Mukhyamantri Fellowship Yojana 2026: तरुणांसाठी मोठी संधी; अर्ज सुरू?

Mukhyamantri Fellowship Yojana 2026: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत आता काम करण्याची सुवर्णसंधी आहे. मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासोबत काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी Mukhyamantri Fellowship Yojana 2026 ही मोठी संधी मानली जात आहे. CM Fellowship Yojana 2026 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹61,500 पर्यंत मानधन मिळणार आहे.

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील तरुणांना प्रशासन आणि विकास प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना विविध सरकारी विभागांसोबत काम करण्याची संधी दिली जाते. त्याचबरोबर या योजनेदरम्यान शिष्यवृत्ती, क्षेत्रीय कार्य, प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देखील दिले जाते.

Mukhyamantri Fellowship Yojana 2026 म्हणजे काय?

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा महाराष्ट्र राज्य शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. तसेच या कार्यक्रमाद्वारे निवड झालेल्या राज्यातील होतकरू आणि उच्चशिक्षित तरुणांना शासनाच्या विविध विभागांसोबत काम करण्याची संधी मिळते.

त्याचबरोबर Mukhyamantri Fellowship Yojana 2026 अंतर्गत निवड झालेल्या या तरुणांना मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विविध विकास प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याची देखील संधी मिळते.

Mukhyamantri Fellowship Program 2026 अंतर्गत कोणते लाभ मिळतात?

Mukhyamantri Fellowship योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना खालील लाभ मिळतात:

  • शासनासोबत कामाचा अनुभव
  • अधिकृत ओळखपत्र
  • प्रशिक्षण
  • क्षेत्रीय कार्याचा अनुभव
  • IIT Bombay (आयआयटी बॉम्बे) मार्फत प्रमाणपत्र

महिन्याला किती मानधन दिले जाते?

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत:

  • ₹56,000 पर्यंत विद्यावेतन
  • ₹5,400 अतिरिक्त खर्चासाठी मदत
    • मिळून एकूण ₹61,500 पर्यंत मासिक मानधन दिले जाते.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी वयोमार्यादा काय आहे?

उमेदवाराचे वय:

  • किमान 21 वर्षे
  • कमाल 26 वर्ष

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने:

  • अर्जदार हा कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त पदवीधर असणे अनिवार्य आहे.
  • पदवीच्या परीक्षेत उमेदवाराला किमान 60% गुण असणे आवश्यक आहे

अनुभव असणे आवश्यक आहे का?

उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे

  • Internship
  • Apprenticeship
  • Self-employment
  • Entrepreneurship
    • हे अनुभव देखील ग्राह्य धरले जातात.

अर्जासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागतात?

महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करतेवेळी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • 10 वी, 12 वी तसेच पदवीची सर्व प्रमाणपत्रे व मार्कशीट्स
  • कामाचा अनुभव
  • पासपोर्ट साईज फोटो
  • डिजिटल स्वाक्षरी
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी

CM Fellowship Yojana 2026 अर्ज प्रक्रिया

Mukhyamantri Fellowship Yojana 2026 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे:

  • Step 1:
    • मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे.
Mukhyamantri Fellowship Yojana 2026 official website homepage
  • Step 2:
    • त्यानंतर तुमच्यासमोर होमपेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Mukhyamantri Fellowship Yojana 2026 apply now button process
  • Step 3:
    • तुम्ही ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये असलेले चारही स्टेप्स तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करून ‘अर्जासाठी पुढे जा/साइन इन’ असा पर्याय दिसेल तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे.
CM Fellowship Maharashtra 2026 online application portal
  • Step 4:
    • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला ‘New User’ (नवीन वापरकर्ता) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Mukhyamantri Fellowship Yojana 2026 registration form screen
  • Step 5:
    • त्यानंतर तुमच्यासमोर नोंदणीसाठी नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
CM Fellowship 2026 new user registration process Maharashtra
  • Step 6: तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाइल तयार करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमचे नाव, आधार क्रमांक, कायमचा पत्ता इत्यादि माहिती भरावी लागेल.
Mukhyamantri Fellowship Yojana 2026 personal details form
CM Fellowship Maharashtra 2026 educational qualification details form
  • Step 7:
    • वरील माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या ‘जतन करा आणि पुढे जा’ या वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो आणि विडियोची केवायसी करावी लागेल.
Mukhyamantri Fellowship Yojana 2026 profile verification process
  • Step 8:
    • त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारसह 15 सेकंदाच्या विडियो मध्ये विचारलेली माहिती द्यावी लागणार आहे.
  • Step 9:
    • माहिती दिल्यानंतर तुम्हाला खालील बाजूस असलेल्या ‘जतन करा आणि पुढे जा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल.
CM Fellowship 2026 online advertisement and application page
  • Step 10:
    • आता तुम्हाला ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • Step 11:
    • संपूर्ण माहिती भरल्यानंतर शेवटी तुम्हाला अर्ज फी ₹500 भरावी लागणार आहे.
  • Step 12:
    • अर्ज फी भरल्यानंतर तुम्ही प्रिंट काढू शकताय. त्यानंतर तुमचं हॉल टिकिट देखील तुमच्या मेल आयडीवर पाठवले जाईल.

⇒ हे देखील वाचा: Government Schemes 2026: सरकारच्या ‘या’ योजना माहिती आहेत का?

Mukhyamantri Fellowship Yojana 2026:FAQ

Mukhyamantri Fellowship Yojana 2026 म्हणजे काय?

होतकरू आणि उच्चशिक्षित तरुणांना शासनासोबत कामाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेला कार्यक्रम म्हणजे मुख्यमंत्री फेलोशिप होय.

फेलोशिप मध्ये किती मानधन मिळते?

यामध्ये ₹61,500 पर्यंत मासिक मानधन दिले जाते.

ग्रॅजुएशन आवश्यक आहे का?

होय, ग्रॅजुएशन आणि किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.

फेलोशिप मध्ये अनुभव आवश्यक आहे का?

होय, 1 वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

अर्ज कसा करायचा?

Mukhyamantri Fellowship Yojana 2026 ची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात आहे.

निष्कर्ष

Mukhyamantri Fellowship Yojana 2026 हा प्रशासन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी ठरणारा फेलोशिप कार्यक्रम आहे. या दरम्यान शासनासोबत प्रत्यक्ष अनुभव, stipend त्याचबरोबर व्यावसायिक अनुभव देखील मिळणार आहे. मात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी पात्रता आणि अटी तपासणे आवश्यक आहे.

धन्यवाद!