Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024: आता विहीरीसाठी मिळणार 2.5 लाखांचे अनुदान!!

Table of Contents

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana In Marathi 2024

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकरी बांधवांना भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे.

चला तर मग ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024’ ची सविस्तर माहिती जसे की ही योजना नक्की काय आहे? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र ठरणार आहे? काय काय पात्रता आणि कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत? त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? आणि या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखाद्वारे पाहणार आहोत.

आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. अशातच महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) होय.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) च्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकरी बांधवांना शेतीच्या सिंचनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शासनामार्फत अनुदान देण्यात येणार आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांना आपल्या पिकाला पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, तसेच त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा आर्थिक विकास व्हावा. राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागणार आहे.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावBirsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024
(बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
योजनेची सुरुवात कधी झाली3 जानेवारी 2018
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागकृषी विभाग
योजनेचे मुख्य उद्देशशेतकऱ्यांना नवीन विहीर बांधण्यासाठी तसेच जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी अनुदान देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील आदिवासी बांधव शेतकरी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभशेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत राज्यातील आदिवासी शेतकरी बांधवांसाठी तसेच अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधण्यासाठी तसेच जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी आणि बोरिंग पंपसंच बसविण्यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जाते.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
  • राज्यातील ज्या शेतकऱ्यांना जुनी विहीर दुरुस्त करायची आहे, त्यांना 50 हजार रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
  • त्याचबरोबर बोरिंग पंपसंच बसविण्यासाठी शेतकऱ्यांना 20 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून वीज जोडणी साठी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जाणार आहेत.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024:योजेनचे लाभार्थी

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकरी बांधव
  • राज्यातील आदिवासी शेतकरी बांधव या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024:लाभ

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024” च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

  • Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विहीर बांधण्यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जाणार आहे.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024:मिळणारे अनुदान

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024” च्या माध्यमातून किती अनुदान देण्यात येणार आहे?

नवीन विहीर बांधण्यासाठी2.5 लाख रुपये
जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी50 हजार रुपये
बोरिंग पंपसंच बसविण्यासाठी20 हजार रुपये
वीज जोडणीसाठी वीज जोडणी आकार अंतर्गत10 हजार रुपये

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहेत? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती आहेत?

  • Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावा.
  • अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जाती -जमाती प्रवर्गातील असावा.
  • त्याचबरोबर अर्जदार शेतकऱ्यांकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे बंधनकारक आहे.
  • तसेच अर्जदार शेतकऱ्याकडे 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत नवीन विहीरीसाठी किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून एकदा लाभ घेतल्यानंतर पुढील 5 वर्ष लाभार्थी अर्जदार शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार नाही.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
  • बँक खात्याचा तपशील
  • अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्जदारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला होमपेज दिसेल, त्यामध्ये तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागणार आहे.
  • त्यासाठी तुम्हाला ‘नवीन अर्जदार नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागणार आहे आणि नंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे करायचे आहे.
  • आता तुम्हाला महाडीबीटीचे मुख्य पृष्ठ दिसेल त्यामध्ये ‘वैयक्तिक तपशील’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर आता तुम्हाला जात प्रमाणपत्र असेल तर होय करायचे आहे अन्यथा नाही करायचे आहे.
  • त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, शेतकरी अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला टॅब ओपन करा व त्यामध्ये तुमचा कायमचा पत्ता व पत्रव्यवहार पत्ता भरून घ्या.
  • त्यानंतर जमिनीचा 8 अ उतारा अपलोड करा, त्याचबरोबर तुम्हाला किती शेती आहे ते देखील नोंदवा.
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024
  • त्यानंतर मुख्य पेजवर यावे व इतर आवश्यक माहिती भरावी, तसेच पर्यावरण शेतात असलेल्या सिंचन स्वतःचा तपशील भरणे आवश्यक आहे.
  • आता होमपेज वरील ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024
  • त्यानंतर अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना निवडून घ्यावी. त्यामध्ये नवीन विहीरीचे बांधकाम हा पर्याय निवडा.
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024
  • अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुमची Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
मोफत फवारणी पंप योजना 2024सौर कुंपण योजना 2024
प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024:FAQ’s
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024 ची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाने 3 जानेवारी 2018 रोजी केली आहे.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधण्यासाठी तसेच जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी अनुदान देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती-जमातीतील तसेच आदिवासी शेतकरी बांधव असर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधण्यासाठी व जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 (बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.