PM Kisan Beneficiary List 2026: नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 आर्थिक मदत देते. ही मदत एकूण 3 टप्प्यांमध्ये म्हणजेच ₹2000 प्रत्येक शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की आपलं नाव PM Kisan Beneficiary List मध्ये आहे की नाही?
शेतकरी मित्रांनो, जर तुमचं नाव PM Kisan Beneficiary List मध्ये असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळतो. त्यामुळे तुम्हाला PM Kisan Beneficiary List तपासणे खूप गरजेचे आहे.
PM Kisan Beneficiary List 2026 म्हणजे काय?
PM Kisan Beneficiary List म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेकऱ्यांची अधिकृत यादी होय. मित्रांनो, सरकार ही पात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाइन उपलब्ध करून देते, ज्यामुळे शेतकरी स्वतःच आपलं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही तपासू शकतात.
PM Kisan Beneficiary List 2026 कशी पाहायची?
मित्रांनो, PM Kisan Beneficiary List पाहण्यासाठी म्हणजेच लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ‘Farmers Corner’ मधील ‘beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला विचारलेली माहिती तिथे भरल्यानंतर ‘Get Report’ या बटणावर क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाची यादी सहजरीत्या पाहू शकताय.
चला तर मग पाहूया PM Kisan Beneficiary List कशी पाहायची (Step-by-Step)
- Step 1: पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ भेट द्या.

- Step 2: होमपेज उघडल्यानंतर तुम्हाला ‘Farmers Corner’ हा विभाग दिसेल.

- Step 3: ‘Farmers Corner’ च्या खाली पाहिल्यानंतर तुम्हाला ‘Beneficiary List’ हा पर्याय दिसेल.

- Step 4:‘Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे रिकाम्या जागेत तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक (तालुका) आणि गाव अशी माहिती भरावी लागेल.

- Step 5: संपूर्ण अचूक माहिती भरल्यानंतर तुम्हाला ‘Get Report’ या बटणावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची संपूर्ण यादी दिसेल.
PM Kisan Beneficiary List 2026 गावनिहाय यादी कशी पहावी?
पीएम किसान योजनेची गावनिहाय यादी तुम्ही अगदी सहजरीत्या पाहू शकताय.
- ‘Beneficiary List’ पेज उघडल्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी
- राज्य
- जिल्हा
- तालुका
- गाव
- अशी माहिती भरून ‘Get Report’ वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची नावे दिसतील.
PM Kisan Beneficiary List 2026 मध्ये तुमचं नाव कसं शोधायचं?
संपूर्ण गावाची यादी मोठी असल्यामुळे नाव शोधणे कठीण जाऊ शकते. त्यासाठी तुम्ही हा सोपा उपाय वापरा:
- जर तुम्ही लॅपटॉप मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये यादी पाहत असाल तर
- किबोर्डवर Ctrl+F दाबा
- तुमचं नाव टाका
- त्यानंतर तुम्हाला भल्यामोठ्या यादीमध्ये तुमचं नाव लगेच दिसेल.
मोबईलवर PM Kisan Beneficiary List 2026 मध्ये नाव कसं शोधायचं?
घरबसल्या मोबईलवर पीएम किसान योजनेची लिस्ट पाहताना नाव शोधण्यासाठी तुम्ही खालील पद्धत वापरा:
- Step 1:
- तुमच्या मोबाईलमध्ये ‘Chrome browser’ ओपेन करा
- Step 2:
- केंद्र शासनाची https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाइट उघडून त्यामध्ये ‘Beneficiary List’ पेज ओपन करा.
- Step 3:
- वर उजव्या बाजूला असलेल्या 3 डॉट्स (⁝) वर क्लिक करा.
- Step 4:
- आता तिथे ‘Find in Page’ हा पर्याय निवडा.
- Step 5:
- आता तुमच्यासमोर एक सर्च बॉक्स येईल त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव टाका.
- तुमच्या समोर आता तुमचं नाव सहजरीत्या दिसेल.
PM Kisan Beneficiary List 2026 तुमचं नाव यादीत नसेल तर काय करायचं?
मित्रांनो, काळजी करू नका जर तुमचं नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत नसेल, तर खालील गोष्टी तपासा:
- सर्वात आधी तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही ते तपासा
- तसेच तुम्ही अर्ज करताना भरलेली माहिती अचूक आहे की नाही ते पहा
- तुमचं आधार आणि बँक खाते लिंक आहे की नाही ते पहा
काही समस्या असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या CSC (कॉमन सर्विस सेंटर) ला भेट द्या.
PM Kisan Beneficiary List 2026 eKYC का आवश्यक आहे?
पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी eKYC फार महत्त्वाची आहे. eKYC करणे अनिवार्य आहे. जर तुमची eKYC पूर्ण नसेल, तर तुमचं नाव यादीत दिसणार नाही आणि तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून कुठलाही लाभ मिळणार नाही.
⇒ हे देखील वाचा: PM Kisan Status Check कसा करायचा?
PM Kisan Beneficiary List 2026:FAQ
PM Kisan Beneficiary List कशी पाहायची?
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही सहजरीत्या लाभार्थी यादी पाहू शकताय.
मोबईलवरून लाभार्थी यादी पाहता येते का?
हो, मोबईलवरून देखील सहज पाहता येते.
लाभार्थी यादीत नाव नसेल तर काय करावे?
पीएम किसान योजनेची आवश्यक असणारी eKYC पूर्ण आहे की नाही ते तपासा.
गावनिहाय यादी उपलब्ध आहे का?
हो, तुम्ही तुमच्या गावाची संपूर्ण यादी पाहू शकताय.
हे देखील वाचा: PM Awas Yojana List 2026: तुमचं नाव घरकुल यादीत आहे का? 2 मिनिटात तपासा!
निष्कर्ष
PM Kisan Beneficiary List 2026 तपासणे ही एक अत्यंत सोपी आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामुळे तुम्ही तुमचं नाव योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही हे सहज तपासू शकता. वर दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही काही मिनिटांत घरबसल्या तुमचं नाव यादी मध्ये आहे की नाही ते पाहू शकताय.
धन्यवाद!
