Mini Tractor Anudan Yojana 2026: फक्त 10% रक्कम भरून मिळणार मिनी ट्रॅक्टर? जाणून घ्या योजना

Mini Tractor Anudan Yojana 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधणे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना तब्बल 90% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे फक्त 10% रक्कम भरून मिनी ट्रॅक्टर घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.

विशेष म्हणजे या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि इतर स्वयंसहाय्यता गटांना रोजगार आणि उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे राज्यभरातील अनेक बचत गट या योजनेकडे आकर्षित होताना दिसत आहेत.

Mini Tractor Anudan Yojana 2026 म्हणजे काय?

मित्रांनो, मिनी ट्रॅक्टर योजना ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणारी विशेष योजना आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता भक्त गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील बचत गटांना आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. बचत गटांना मिळालेला ट्रॅक्टर इतर शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर देऊन देखील उत्पन्न मिळवता येऊ शकते.

मिनी ट्रॅक्टर योजना 2026 किती अनुदान मिळते?

या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाते.

मुख्य आर्थिक लाभ खालीलप्रमाणे:

  • मिनी ट्रॅक्टरसाठी 90% पर्यंत अनुदान
  • कमाल अनुदान मर्यादा 3 लाख 15 हजार रुपये
  • ट्रॅक्टर व उपसाधनांची एकूण मर्यादा 3.50 लाख रुपये
  • लाभार्थी बचत गटाला फक्त 10% रक्कम भरावी लागते.

कोणत्या बचत गटांना मिळेल लाभ?

या योजनेचा लाभ सर्वांना मिळत नाही. शासनाने काही विशेष अटी निश्चित केल्या आहेत.

पात्रता अटी खालीलप्रमाणे:

  • बचत गटातील 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावेत
  • गटाचे अध्यक्ष व सचिव हे देखील अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे
  • सर्व सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत
  • शासन मान्यताप्राप्त उत्पादकाकडूनच ट्रॅक्टर खरेदी करणे आवश्यक आहे
  • त्याचबरोबर लाभार्थी बचत गटाचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक आहे

⇒हे देखील वाचा: शेती औजारांच्या खरेदीसाठी मिळणार 80 टक्के अनुदान!!

मिनी ट्रॅक्टरचा बचत गटांना कसा फायदा होतो?

Mini Tractor Anudan Yojana 2026 mini tractor working in Maharashtra farm

ग्रामीण भागातील अनेक बचत गट लघुउद्योग किंवा शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्न मिळवण्याच्या प्रयत्न करतात. अशावेळी मिनी ट्रॅक्टर योजना त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मुख्य फायदे खालीलप्रमाणे:

  • शेतीची कामे कमी वेळेत पूर्ण होतात
  • ट्रॅक्टर भाड्याने देऊन उत्पन्न वाढवता येते
  • महिला बचत गटांना रोजगाराची संधी
  • ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना
  • शेती यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन

यामुळे बचत गट आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतात.

Mini Tractor Anudan Yojana 2026 आवश्यक कागदपत्रे

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 साठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • आधार कार्ड
  • बचत गट नोंदणी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • सदस्यांची माहिती
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधावा.

⇒ हे देखील वाचा: शेतकऱ्यांना एकाच पोर्टलवर मिळणार सर्व योजनांची माहिती!

Mini Tractor Anudan Yojana 2026: अर्ज कसा करायचा?

Mini Tractor Anudan Yojana 2026 subsidy application process for women self help group
Mini Tractor Anudan Yojana 2026

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन स्वरूपात उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे घेऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर कार्यालयातून योजनेचा अर्ज घेऊन तुम्हाला त्यामध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती अचूकपद्धतीने भरून संबंधित अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.

⇒ हे देखील वाचा: सरकार मार्फत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी मिळणार 35 लाख रुपये अनुदान!

Mini Tractor Anudan Yojana 2026: FAQ

मिनी ट्रॅक्टर योजनेत किती अनुदान मिळते?

या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना 90% अनुदान मिळते. कमाल अनुदान मर्यादा 3.15 लाख रुपये आहे.

Mini Tractor Anudan Yojana 2026 चा लाभ कोणाला मिळतो?

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

मिनी ट्रॅक्टरसोबत उपसाधने मिळतात का?

होय. ट्रॅक्टरसोबत रोटाव्हेटर आणि ट्रेलर ई साधने मिळतात.

योजनेचा अर्ज कुठे करायचा?

जवळच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन येथे अर्ज करू शकता.

बचत गट ट्रॅक्टर भाड्याने देऊ शकतो का?

होय, बचत गटांना ट्रॅक्टर इतर शेतकऱ्यांना भाड्याने देता येऊ शकतो.

निष्कर्ष

Mini Tractor Anudan Yojana 2026 मिनी ट्रॅक्टर योजना ही ग्रामीण भागातील बचत गटांसाठी उपयुक्त ठरू शकणारी योजना मानली जात आहे. कमी खर्चात आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधने उपलब्ध झाल्यास बचत गटांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. विशेषतः महिला बचत गट आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते.

योजनेचा लाभ घेण्यापूर्वी संबंधित विभागाकडून पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची अधिकृत माहिती तपासून घेणे आवश्यक आहे.

धन्यवाद!