Agri Stack Yojana Maharashtra 2024:राज्यातील शेतकऱ्यांसाठी 16 तारखेपासून नवीन योजना सुरू; मिळणार हे फायदे

Agri Stack Yojana Maharashtra In Marathi 2024

Agri Stack Yojana Maharashtra 2024: नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार डिजिटल पद्धतीचा वापर शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी ” अॅग्री स्टॅक योजना” राबवणार आहे. सरकार राबवत असलेल्या योजना राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्याचा अत्यंत महत्वाचा असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अॅग्री स्टॅक योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. सर्वात महत्वाचं म्हणजे डिजिटल पद्धतीचा वापर शेतीमध्ये व्हावा, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतत प्रयत्नशील असते. तशीच एक योजना केंद्र सरकार राज्यातील शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी घेऊन आली आहे. तीच नाव आहे “अॅग्री स्टॅक योजना” होय.

Agri Stack Yojana Maharashtra 2024 अॅग्री स्टॅक योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्याचा भरपूर फायदा होणार आहे. ही योजना येत्या सोमवारी म्हणजेच 16 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे. या योजनेमार्फत प्रत्येक गावात गावनिहाय अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारने अॅग्री स्टॅक योजना योजनेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. सरकार राबवत असलेल्या योजना राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Agri Stack Yojana Maharashtra 2024

अॅग्री स्टॅक योजना 2024 ची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतीचा संयुक्त माहिती संच तयार केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची माहिती आणि आकडेवारी कळण्यास मदत होणार आहे.

त्याचबरोबर या योजनेला येत्या सोमवारपासून म्हणजेच 16 डिसेंबर 2024 पासून सुरुवात केली जाणार आहे. तसेच प्रत्येक गावात या संबंधी शिबीर देखील राबवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीएम किसान योजना आणि पीक विम्याबरोबरच सर्व शासकीय योजनांचा लाभ अगदी सहज मिळेल. यासाठी देशभरात शेतकरी नोंदणी कार्यक्रमाला गती देण्यात येणार आहे.

Agri Stack Yojana Maharashtra 2024:पुन्हा पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही

या कार्यक्रमात खसरा, खतौनी या शेतकऱ्यांच्या नोंदी त्यांच्या आधारशी जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल कारण त्यांना सरकारी योजनांसाठी पुन्हा पुन्हा केवायसी (KYC) करण्याची गरज भासणार नाही.

Agri Stack Yojana Maharashtra 2024 अॅग्री स्टॅक योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना सर्वप्रथम नोंदणी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी अहवालानुसार हे काम 31 डिसेंबर 2024 पूर्वी पूर्ण करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही विभागाच्या https://upfr.agristack.gov.in/ या वेब पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकताय. त्याचबरोबर तुम्ही शिबिरात किंवा ग्राम पंचायतमध्ये भेट देऊनही तुमची नोंदणी करून या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवू शकताय.