Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026: नमस्कार मित्रांनो, मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत सरकारकडून हजारो रुपयांची मदत मिळते, पण अजूनही अनेक पालकांना “माझी कन्या भाग्यश्री योजना 2026” बद्दल पूर्ण महितीच नाहीये. तुमचं कुटुंबही या योजनेपासून वंचित राहतयं का? एक छोटीशी माहिती तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी मोठा आर्थिक आधार ठरू शकते.
मित्रांनो, आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी “माझी कन्या भाग्यश्री योजना” सुरू केली आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नाही, तर मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मजबूत आधार आहे.
आजही ग्रामीण आणि शहरी भागात अनेक लोकांना या योजनेची पूर्ण माहिती नाही. त्यामुळे अर्ज करण्याची योग्य पद्धत, पात्रता आणि फायदे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. हीच माहिती तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा दरवाजा उघडू शकते.
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026: उद्देश काय आहे?
या योजनेचा मुख्य उद्देश खालील गोष्टी साध्य करणे आहे:
- मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देणे
- मुलींच्या शिक्षणाला आर्थिक मदत करणे
- बालविवाह रोखणे
- समाजात मुलींबद्दल सकारात्मक दृष्टिकोण निर्माण करणे
- “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या विचाराला चालना देणे.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 फायदे काय आहेत?

या योजनेच्या माध्यमातून मिळणारे फायदे खालीलप्रमाणे:
- आर्थिक मदत:
- एक मुलीच्या जन्मानंतर बँक खात्यात ₹50,000 जमा केले जातात
- दोन मुली असल्यास दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी ₹25,000 जमा केले जातात.
- शिक्षणासाठी टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत:
- मुलीच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या टप्प्यांवर शासनामार्फत आर्थिक सहाय्य दिले जाते.
- विमा व आरोग्य संरक्षण:
- या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईला मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळते.
- व्याज काढण्याची सोय:
- त्याचबरोबर कुटुंबाला मूळ रक्कमेवर जमा झालेले जे काही व्याज आहे ते दर 6 वर्षांनी काढण्याची मुभा असते.
- वयाच्या 18 व्या वर्षी Maturity (प्रौढत्व) :
- लाभार्थी मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर खात्यातील जमा झालेली रक्कम व्याजासह काढता येते.
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026: पात्रता
माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी काही अटी व पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
- मुलीचा जन्म महाराष्ट्रात झालेला असावा.
- माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹7.50 लाख असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर जास्तीत जास्त दोन मुलींपर्यंतच या योजनेचा लाभ घेता येतो. जर तुम्हाला तिसरे अपत्य असेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही.
- पालकांनी पहिल्या मुलीनंतर एक वर्षाच्या आत किंवा दुसऱ्या मुलीनंतर सहा महिन्याच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026: आवश्यक कागदपत्रे
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज करताना खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:
- सरकारी हॉस्पिटल किंवा अधिकृत नोंदणीकृत कार्यालयातून घेतलेला मुलीचा जन्म दाखला
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- कुटुंब नियोजन प्रमाणपत्र
- मुलगी आणि आई यांचे संयुक्त बँक खाते
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
⇒ हे देखील वाचा: ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026 अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे:
- तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन ‘माझी कन्या भाग्यश्री योजना 2026’ चा फॉर्म घ्यावा लागेल.
- अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.
- तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी.
- तसेच वरील सर्व आवश्यक असणारी कागदपत्रे (झेरॉक्स) तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागतील.
- आता सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडल्यानंतर भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्या, त्यामध्ये भरलेली माहिती अचूक आहे की नाही ते पहा.
- संपूर्ण माहिती अचूक असल्यास तुम्ही तुमचा अर्ज अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांच्याकडे जमा करू शकताय.
- अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुमची ‘माझी कन्या भाग्यश्री योजना 2026’ ची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
महत्त्वाचे: या योजनेच्या अधिकृत माहितीसाठी किंवा काही समस्या असल्यास तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026 FAQ
माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे?
ही योजना महाराष्ट्र सरकारची योजना आहे ज्यामध्ये मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते.
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026 चा लाभ कोणाला मिळतो?
महाराष्ट्रातील रहिवासी कुटुंबे ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे आणि ज्यांना एक किंवा दोन मुली आहेत, त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो.
या योजनेच्या माध्यमातून किती आर्थिक लाभ मिळतो?
या योजनेच्या माध्यमातून ₹50,000 ते ₹1 लाख पर्यंत आर्थिक लाभ मिळतो.
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026 चा अर्ज कसा करायचा?
तुम्ही अंगणवाडी केंद्र, महिला व बाल विकास विभाग कार्यालय येथे जाऊन अर्ज करू शकता.
ही योजना फक्त मुलींसाठी आहे का?
होय, ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही फक्त मुलींसाठीच आहे.
⇒हे देखील वाचा सुकन्या समृद्धी योजना; येथे पहा संपूर्ण माहिती!!
निष्कर्ष
“माझी कन्या भाग्यश्री योजना 2026” ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळते आणि कुटुंबांना आर्थिक आधार देखील मिळतो. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेपासून कोणीही वंचित राहू नका, योग्य माहिती आणि आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तयार ठेऊन प्रत्येक पात्र कुटुंबांने या योजनेचा लाभ घ्यावा.
धन्यवाद!
