Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025: आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदत वाढली|

Ladki Bahin Yojana E-KYC Update In Marathi 2025

Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025:नमस्कार लाडक्या बहिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे! लाडकी बहीण केवायसीची जी काही मुदत आहे ती आता वाढवलेली आहे. चला तर मग लाडक्या बहिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख काय आहे, हे आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. कृपया हा संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की वाचा, जेणेकरून तुम्हाला तुमची ई-केवायसी करण्यासाठी कोणतीही समस्या येणार नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आर्टिफिशियल पोर्टलवर 18 सप्टेंबर 2025 पासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेसाठी यापूर्वी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला होता म्हणजेच 18 सप्टेंबर 2025 ते 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते. आपल्या राज्यातील अनेक लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया या कालावधीमध्ये पूर्ण देखील केली आहे.

मात्र अजून देखील काही लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, अशा सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून केले होते.

लाडक्या बहिणींनो तुम्ही जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर चिंता बाळगण्याची आवश्यकता नाही. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची जी काही मुदत आहे ती आता वाढविण्यात आली आहे. चला तर मग पाहूया काय आहे लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची शेवटची तारीख.

Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025

Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025:e-kyc मुदतवाढ

● महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. आजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरीत्या राबविली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना देण्यात आली होती.

परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींना गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पीटीआय हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांचे पाती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्याने आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारीत मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025

Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025:अशी करा तुमची ई-केवायसी

● चला तर मग लाडक्या बहिणींनो जाणून घेऊया तुम्ही तुमची ई- केवायसी क्षणात कशी करू शकता

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला पोर्टलवर ई-केवायसी हा पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • ई-केवायसी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल.
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्टर नंबर टाकावा लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला कॅपच्या कोड भरावा लागणार आहे.
  • आता तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकाद्वारे व्हेरिफिकेशन मंजूरी द्यावी लागेल.
  • त्यासाठी तुम्हाला “मी सहमत आहे” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला त्याचाच खाली “ओटीपी” हा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तुम्हाला तो तिथे भरावा लागणार आहे.
  • त्याचबरोबर स्वतःचा आधार ओटीपी झाल्यानंतर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार ओटीपी तुम्हाला व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे.
  • Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025 अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया काही क्षणात पूर्ण करू शकताय.

📢Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025 माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकताय.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025 माझी लाडकी बहीण योजना ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तुम्ही ही माहिती आपल्या जवळील नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करण्यास विसरू नका. त्याचबरोबर अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या द महारोजगार डॉट कॉम या वेबसाइटला वेळोवेळी भेट देत रहा.

धन्यवाद !!