंद्र उद्योगाच्या विकासाला खूप मोठी संधी आहे.

मित्रांनो, नक्कीच या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविल्यानंतर मध संकलन करून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास हातभार लागणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे. Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) ही राज्यातील सर्वच जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे.

Madh Kendra Yojana 2024

Madh Kendra Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मध केंद्र योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहे?

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मध केंद्र उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील मधुमक्षिका पालन व्यवसायातून उत्पन्नाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व घटकांना सहाय्य करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
  • मध उद्योगाचा विकास करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे.
  • त्याचबरोबर राज्यात बेरोजगारी कमी करणे.
  • राज्यात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.

Madh Kendra Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मध केंद्र योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहे?

  • महाराष्ट्र राज्य सरकारच्या खादी व ग्रामोद्योग विभागामार्फत राबविण्यात आलेली तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेचा लाभ हा राज्यातील सर्व शेतकरी व मधपालन व्यवसायिकांना घेता येणार आहे.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुण तरुणी देखील घेऊ शकतात.
  • त्याचबरोबर मध केंद्र योजना 2024 च्या माध्यमातून मध केंद्र उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. आणि उर्वरित 50 टक्के रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
  • या योजनेसाठी राज्यभरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना अर्ज करता येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.

Madh Kendra Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मध केंद्र योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • मध केंद्र योजना 2024 च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी राज्यातील सर्व नागरिक पात्र आहेत. ज्यांना स्वतःचे मधमाशी केंद्र सुरू करायचे आहे, असे सर्व नागरिक या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवू शकतात.
  • या योजनेसाठी कुठलीही अट ठेवण्यात आलेली नाही.
  • राज्यातील कोणत्याही जाती धर्माचे नागरिक तसेच सर्व शेतकरी, मधपालक, तरुण-तरुणी, बेरोजगार असलेले तरुण ई सर्वच नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात व आपला स्वतःचा मध केंद्र उद्योग सुरू करू शकतात.

Madh Kendra Yojana 2024:लाभ

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मध केंद्र योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

  • आपल्या राज्यातील शेतकरी व इतर नागरिक जे मध केंद्र उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत, अशा नागरिकांना Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) च्या माध्यमातून स्वतःचा मध केंद्र उद्योग सुरू करण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. आणि उर्वरित 50 टक्के रक्कम ही लाभार्थी नागरिकांना स्वतः भरावी लागणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील.
  • त्याचबरोबर राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर व सशक्त बनतील.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील बेरोजगार तरुण तरुणी स्वतःचा मध केंद्र उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
  • तसेच या योजनेसाठी मृदा लोन योजनेअंतर्गत कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि मधपालकांना इतर कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.
Madh Kendra Yojana 2024

Madh Kendra Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मध केंद्र योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?

  • Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ दिला जाणार नाही.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • अर्जदार व्यक्ती हा 10 वी पास असणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदार व्यक्तीचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीच्या नावे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे भाडेतत्वावर घेतलेली जमीन असेल तरीही चालेल.
  • त्याचबरोबर अर्जदाराकडे मधमाशापालन प्रजनन व मदत उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

Madh Kendra Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मध केंद्र योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • मधमाशी पालन प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचा फोटो

Madh Kendra Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मध केंद्र योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी अर्जदारास सर्व प्रथम आपल्या जवळील जिल्हा कार्यालयात जावे लागणार आहे.
  • त्यानंतर कार्यालयातून खादी व ग्रामोद्योग केंद्रात जावे लागणार आहे.
  • तेथून तुम्हाला Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) चा अर्ज घ्यावा लागणार आहे.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व अचूकपद्धतीने भरायची आहे.
  • अर्जात संपूर्ण माहिती भरल्यानंतर आता तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आपल्या अर्जासोबत जोडायची आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “मध केंद्र योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024सुभद्रा योजना 2024
ड्रोन अनुदान योजना 2024बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024
मोफत फवारणी पंप योजना 2024प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024
Madh Kendra Yojana 2024:FAQ’s
Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

मध केंद्र योजना 2024 ची सुरुवात महाराष्ट्र राज्य शासनाच्या खादी व ग्रामोद्योग विभागाने केली आहे.

Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील शेतकरी व इतर नागरिकांना मधकेंद्र उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) च्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकतो?

सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकरी व तरुण तरुणी लाभ मिळविण्यासाठी पात्र आहेत.

Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून स्वतःचा मध केंद्र उद्योग सुरू करण्यासाठी शासनामार्फत 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

Madh Kendra Yojana 2024 (मध केंद्र योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

मध केंद्र योजना 2024 चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.