PM Kisan Status Check 2026: नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पण अनेक वेळा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की पैसे खात्यात आले आहेत की नाही?
आता काळजी करण्याची गरज नाही. मित्रांनो, या लेखात आपण अगदी सोप्या पद्धतीने PM Kisan Status Check कसा करायचा हे सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.
PM Kisan Status Check 2026 म्हणजे काय?
PM Kisan Status Check म्हणजे प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सरकारकडून पाठवलेले पैसे (Installment) तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी प्रक्रिया होय. शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या मोबाईल घरबसल्या PM Kisan Status Check करू शकता. त्याचबरोबर ही सुविधा वापरणे अगदी सोपे आहे.
PM Kisan Status Check कसा करायचा?
PM Kisan Status Check करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन “Know Your Status” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर नोंदणी क्रमांक किंवा तुमचा आधार क्रमांक वापरुन तुम्ही नवीन हप्ता, KYC आणि बँक खात्याची स्थिती तपासू शकताय.
चला तर मग मित्रांनो, PM Kisan Status Check 2026 कसा करायचा ? सविस्तर जाणून घेऊया
- Step 1:
- पीएम किसान योजनेचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ भेट द्यावी लागेल.

- Step 2:
- होमपेज ओपन झाल्यानंतर थोड खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला “Farmers Corner” हा विभाग दिसेल.

- Step 3:
- “Farmers Corner” विभागात तुम्हाला खाली “Know Your Status” हा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायच आहे.

- Step 4:
- “Know Your Status” यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.

- Step 5:
- त्यामध्ये तुम्हाला Registration Number (नोंदणी क्रमांक) भरावा लागेल.
- Step 6:
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
- Step 7:
- OTP टाकल्यानंतर तुम्हाला ‘Get Data’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
PM Kisan Status Check 2026 अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही PM Kisan Status Check करू शकताय.
PM Kisan Status मध्ये काय माहिती दिसते?
PM Kisan Status मध्ये तुम्हाला खालील माहिती पाहायला मिळते.
- लाभार्थ्याचे नाव
- बँक खात्याची माहिती
- हप्त्याचे तपशील (Installment Details)
- पैसे जमा झाले की नाही
- eKYC स्टेटस
PM Kisan Status दिसत नसेल तर काय करावे?
जर तुमचा PM Kisan Status दिसत नसेल तर खालील गोष्टी तपासा:
- मोबाईल नंबर किंवा आधार नंबर योग्य टाकला आहे का?
- eKYC पूर्ण झाली आहे का
- नोंदणी करताना दिलेली माहिती बरोबर आहे की नाही
PM Kisan eKYC कसे करायचे?
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी eKYC करणे आवश्यक आहे.
eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही खालील माहिती पहावी:
- तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर eKYC हा पर्याय निवडा
- तुमचा आधार क्रमांक टाका
- आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.
- OTP द्वारे तुम्हाला पडताळणी करावी लागेल.
महत्वाचं म्हणजे eKYC केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत.
PM Kisan 2026 Installment माहिती
PM Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 दिले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
- पहिला हप्ता – ₹2000 रुपये
- दूसरा हप्ता – ₹2000 रुपये
- तिसरा हप्ता – ₹2000 रुपये
⇒ हे देखील वाचा: PM Kisan Beneficiary List 2026:तुमच नाव लिस्ट मध्ये आहे का? 2 मिनिटात तपासा
Ration Card eKYC 2026: eKYC नाही केली तर रेशन बंद होणार? नवीन अपडेट
PM Kisan Status Check 2026: FAQ
PM Kisan Status Check कसा करायचा?
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Know Your Status’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पीएम किसान योजनेचा स्टेटस चेक करू शकताय.
पैसे आले नाहीत तर काय करावे?
तुमची eKYC पूर्ण झाली आहे की नाही ते तपासा, जर झाली असेल तर आपल्या बँकेशी संपर्क साधा.
मोबईलवरून पीएम किसान योजनेचा स्टेटस तपासू शकतो का?
हो, तुम्ही घरबसल्या आपल्या मोबईलवरून सहज चेक करू शकताय.
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी eKYC आवश्यक आहे का?
होय, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी eKYC अत्यंत आवश्यक आहे. eKYC प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पैसे खात्यात जमा होणार नाहीत.
निष्कर्ष
PM Kisan Status Check 2026 (पीएम किसान स्टेटस चेक) ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त सुविधा आहे. यामुळे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले की नाही ही काही मिनिटांत घरबसल्या आपल्या मोबईलच्या मदतीने तपासू शकताय. वर दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्ही सहज तुमचा स्टेटस पाहू शकताय.
धन्यवाद !!
