One Nation One Ration Card 2026: नमस्कार मित्रांनो, देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नधान्याचा लाभ सहजपणे मिळावा यासाठी केंद्र सरकारने One Nation One Ration Card (ONORC) योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे रेशन कार्डधारकांना त्यांच्या मूळ गावात किंवा राज्यातच नव्हे तर भारतातील कोणत्याही राज्यात जाऊन रेशन घेण्याची सुविधा मिळते.
विशेषतः कामानिमित्त स्थलांतर करणारे कामगार, बांधकाम मजूर, उसतोड कामगार आणि इतर असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरत आहे.
महत्त्वाचं म्हणजे आज देशभरातील बहुतांश रेशन कार्डधारक या सुविधेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे रोजगारासाठी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात गेल्यानंतर रेशन मिळवण्यासाठी गावाकडे जाण्याची आवश्यकता राहत नाही.

One Nation One Ration Card योजना काय आहे?
One Nation One Ration Card ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत राबवण्यात येणारी सुविधा आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी देशातील कोणत्याही e -PoS मशीन असलेल्या स्वस्त धान्य दुकानातून त्यांच्या हक्काचे धान्य घेऊ शकतात.
यासाठी रेशन कार्ड आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची ओळख पडताळल्यानंतर त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार रेशन दिले जाते.
योजना का सुरू करण्यात आली?
मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या भारत देशातील लाखो नागरिक रोजगार, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतात. अशा नागरिकांना अनेकदा त्यांच्या मूळ गावातील रेशनचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे अनेक कुटुंबांना सरकारी अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत होते.
ही मोठी समस्या दूर करण्यासाठी One Nation One Ration Card (ONORC) एक देश एक रेशन कार्ड योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे लाभार्थी देशातील कोणत्याही राज्यात कुठेही राहत असले तरी त्यांना रेशन मिळू शकते.
One Nation One Ration Card 2026 प्रमुख फायदे
- देशभरात रेशन मिळण्याची सुविधा
- लाभार्थी भारतातील कोणत्याही राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेऊ शकतात.
- स्थलांतरित कामगारांसाठी उपयुक्त
- कामानिमित्त गांव सोडून दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होतो.
- पारदर्शक वितरण व्यवस्था
- आधारद्वारे ओळख पडताळणी होत असल्यामुळे योग्य लाभार्थ्यांनाच रेशन मिळते. त्यामुळे गैरप्रकार कमी होतात आणि रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक बनते.
- कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रेशन मिळण्याची सुविधा
- याचा अर्थ असा की, जर कुटुंबातील काही सदस्य गावात राहत असतील आणि काही सदस्य कामानिमित्त दुसऱ्या शहरात किंवा राज्यात राहत असतील, तर सर्वांना त्यांच्या वाट्याचे रेशन वेगवेगळ्या ठिकाणी घेता येते.
- वेळ आणि पैशांची बचत
- रेशन घेण्यासाठी मूळ गावात जंयकी आवश्यकता राहत नसल्यामुळे वेळ आणि प्रवास खर्च वाचतो.
एक देश, एक रेशन कार्ड: पात्रता
One Nation One Ration Card ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजनेचा लाभ तुमच्याकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत वैध रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. ही योजना विशेषतः अशा नागरिकांसाठी उपयुक्त आहे जे काम, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात.
या योजनेचा लाभ खालील नागरिकांना मिळतो.
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत नोंदणीकृत सर्व रेशन कार्डधारक
- प्राधान्य कुटुंब (PHH) रेशन कार्डधारक
- अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत लाभ घेणारी कुटुंबे
- आधार कार्डशी लिंक केलेले रेशन कार्ड असलेले नागरिक
- कामानिमित्त दुसऱ्या शहरात किंवा राज्यात राहणारे स्थलांतरित कामगार
- बांधकाम कामगार, उसतोड कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार
महत्त्वाचं म्हणजे, रेशन कार्डवरील सदस्यांची माहिती आणि आधार कार्डची माहिती योग्य असणे आवश्यक आहे. जर रेशन कार्ड आधारशी लिंक नसेल, तर जवळच्या रेशन कार्यालयात जाऊन लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही देशातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून या योजनेचा लाभ घेऊ शकताय.
