Murghas Sanyantra Yojana 2026: शेतकऱ्यांसाठी सरकारी अनुदानाची मोठी संधी

Murghas Sanyantra Yojana 2026: नमस्कार मित्रांनो, दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने राबवलेली ‘मुरघास संयंत्र योजना’ ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मुरघास तयार करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

ही योजना ‘वैरण विकास योजना’ अंतर्गत राबवली जाते. आपल्या महाराष्ट्रातील पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन चारा टंचाई कमी करणे आणि दूध उत्पादन वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

मुरघास संयंत्र योजना नेमकी काय आहे?

मुरघास म्हणजे हिरव्या चाऱ्याचे हवाबंद साठवण करून तयार केलेले पौष्टिक पशुखाद्य होय. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मुरघास तयार करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदीवर अनुदान दिले जाते. काही ठिकाणी शेतकरी गट, महिला बचत गट आणि FPO यांनाही या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चाऱ्याची योग्य साठवण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेमुळे:

  • चाऱ्याचा अपव्यय कमी होतो.
  • वर्षभर पशू खाद्य उपलब्ध राहते
  • दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते
  • पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर बनतो

Murghas Sanyantra Yojana 2026: किती अनुदान दिले जाते?

Murghas Sanyantra Vatap Yojana 2026 farmer operating silage machine with subsidy support
Murghas Sanyantra Vatap Yojana 2026

मुरघास संयंत्र वाटप योजना अंतर्गत शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. लाभार्थ्यांच्या प्रवर्गानुसार आणि जिल्ह्यानुसार अनुदानाचे प्रमाण बदलू शकते. त्याचबरोबर काही प्रकरणांमध्ये 50% ते 75% पर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. महिला शेतकरी, अनुसूचित जाती -जमाती तसेच शेतकरी गटांना अधिक लाभ देखील जातो.

● यंत्राची किंमत मर्यादा : ₹26 लाख

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 50% अनुदान (कमाल ₹13 लाख)
  • अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग: 75%अनुदान (कमाल ₹19.5 लाख)

योजनेचे फायदे काय काय आहेत?

मुरघास संयंत्र योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. चारा साठवण व्यवस्थित झाल्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. दूध उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ लागते. त्याचबरोबर पशुपालकांना बाजारातून महागडा चारा खरेदी करण्याची गरज भासत नाही.

Murghas Sanyantra Yojana 2026: कोण अर्ज करू शकतो?

Farmer operating silage machine under Murghas Sanyantra Subsidy Scheme 2026
Murghas Sanyantra Yojana 2026

या योजनेसाठी खालील लाभार्थी पात्र ठरू शकतात:

  • लहान व मध्यम शेतकरी
  • पशुपालक व दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी
  • महिला बचत गट
  • शेतकरी उत्पादन कंपनी (FPO)
  • ग्रामीण भागातील उद्योजक

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

मुरघास संयंत्र वाटप योजना 2026 अंतर्गत मुरघास हार्वेस्टर आणि बेलर मशीन खरेदीसाठी अर्ज करताना खालील महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • जमीन पुरावा:
    • शेतीचा 7/12 व 8 ‘अ’ उतारा
  • ट्रॅक्टर आरसी
    • स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावर असलेल्या किमान 50 HP ट्रॅक्टरचे RC कार्ड
  • पशुधन प्रमाणपत्र:
    • पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पशुधन संख्या प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे (कमीत कमी 10 मोठे जनावरे किंवा 100 शेळ्या-मेंढ्या)
  • ओळख व पत्त्याचा पुरावा:
    • पशुपालकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो
  • जातीचा दाखला:
    • सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50%
    • अनुसूचित जाती -जमाती प्रवर्गासाठी 75% अनुदान असल्याने जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • इतर आवश्यक प्रमाणपत्रे:
    • जर लाभार्थी अर्जदार हा दिव्यांग असेल तर UDID प्रमाणपत्र आणि बचत गटाचे सदस्य असल्यास संबंधित प्रमाणपत्र आवश्यक आहे.

⇒ हे देखील वाचा: Shetkari Karjmafi Update 2026: शेतकरी बांधवांनो आजच करा ‘हे’ काम

मुरघास संयंत्र वाटप योजना 2026 अर्ज कसा करायचा?

मुरघास संयंत्र वाटप योजना 2026 च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी किंवा पशुसंवर्धन कार्यालयात संपर्क साधावा. त्याचबरोबर तुम्ही शासनाच्या https://www.mahabms.com/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करू शकताय. अर्ज सादर केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाते. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना मंजुरी मिळाल्यानंतर अनुदान वितरित केले जाते.

मुरघास संयंत्र योजना 2026: FAQ

मुरघास संयंत्र वाटप योजना काय आहे?

ही योजना पशुपालकांना तसेच शेतकऱ्यांना मुरघास मशीन खरेदी करण्यासाठी अनुदान देणारी सरकारी योजना आहे.

Murghas Sanyantra Yojana 2026 च्या माध्यमातून किती अनुदान मिळते?

या योजनेच्या माध्यमातून 50% ते 75% अनुदान मिळते.

अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात?

आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, जमिनीचा 7/12 व 8’अ’ उतारा, बँक पासबुक, फोटो इत्यादि

Murghas Sanyantra Yojana 2026 ही कोणत्या योजनेअंतर्गत राबवली जाते?

ही योजना ‘वैरण विकास योजना’ अंतर्गत राबवली जाते.

निष्कर्ष

Murghas Sanyantra Yojana 2026 (मुरघास संयंत्र वाटप योजना 2026) ही पशुपालक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. चारा टंचाई कमी करून पशुपालन व्यवसाय अधिक मजबूत करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. शेतकरी बांधवांनो, योग्यवेळी अर्ज करून तुम्ही मुरघास संयंत्र वाटप योजना 2026 योजनेचा लाभ घेऊ शकताय.

धन्यवाद!