आवश्यक कागदपत्रे
One Nation One Ration Card योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवण्यासाठी तुमच्याकडे खाली कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड असणे आणि ते रेशन कार्डशी जोडलेले म्हणजेच लिंक असणे अनिवार्य आहे.
- रेशन कार्ड
- तुमचे सध्याचे मूळ रेशन कार्ड
- बायोमॅट्रिक प्रमाणीकरण
- रेशन दुकानातील e-PoS मधीनवर अंगठ्याचा किंवा डोळ्यांचा ठसा द्यावा लागतो.
- मोबाइल नंबर
- रेशन कार्डशी जोडलेला चालू मोबईल नंबर, जेणेकरून वेळेवर अपडेट्स मिळतील.
रेशन कसे मिळवावे?
One Nation One Ration Card योजनेअंतर्गत रेशन मिळवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. लाभार्थी देशातील कोणत्याही e-PoS मशीन असलेल्या स्वस्त धान्य दुकानातून त्यांच्या हक्काचे रेशन घेऊ शकतात. यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागते:
- सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या स्वस्त धान्य दुकानात भेट द्यावी लागेल.
- दुकानदाराला तुमचा रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक द्या.
- त्यानंतर e-PoS माशीनद्वारे तुमची माहिती तपासली जाईल.
- आधार आधारित प्रमाणीकरणासाठी बोटाचा ठसा किंवा इतर उपलब्ध प्रमाणीकरण पद्धतीचा वापर करावा लागेल.
- प्रमाणीकरण प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरील उपलब्ध कोट्याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
- आता तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला गहू, तांदूळ आणि इतर मंजूर अन्नधान्य दिले जाईल.
- रेशन घेतल्यानंतर पावती घेणे आवश्यक आहे, जेणेकरून व्यवहाराची नोंद तुमच्याकडे राहील.
- त्याचबरोबर तुम्ही ‘मेरा रेशन अॅप’ तुमच्या मोबाइल मध्ये इंस्टॉल केल्यास तुम्हाला घरबसल्या तुमच्या रेशन संबंधित संपूर्ण माहिती समजते.
मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही राज्यात किंवा शहरात सहजपणे रेशन मिळू शकते आणि त्यासाठी नवीन रेशन कार्ड काढण्याची आवश्यकता राहत नाही.
One Nation One Ration Card योजनेचे महत्त्व
One Nation One Ration Card ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ही योजना केवळ रेशन वितरणापुरती मर्यादित नसून देशातील अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रोजगारासाठी वारंवार स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरली आहे.
सरकारच्या डिजिटल उपक्रमांमुळे रेशन व्यवस्थेत पारदर्शकता वाढली असून पात्र लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचण्यास मदत होत आहे.
⇒ ही देखील वाचा: फक्त 10% रक्कम भरून मिळणार मिनी ट्रॅक्टर? जाणून घ्या योजना
वारंवार विचारले जाणारे प्रश्न: FAQ
One Nation One Ration Card योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो का?
नाही. पात्र रेशन कार्डधारकांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसते.
दुसऱ्या राज्यात रेशन मिळू शकते का?
होय. देशातील कोणत्याही सहभागी राज्यात रेशन मिळू शकते.
आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे का?
होय. रेशन कार्ड आधारशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.
कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी रेशन घेऊ शकतात का?
होय. विभाजित रेशन वितरण सुविधेमुळे हे शक्य आहे.
रेशन विषयी काही तक्रार असल्यास कुठे संपर्क करावा?
रेशन संबंधित तक्रारींसाठी 14445 हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधता येतो.
निष्कर्ष
One Nation One Ration Card 2026 ही देशातील लाखो रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत उपयुक्त सुविधा आहे. रोजगार किंवा इतर कारणांसाठी स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना आता कुठेही रेशन मिळू शकते. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिक मजबूत होत असून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ सहजपणे मिळत आहे. “एक देश, एक रेशन कार्ड” ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारी ही योजना नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
धन्यवाद!
